Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १८ जुलै, २०२३

19 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना-

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो....

श्लोक 

- उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणी, न मनौरयैः । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥

-  उद्योगानेच कार्याची सिध्दी होते. केवळ मनोरथांनी नव्हे. झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरणे आपोआप येत नाहीत. (त्यासाठी त्याला उद्योग करावाच लागतो. 

चिंतन 

धन म्हणजे राष्ट्राचे जीवनरूपी सत्य आहे बेकन 

- माणसाच्या शरीरातील रक्तामुळे शरीराची हालचाल उत्साहाने सुरू असते. रक्त कमी झाले की अशक्तपणा येतो, थकवा येतो. राष्ट्र है। जर एक तरीर मानले, तर पैसा हे त्याचे रक्त मानावे लागेल. पैशाच्या मदतीनेच राष्ट्र सुस्थिर संपन्न बनते. संपन्न वैभवशाली राष्ट्राला जगात हमीच मान दिला जातो. म्हणून राष्ट्रातील पैसा सतत खेळता राहील, वाढत राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रार्थना तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.... नोगावे → कथाकथन 

प्रज्ञासूर्याचा अखेरचा संदेश...

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू शिष्य नानकचंद रतू यांनी एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारले सर, अलीकडे आपण एवढे दुःखी का दिसता? त्यावर थोडा वेळ मीन धारण करून माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी जे काही मिळवले त्याचा फायदा मूठभर सुशिक्षीतांनी घेतला. पण त्यांचे विश्वास तकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्याची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. ते आत्मघाताच्या वाटेने निघालेले आहेत. नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही  मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्याच बळावर मिळवले आहे. ते करतांना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणीचा मुकाबला करावा लागला. सगळीकडून विशेषतः हिंदू वृतपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्या शापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला, माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडविले. त्यांच्याशीही मी दोन हात केले. मी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफला आज येथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप कष्ट पडले. हा काफला असाच त्यांनी पुढे आणखी चालू ठेवावा.  वाटेत अनेक अडचणी येतील पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरतेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थीतीत त्यांनी या काफील्यास परत फिरू देऊ नये. आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो साख निरक्षर लोकांकडे मला पळवायचे होते. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यांचे आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही पण आयुष्य फार थोडे शिल्लक राहीले आहे. मला असेही वाटले होते की माझे सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत. दुष्ट् अॅड कार्लमार्क्स, रेव्होल्युशन अँड कांऊटर रेव्होल्युशन इन अन्शियन्ट इंडिया आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ ठरत आहे. ही नुसती कल्पना सुध्दा मला क्लेशकारक होते. कोणीतरी पददलित वर्गातुन | माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालविण्याची अवजड जबाबदारी पत्करेल अशी माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पे शकेल असा मुळीच माझ्या डोळ्यासमोर येत नाही. ज्यांच्यावर भरवसा होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांत भावंत आहेत. ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पुर्वग्रह देशाच्या कारभारात आपल अस्तित्व टिकवून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. कारण प्रधानमंत्र्याच्या मताशी न जुळणारे कोणतेही मत ऐकूण घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती गाळात चाललाय हा देश त्यांच्या गालावरून अश्रु ओघळत होते. ओसंडणाऱ्या  डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही. थोडे थांबून डोळ्यातील अश्रू पुसून ते म्हणाले, वरील संदेश मी अत्यंत गंभीरपणे देत आहे. आणि या गांभीयाला नजरेआड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते. जा आणि सांग त्यांना आणि जा आणि सांग त्यांना आणि जा सांग त्यांना असे तिनदा त्यांनी उच्चारले. त्यांनी सुसक्कारे सोडत हुंदके देत आणि अश्रुपात करीत दिलेला हा संदेश डॉ. बाबासाहेब अविडकचा हा अखेरचा संदेश ठरेल असे वाटले नव्हते. त्यांना देशाची सर्वशक्तीनिशी सेवा करायची होती. भारतमातेचा महान पुत्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरची महानता यातच सामावलेली आहे.

 → सुविचार

  • गुलामाला गुलामीची जाणिव करून या तेव्हा तो बंड करून उठेल.

  • निर्बलांचे रक्षण करणे, हीच बलाची खरी कसोटी.

  • दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्य आहे. बाबासाहेब आंबेडकर 

दिनविशेष

 • डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्मदिन - १९३८ : 

 • कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ मध्ये जयंत नारळीकरांचा जन्म झाला. ४०० पैकी ३९९ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने बी. एस्सी. झाले. त्यांचे उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले. १९६२ मध्ये त्यांना पी. एच. डी. पदवी  मिळाली. नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणाचा एक नवीन सिद्धांत मांडला. खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण, विश्वोत्पत्ती शास्त्र आदी विषयांवरीत त्यांचे अनेक संशोधनात्मक निबंध आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याखेरीज त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या असून, वैज्ञानिक विषयांवर सुलभ भाषेत व्याख्याने देण्यासंबंधी त्यांची ख्याती आहे.

मूल्ये

 • संशोधनवृत्ती, परिश्रम, देशप्रेम.

 → अन्य घटना

  • विसोबा खेचर यांनी समाधी घेतली - १३०९. 

  •भारतातील चौदा बँकाचे राष्ट्रीयीकरण- १९६९ 

  •महाराष्ट्र विधानसभेची स्थापना. 

उपक्रम

 • डॉ. नारळीकरांनी लिहिलेल्या विज्ञानकथा वाचणे. 

 • राष्ट्रीयीकृत बँकांची नावे माहिती करून घेणे. 

समूहगान

 • चला जाऊ या दर्शन करू या आपुल्या भारतमातेचे 

सामान्यज्ञान

• आकारमानाने सर्वात मोठा देश- रशिया 

• विस्ताराने सर्वात मोठे बंदर- न्यूयॉर्क 

•आकारमानाने सर्वात लहान देश- व्हॅटिकनसिटी 

• सर्वात लांब भिंत- चीनची भिंत

• सर्वात जास्त लोह मार्गाचे जाळे -अमेरिका 

• लोकसंख्येने सर्वात लाहन देश -कॅटिकनसिटी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा