Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २३ मे, २०२१

सुविचार संग्रह-1

                  • सुविचार संग्रह •  • चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही. 

• जो दुसऱ्याचे अनिष्ट चिंतितो, तो स्वतःचाच नाश करून घेतो. 

• कार्य करणाऱ्याच्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ असला पाहिजे. 

• जेव्हाचे काम तेव्हा करी, काय वर्णावी त्याची थोरवी.

 • ज्याच्या मनात नेहमी सद्भावनांचा वास असतो, त्याला जीवनात दुःख दिसत नाही. 

• दान व सेवा यांच्याद्वारे जग चालते. 

• त्याग व सेवा यांच्याद्वारे पृथ्वीवर स्वर्ग उतरतो.

जीवनात प्राथमिक अवस्थेत येणारी दुःखे व संकटे उज्ज्वल भवितव्याचे निदर्शक असतात. 

● परिस्थिती आपोआप सुधारत नाही, तीत बदल घडवून आणल्याने आपण सुधारतो. 

• निष्क्रियतेपेक्षा क्रियाशीलता श्रेष्ठ असते. 

• अनुभव हा उत्तम शिक्षक आहे; पण तो आधी परीक्षा घेतो व नंतर शिकवितो. 

• अनेक अपयशांमधूनच यश प्राप्त होते. • वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे होय.

 • एकाग्रतेने मनापासून काम केले तर जीवन यशस्वी होते.

 • आपण दुः ख जितके अधिक चघळू, तितके ते हानिकारक बनते. 

• काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही, त्यामुळे आजची आपली ताकद नाहीशी होते.

 • शिक्षा करण्यापेक्षा क्षमाशील होण्यात अधिक मर्दपणा आहे. 

• सत्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही व असत्यापेक्षा भयंकर असे जगात काहीच नाही. 

• पूर्ण नम्रतेचा भाव असल्याशिवाय सत्य सापडत नसते. 

• जो सत्याचरणी आहे, तोच खरा सुखी असतो. 

• सत्य आणि सत्ता यांचे सहसा जुळत नसते. 

• उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य.

 • काळाच्या ओघात सत्यच टिकते, असत्य टिकूच शकत नाही. 

• सत्याचाच विजय होतो, असत्याचा नव्हे. व्यायामाने आरोग्य प्राप्त होते, तर अभ्यासाने ज्ञान प्राप्त होते, व उद्योगाने धन प्राप्त होते. 

• लाभाच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे. ध्येयप्राप्तीसाठी सर्व प्रकारची संकुचितता, जातीयता, प्रांतीयता फेकून द्यावी लागते.

 • मुंगीपासून उद्योग शिका व शहाणे व्हा.

• मन निश्चयी असेल तर हजारो संकटे आली तरी हाती घेतलेले काम तडीस नेता येते. 

• चुका काढणे सोपे. योग्य दुरुस्ती अथवा उपाय दाखविणे अवघड असते.

 • मोठी माणसे आलेल्या संधीचा दुरुपयोग करीत नाहीत. 

• कोणतेही कार्य उद्योगाने व प्रयत्नानेच यशस्वी होते. • कितीही संकटे आली तरी सन्मार्ग सोडीत नाही, तोच खरा पुरुष होय. 

• स्वतः धैर्य धरल्याशिवाय संकटातून पार पडता येत नाही. 

• उद्योग करणाऱ्यांना यश मिळवण्यास कठीण असे या जगात काय आहे.

● काम करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे टाळावे.

 स्वतःच प्रयत्नशील व्हावे. 

● श्रेष्ठ माणसे सत्कर्माची कास धरतात, तर दुबळे लोक दैवावर हवाला ठेवतात. ● कितीही संकटे आली तरी सन्मार्ग न सोडणारा मनुष्य श्रेष्ठ असतो. 

• बसणाऱ्याचे दैव बसूनच राहते. उभे राहणाऱ्याचे दैव उभेच राहते. चालू लागणाऱ्याचे दैवही चालू राहते. 

• दीर्घोद्योग, दृढनिश्चय आणि लोक कृपा यांनी स कार्यसिद्धी होते. 

• दैववादी मनुष्य लवकर नाशाकडे जातो.

 • आळशी, दुर्बळ, गर्विष्ट आणि लोकापवादाला भिणारे यांना यशप्राप्ती होत नाही. 

• सतत उद्योग करणाऱ्या पुरुषाला अक्षय सुखाची प्राप्ती होते.

 • विद्या आणि धन सतत उद्योगानेच प्राप्त होते. 

• अपयश हे अंजन असते. त्याने दृष्टी साफ होऊन यशाचा मार्ग स्वच्छ दिसू लागतो. 

• अविरत उद्योग हाच सुख-समाधानाचा झरा असतो. 

• उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता व चिकाटी यांमुळे कीर्ती व सद्भाग्य लाभते.

 • शरीर, मन आणि बुद्धी यांचा विकास करते, तेच खरे शिक्षण होय. 

• माणसाला जगण्यास लायक बनविणारे तेच खरे शिक्षण होय. 

• खरे ज्ञान अहंकाराचे समूळ उच्चाटन करते. 

• नीटनेटके राहणी, उच्च विचारसरणी, शिस्तप्रियता आणि • सतत अभ्यास विद्यार्थ्याला आवश्यक असतो.

• जगात ज्ञान वाढताना दिसते; पण शहाणपण वाढलेले दिसत नाही. 

• विद्येशी अनुभव आणि व्यवहार यांची सांगड घातल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. • केवळ पुस्तके वाचून शिक्षण मिळत नाही. अनुभवांनीच शिक्षणाला पूर्णता येते. 

• ग्रंथाएवढा प्रांजळ आणि निःस्पृह तसेच निष्कपटी गुरू दुसरा कोणीही नाही. 

• आळशी व बेकार लोकांशी मैत्री सर्वनाशाचे कारण ठरते. 

• इतरांच्या सुख-दुःखात भागीदार व्हावयास शिकणे, ही शिक्षणाची फलश्रुती होय.

 • आपले सौख्य आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते.

 • अज्ञान हा अधोगतीचा पाया आहे. 

• जिच्यायोगे मनुष्य मनाने निर्मळ, विचारी आणि जगण्यास समर्थ होतो, तीच विद्या होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा