Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

6 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

          6 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

दैनंदिन शालेय परिपाठ (आदर्श मूल्यशिक्षण) सुश्री. ऊर्मिला ढाकरे/ऊर्मी 1- अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता... ६ एप्रिल वार : 


→ श्लोक 

- वदनं प्रसादसदनं हृदयं सदयं सुधामुचो वाचः । करणं परोपकरणं, येषां केषां न ते वन्द्याः ? ।। ज्यांचे मुख म्हणजे प्रसन्नतेचे माहेरघर, अंत:करण दयेने भरलेले, वाणी (बोलणे) अमृताचा वर्षाव करणारी आणि कृती दुसऱ्यावर उपकार करणारी असते ते कुणाला बरे वंदनीय ठरत नाहीत?


 → चिंतन

 - एखाद्या कार्यासाठी दृढनिश्चय, परिश्रम आणि त्रास सहन करण्याची तयारी हेच तप होय. ते तप केल्याने कार्य सिद्धीस जाते. 'सर्व हि | तपसा साध्यम्' म्हणजे सर्व काही तपश्चर्येने प्राप्त होते. तपश्चर्येच्या सामर्थ्यावरच आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अत्यंत दुर्लभ, मिळण्यास कठीण अशा गोष्टी प्राप्त केल्या. हाच दृढनिश्चय एकलव्यात होता. शास्त्रज्ञांमध्ये, संशोधकांमध्ये, कलावंतांमध्ये हाच दृढनिश्चय दिसून येतो. जी जी व्यक्ति 'थोर' म्हणून त्या त्या क्षेत्रात उच्चपदी पोचलेली दिसते, तिचे तप त्यामागे उभे असलेले दिसते.


कथाकथन 

'परोपकाराचे फळ' - एकदा बोधिसत्त्व ब्राम्हण कुळात जन्मला होता. मोठ्या झाल्यावर ऋषी होऊन तो हिमालयात | होता. तिथे त्याच्याभोवती बराच मोठा शिष्यगण जमला होता. त्याचं नियमितपणे अध्ययन, अध्यापन चालू होतं. पण, एका वर्षी | उन्हाळा सुरू झाला. सगळीकडे दुष्काळ पडला. पाण्याचे तलाव, झरे, वगैरे आटून गेले. तिथे वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांना पाणी मिळे झाल | त्यांची पाणी मिळविण्यासाठी चाललेली धडपड बोधिसत्वाच्या एका शिष्यानं पाहिली. तेव्हापासून तो लाकडाच्या मोठ्या प्यान | पाणी पाजू लागला. पण, त्यामुळे त्याला अरण्यात जाऊन फळ आणण्यासाठी वेळ मिळत नसे. उपाशीपोटी राहून प्राण्यांना पाणी द्यावे लागत असे. पण, त्यानं आपलं काम तसंच चालू ठेवलं. त्या प्राण्यांना त्याची ही अवस्था कळली. तेव्हा त्या प्राण्यांनी आपसात एक ठराव पास केला | आपल्यासाठी एवढे कष्ट सहन करतो, तेव्हा आपणही अल्पांशाने त्याचे उपकार फेडणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येकारी | पिण्यासाठी येताना एक फळ घेऊन यायचं रिकाम्या हातानं यायचं नाही.' असं ठरलं. दुसऱ्या दिवशी प्रत्येक प्राण्यानं एकेक ठेवलं. फळांचा मोठा ढीग जमला. तेव्हापासून रोज असाय फळांचा ढीग आश्रमात लागायला लागला. सर्व तपस्वांनाच्या | जाता आयती फळे मिळू लागली. त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येला मोठीच मदत झाली. आपल्या शिष्यांच्या वर्तनावर खूष होऊन बोधस्य सर्वांना म्हणाला, "बाळांनो, परोपकारचं हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपल्यापैकी एकानं परोपकारासाठी कष्ट घेतल्यानं आपल्या तपश्चर्येला खूप मदत | झाली. म्हणून परोपकार करण्यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे. "


सुविचार- -

 • "सर्वाच्या कल्याणात आपले कल्याण आहे" - म. गांधी •"धर्माचे अंतरंग प्रेम तर बहिरंग परोपकार होय" दांडी यात्रा : मिठाचा सत्याग्रह - १९३० - महात्मा गांधींनी १९३० साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च 


→ दिनविशेष 

१९३० रोजी सकाळी ६.३० वा. साबरमती आश्रमातून म. गांधींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही, अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली, हिंदुस्थानात मिठाचा वापर आरोग्याला आवश्यक इतकाही होऊ | शकत नव्हता. याचे कारण सरकारने त्यावर लादलेला जबर कर. ६ एपिलला यात्रा संपली. गांधीजींनी बेकायदेशीररित्या मीठा गोळा केले. देशभर | मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रही आंदोलन उभे राहिले. ४ मे १९३० रोजी पहाटे गांधींना कराडे या गावी अटक झाली. येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. गांधीजींच्या अटकेमुळे हिंदुस्थानात सर्व ठिकाणी कडकडीत हरताळ पडले. चळवळीचे डॉबही गावोगावी उसळले. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. २५ जानेवारी १९३१ रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी होऊन ५ मार्च १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. मिठाची ही दुर्मिळता परकीय सरकारने आपल्या जातभाईच्या स्वार्थासाठी कृत्रिमतेने उत्पन्न केली होती. इंग्लिश मीठ हिंदुस्थानात विकले जाये यासाठी येथील मिठावर कर बसविला होता. सार्वत्रिक आवश्यकतेचे पण सरकारने महाग केलेले हे मीच गांधीजींनी पेजेसवायचे ठरविले. 


→ मूल्ये - 

• देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम, सेवा 


→ अन्य घटना - 

• शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला. १६५६ भारतातला प्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटिशांनी इंग्लंडला नेला.. १८५० 

• सैलेट अॅक्टविरुद्ध हरताळ पाळण्यात आला. १९१९ मिहीर सेन यांनी पाल्कची समुद्रधुनी पोहून पार केली. - १९६६ - 


→ उपक्रम 

• मिठाच्या सत्याग्रहावर, बार्डोलीच्या सत्याग्रहावर, ४२ च्या आंदोलनावर माहिती संकलित करण्यास सांगणे 


→ समूहगान 

• इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके... 


→ सामान्यज्ञान • प्राचीन काळी रोममध्ये मीठ अतिशय दुर्मिळ, म्हणूनच मौल्यवान होते. सीझरच्या सैन्यातील सैनिकांना पगारातून काही भाग, | मिठाच्या रूपात देत असत. मिठाच्या या भागाला 'सॅलेरियम' म्हणत. म्हणून पगारासाठी सॅलरी हा शब्द रूढ झाला आहे. ग्रीसमध्ये गुलामांच्या | विक्रीसाठी चलन म्हणून मिठाचा वापर करीत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा