Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

2 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

      2 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ


→  प्रार्थना

- आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरु आई माझी... 

 →श्लोक 

वस्तु संचारते देशान् यस्तु सेवेत पण्डितान् । तस्य विस्तारिता बुद्धिः तैलबिंदुरिवाम्भसि ।। 

-जो देशपर्यटन करतो व जो पंडितांची सेवा करतो; त्याची बुद्धी पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबासारखी विस्तार पावते. २ ऑगस्ट वार 

चिंतन

- दीर्घ प्रयत्नांनी कोणतीही गोष्ट साध्य होते. एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर मात्र ती साध्य न होणारी गोष्ट साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, कल्पकता यांची फार गरज आहे. अशा सातत्यपूर्वक केलेल्या प्रयत्नांनी अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते. मूकं करोती वाचालम्, पमूलंघयते गिरीम् हा श्लोक आपल्याला माहित आहेच. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे-याचीही प्रचीती उघड्या डोळ्यांनी निरीक्षण व सतत प्रयत्न केल्यास आपल्याला 


कथाकथन - 'न्याय निवाडा' 

-एके काळी बोधिसत्त्व वाराणसीच्या राजाचा मुख्य प्रधान होता. तोच राजाची सर्व कामे करत असे. राजाला - सल्ला देत असे. त्याला अश्वपरीक्षा फारच चांगली करता येत असे. त्यामुळे दुसऱ्या देशातून व्यापारासाठी जे घोडे येत, त्यांची किंमत तोच ठरवत असे. पण वाराणसीच्या राजाला लोभ जडला. बोधिसत्त्वानं ठरवलेली योग्य किंमत त्याला आवडेना. एक दिवस एक व्यापारी घोडे घेऊन वाराणसीला आला. त्यानं राजाला घोडे पहायची विनंती केली. पण राजानं बोधिसत्त्वाला न सांगता एका लुच्च्या अमात्याला घोड्यांची किंमत करायला सांगितली. राजा त्याला मला घोड्यांची किंमत करण्यापूर्वी महासरोण नावाचा उनाड घोडा आहे. त्याला या घोड्यांवर सोड. त्यानं लाथा मारून त्यांना दुर्बल केल्यावर त्या घोड्यांची किमत कर अमात्यानं मान डोलावली. राजाच्या सांगण्याप्रमाणे वागून अमात्याने त्या घोड्यांची अगदी थोडी किंमत त्या व्यापान्याला देऊन निरोप दिला. व्यापान्याला आश्चर्य वाटली हा कोण नवीन माणूस यानंतर आपल्या हातावर चार टिकल्याच ठेवल्या. घोडे परत न्यावेत तरी पंचाईत. असे दुर्बल झालेले घोड़े कोण घेणार? तो मिळालेले पैसे घेऊन बोधिसत्त्वाकडे गेला नि म्हणाला, "प्रधानजी आपण माझ्या घोड्यांची योग्य किंमत द्याल म्हणून मी इतक्या लांबवरून आलो. पण त्या भलत्याच माणसानं आमची फजिती केली." बोधिसत्त्वानं सर्व हकीकत ऐकून घेतली. मग म्हणाला, “तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही दुसरा एक उनाड घोडा मिळाला तर घेऊन या. मग या महासोणाला घोड्यावर सोडलं की या तुमच्या घोड्यालाही सोडा. मग बघा काय गंमत होते तो!" दुसऱ्या खेपेला खरोखरच तो व्यापारी सहानु नावाचा एक उनाड घोडा घेऊन आला. ठरल्याप्रमाणे त्यानं राजाला घोड्याची किंमत ठरवण्याची विनंती केली. राजानं मागल्या वेळेप्रमाणेच महासोणाला घोड्यांवर सोडण्यास सागितलं. तेव्हा व्यापाऱ्यानं आपल्या सहानुलाही सोडून दिलं पण काय | आश्चर्य! दोघांची गाठ पडल्यावर दोघेही एकमेकांचे अंग चाटू लागले. जणू काही हे सख्खे भाऊच आहेत नि खूप दिवसांनी त्यांची भेट झाली आहे. ते | पाहून राजा जवळच असणाऱ्या बोधिसत्त्वाला म्हणाला, “मित्रा हा आपला घोडा इतका खोडसाळ आहे, पण या नवीन घोड्याशी याचं इतक कसं काय जमल ?" तेव्हा बोधिसत्त्व म्हणाला, "हा नवीन घोडा आपल्या महासोणापेक्षाही खोडसाळ आहे. त्यामुळे त्या दोघांची मैत्री जमली, तर विशेष नवल | नाही. या व्यापाऱ्यानं काट्यानं काटा काढण्याची ही उत्तम युक्ती योजली आहे. महाराज, इतका लोभ करणे आपल्यासारख्या राज्यपदारूढ पुरुषाला शोभत नाही. तुमच्या या अशा वर्तनानं दूर देशातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा जर तोटा झाला तर ते आपल्या देशात येणार नाहीत. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी | देखील सत्यानं आणि न्यायानं वागणं हेच आपला सर्वांना हितकारक आहे, नाहीतर आपल्या देशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही वस्तूंच्या व्यापारावर दुष्परिणाम होईल." तेव्हापासून राजानं धनलोभ सोडून दिला नि तो न्यायानं वागू लागला. 


सुविचार

• माणूस योग्य मार्गाने गेला, न्यायाने वागू लागला व त्याच्यात तळमळ असली तर सर्व अडचणींवर तो मात करतो.

 • जीवन म्हणजे | विचार, अनुभव आणि श्रद्धा यांचे घनफळ आहे.  

 • प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. • माणसाने 

 जास्त लोभ केला तर त्याचे फळ त्याला अवश्य मिळते. 


दिनविशेष 

 • संशोधक प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्मदिन १८६१ : 

 • जी माणसे खऱ्या अर्थाने दुसऱ्यांसाठी जगतात व मरतात अशा थोड्या | माणसांपैकी प्रफुल्लचंद्र रे एक होते. २ ऑगस्ट १८६१ रोजी खुलबा (बांगला देश) जिल्ह्याच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनीच आपल्या गावी स्वखर्चाने उघडलेल्या शाळेत प्रफुल्लचंद्रांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते कोलकात्त्यास गेले, वडिलांच्या ग्रंथालयातील इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाने साहित्याविषयी त्यांचे प्रेम वाढले. ते विद्वानांची व्याख्यानेही ऐकू लागले. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राच्या नामवंत प्राध्यापकांची व्याख्याने ऐकल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची सर्वोच्च पदवी डी.एस.सी. | मिळविली. भविष्यकाळ वैज्ञानिकांच्या हाती आहे म्हणून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास करावा, , असे ते म्हणायचे. रसायनशास्त्र हा प्रफुल्लचंद्राचा विषय होता. अध्यापन करीत असताना देशासमोरील प्रश्नांचा ते विचार करायचे. सेवावृत्ती ही त्यांची सहजप्रवृत्ती होती. त्यांनी आपल्या उदाहरणाने नवयुवकांत चैतन्य निर्माण केले. १८९५ मध्ये त्यांनी मर्क्युरिस नायट्राइटचा शोध लावला. जगातील वैज्ञानिकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी अस्पृश्योद्धाराचे कार्यही केले. ते स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. हिंदु-मुस्लीम ऐक्याबद्दल त्यांचा आग्रह होता. २६ जून १९४४ ला त्यांचे निधन झाले. 

मूल्ये 

• विज्ञाननिष्ठा, सेवावृत्ती, श्रमनिष्ठा. 

अन्य घटना -

 • सखारामबापू बोकील यांचे निधन - १७८१ 

 •  अर्थशास्त्रज्ञ पु. शि. रेगे यांचा जन्म - १९१० 

 •  थोर संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा स्मृतिदिन - १९२२ 

 • लिटिल थिएटरची स्थापना - १९५९ 


उपक्रम -

 • भारताच्या थोर विभूर्तीबद्दल माहिती मिळवा. • वैज्ञानिक आणि त्यांचे शोध असा तक्ता तयार करा.

 →'समूहगान

- • सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा...


सामान्यज्ञान 

शोध                    संशोधक

सायकल       -        मॅकमिलन

बायफोकल लेन्स  -  बेंजामिन फ्रँकलीन

क्लोरोफॉर्म      -     सॅम्युएल गटरी

अॅटमबॉम्ब.     -    एनरिको फर्मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा