Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २८ मे, २०२१

तपश्चर्येचे फळ

                  तपश्चर्येचे फळ 



        पुराणातील ही एक गोष्ट आहे. एका वनात एक प्रकांड ऋषी राहत होता. त्याला तीन बायका होत्या. त्याची जी तिसरी बायको होती तिचे नाव होते इतरा, वास्तविक ती अतिशय तरुण आणि लावण्यवती होती. तिला एक मुलगा होता. त्याचे नाव होते महिदास ऋषीला अनेक आमंत्रणे येत असत. परंतु हे ऋषी आपल्या या पत्नीला कुठेही नेत नसत. तिच्यावर भारी अन्याय होत असे. एकदा ती ऋषींना म्हणाली, "मी तुम्हाला अडाणी आहे असे वाटते का? का गावढळ वाटते?" ऋषी इतरेच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नसत आणि तिला कुठेही नेत नसत. एकदा काय झाले की ऋषींचा फार मोठा सत्कार होता, ऋषी आपल्या पहिल्या दोन बायकांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन गेले. इतरेचा मुलगा महिदसा पाठोपाठ येतो आहे हे ऋषींना माहीत नव्हते. अचानक तो घरी रडत रडत आला म्हणून आईने त्याला विचारले, की "बाळा, काय झाले?" तेव्हा छोटा महिदास म्हणाला, “आई, बाबांना मी आवडत नाही. बाबाचा फार मोठा सत्कार चालू असताना मी बाजूला उभा राहिलो | म्हणून बाबा माझ्यावर खूप ओरडले आणि त्यांनी मला सभेतून हाकलून दिले. आई, मी इतका का वाईट आहे?..." इतरेला खूप वाईट वाटले. तिने काय केले तर आपल्या मुलाला घेऊन ती घराच्या बाहेर पडली. तिने बारा वर्षे तपश्चर्या केली. ज्ञान स्वत मिळवले आणि महिदासाला वेदविद्येत पारंगत केले. | महिदासाची कीर्ती सर्वत्र पसरली. राजाने महिदासाला आमंत्रण पाठविले. महिदास आपल्या आईला घेऊन गेला. त्याचे ज्ञान पाहून राजा प्रभावित झाला. कारण महिदासाने वादविववादात अनेक पंडितांना हरवले होते. इतक्यात काय झाले, तर महिदासाचे वडील, वनात राहणारे ऋषी-राजाच्या दरबारात आले. त्यांनी महिदासाला आव्हान दिले. आश्चर्य म्हणजे महिदासाने वादविवादात आपल्या वडिलांना हरवले तेव्हा इतरेच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. राजाला जेव्हा कळले की हे ऋषी महिदासाचे वडील आहेत. तेव्हा राजाने ऋषींना मानाने आसन दिले. तेव्हा ऋषी राजाला म्हणाले, “राजन, ही जागा माझी नाही. ही जागा महिदासाच्या आईची म्हणजेच इतरेची आहे." ज्या ऋषीने आपल्याला गावंढळ ठरवले होते तो आपला पती आज मानाने । आपले नाव उच्चारतो आहे, हे पाहून इतरा संतुष्ट झाली. मुलांनो, या गोष्टीवरून आपण बोध घ्यायचा की शेवटी आईच मुलांना घडवते. त्यांच्यावर उत्तम संस्कार करते. त्याला विद्या देते. आईमुळेच मुलांची विश्वात कीर्ती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा