Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १६ जुलै, २०२३

16 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

         16 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

- ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान ... 

श्लोक

 - नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभत्तभारू ॥

- हे मना, तू क्रोधाचा त्याग कर. कारण तो दुःख देतो, पश्चात्ताप करायला लावतो. सर्व प्रकारच्या वाईट इच्छा सोडून दे. द्वेष, मत्सर, गर्व यांना मुळीच थारा देऊ नकोस.

 → चिंतन

 - स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती ज्या वेळी सर्वांना कळेल, त्याच वेळी भारत पूर्ण स्वावलंबी होईल. - साने गुरुजी 

- माणसाच्या अंगी स्वावलंबन, स्वाभिमान आणि श्रम करण्याची तयारी हे गुण असतील, तर त्याला कोणतीच गोष्ट अशक्य वाटणार नाही. अर्थात त्यासाठी परावलंबन, आळस या गोष्टींचा त्याग करायला हवा. माझे काम मी करणार असे ठरविल्यानंतर मी केलेल्या कामांविषयी अभिमान वाटू लागतो आणि त्यातूनच श्रम करण्याची आवड निर्माण होते. भारतातील प्रत्येक व्यक्ती जर या तीन गुणांची पूजक बनली, तर भारत हे एक पूर्ण स्वावलंबी राष्ट्र होईल. 

कथाकथन 

'पाडसी चालक'

- एक मुलगा काशीत हरिचंद्र हायस्कुलमध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीहून आठ मैल दूर होते. तो दररोज तेथून चा •: चालत - यायचा आणि रस्त्यात जी गंगा नदी वाहते ती पार करून शाळेत जायचा. त्या काळी गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत असत. दोन पैसे | येण्याचे आणि दोन पैसे जाण्याचे एकूण चार पैसे म्हणजे पूर्वीचा एक आणा. महिन्याचे जवळ जवळ दोन रुपये झाले. तेव्हा एक तोळा सोन्याचा भाव शंभ रुपयापेक्षाही कमी होता. त्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर जास्त भार पडू नये म्हणून एक पैसासुद्धा आई-वडिलांकडे मागितला नाही. त्याने पोह घेतले. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, गंगा पार करून शाळेमध्ये जाणे, हा त्याचा दिनक्रम झाला. अशाप्रकारे कितीतरी महिने निघून एकदा पौष महिन्याच्या थंडीत त्या मुलाने सकाळी शाळेत जाण्यासाठी गंगेत उडी मारली. पोहत पोहत तो नदीच्या मध्यभागी आला. एका नावेतून काही यात्रेक नदी पार करीत होते. त्यांनी पाहिले की आता लहानसा मुलगा बुडून मरेल. ते त्याच्याजवळ नाव घेऊन गेले आणि हात पकडून त्याला नावेत खेचून घेतले. त्या मुलाच्या चेह-यावर भीती किंवा चिंतेची छटा अजिबात नव्हती. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. इतका लहान आहे आणि इतका धाडसी ! ते म्हणाले, “तू बुडून मेला असतास तर? असे धाडस करू नये.' तेव्हा तो मुलगा म्हणाला, "धाडस तर केलेच पाहिजे. जीवनात अडचणी संकटे येतील त्यांना पा तुडवण्यासाठी धाडस तर पाहिजेच! जर आत्तापासून मी धाडस अंगी बाणवले नाही तर जीवनात मोठ-मोठी कार्ये कशी करू शकेन?” लोकांनी विचारले, “आन पोहायला कशाला निघालास? दुपारी आंघोळीला आला असता?" मुलांने उत्तर दिले. 'मी आंघोळ करण्यासाठी नदीत उतरलो नाही. मी तर शाळेत चाल आहे.' 'होडीत बसून गेला असता" "रोजचे चार पैसे येण्या-जाण्यासाठी खगतात. माझ्या गरीब आई-वडिलांवर मला भार व्हायचे नाही. मला तर स्वतःच पायांवर उभे रहायचे आहे. माझा खर्च वाढला तर माझ्या आईवडिलांची चिंता वाढेल त्यांना घर चालवणे कठीण होऊन जाईल.' लोक त्याच्याकडे आ पाहतच राहिले. तोच धाडसी मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला. तो मुलगा कोण होता माहीत आहे? ते होते लालबहादूर शास्त्री! शास्त्रीजी सत्यता, पार सरळपणा, प्रामाणिकपणा, साधेपणा, देशप्रेम इ. सद्गुण आणि सदाचाराचे मूर्तिमंत स्वरूप होते. असे महापुरुष भले थोडा कालच राज्य करोत पण एक अनुम प्रभाव जनमानसावर पाडून जातात. 

 

सुविचार

 •संकटात उडी घेऊन जे कार्य करतात, त्यांनाच विजयश्री हार घालते.

  •धैर्य हेच खरे वह आहे.

   • धैर्य आणि विनय हेच भारतीय देवतांचे दागिने आहेत. 

   • उत्साही पुरुष कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाहीत. 

दिनविशेष

१९०० साली ऑलिम्पिक सामने पॅरिस येथे भरले होते 

- १६ जुलै रोजी तापमान १०२ अंश फॅरनहाइट इतके असूनही मॅरेथॉन स्पर्धा | आयोजित करण्यात आली होती. यावेळच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी २५ मैल अंतराचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. तापदायक उन्हातही पॅरिसच्या १९ वर्षाच्या शाळकरी मुलाने- पाव विक्रेत्याने ही शर्यत सहजपणे २ तास ५९ मिनिटे ४५ सेकंदात पूर्ण करून फ्रान्सला सुवर्णपदक मिळवून दिले

 → मूल्ये 

कठोर परिश्रम, असामान्य महत्त्वाकांक्षा, आदर


 → अन्य घटना

  • तुकारामांच्या अभंगाचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्राध्यापक काशिनाथ मराठे यांचा जन्म १८४४. 

• पेशवाईचा संपूर्ण अस्त. नानासाहेब पेशव्यांचा पराभव - १८५७ 

•१८९६ च्या ऑलिंपिकपासून पुरुष मॅरेथॉनची सुरुवात झाली तर १९७० पासून महिला मॅरेथॉन सुरू झाली.

 • अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात चाचणीस्फोट करण्यात आला - १९४५.

 • 'अपोलो-११' या यानातून नील आर्मस्ट्राँग व एड्विन आल्ड्रिन या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले - १९६९.

 → उपक्रम 

 • आंतरराष्ट्रीय धावपटूंची माहिती गोळा करणे.

 → समूहगान 

 • आओ बच्चों तुम्हे दिखाऐं झाकी हिंदुस्तान की

 → सामान्यज्ञान

  • ऑलिंपिक स्पर्धा ग्रीसमध्ये इ. स. पूर्वी अनेक शतके घेतल्या जात होत्या; परंतु आजच्या ऑलिंपिक स्पर्धांचे पुनरुज्जीवन १८९६ मध्ये पीअरे डी. कोबर्टिन या फ्रेंच व्यक्तीच्या पाठपुराव्यामुळे झाले. मुख्य ऑलिंपिक स्पर्धेशिवाय बर्फावरच्या स्पर्धांचे आयोजन वेगळ्या ठिकाणी हिवाळ्यात केले जाते. याला हिवाळी ऑलिंपिक म्हणतात. यांची सुरुवात १९२४ पासून झाली. पहिले हिवाळी ऑलिंपिक फ्रान्समध्ये भरले होते. ऑलिंपिकमध्ये सांघिक स्पर्धेसाठी फक्त बारा संघ निवडले जातात. त्यांतील आठ आधीच्या ऑलिंपिकमधील असतात, तर उरलेल्या चारसाठी आधी दोन वर्षे स्पर्धा चालतात. प्रत्येक खंडात स्पर्धा घेऊन यशस्वी संघ स्पर्धेत पदार्पण करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा