25 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
देव दयेचा अथांग सागर, विश्वचि मानी तो अपुले घर...
→ श्लोक
- असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय ।। हे परमेश्वरा । शून्यापासून मला अस्तित्वाप्रत ने, (किंवा वाईटापासून मला चांगल्याकडे ने), मरणापासून मला अमरत्वाप्रत ने. घरापासून मला प्रकाशाकडे ने.
→ चिंतन कर्तव्यासाठी कर्तव्य करा, कर्तव्याच्या तत्त्वाने, आत्मार्पणाचे सामर्थ्य येते. त्या उदात्त कल्पनेने, या कर्तव्यनिष्ठेने मनुष्याच्या विलक्षण चैतन्य येते, मनुष्य अचाट कामे करू शकतो. या कर्तव्यनिष्ठेमुळेच श्रावणबाळ आपल्या अंध आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेस न गेला. याच कर्तव्यनिष्ठेमुळे भरताने सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून त्याच्या नावे राज्य केले. या कर्तव्यनिष्ठेने तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचे लावले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.
कथाकथन
- सिंहाची कृतज्ञता': एके दिवशी एका सिंहाने हरणाची शिकार केली. त्याचे मांस खात असता सिंहाच्या अडकले. ते काही केल्यानिना, बेदना असह्य होऊन सिंह मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा गळा सुजून मोठा झाला. अशावेळी एक सिंहाकडे लक्ष गेले तो सिंहाजवळ जाऊन म्हणाला, "अरे वनराज, तू असा का ओरडतो आहेस?' "बाबारे, " सिंह महणाला, " अन् सांगून उपयोग तरी काय ? कारण माझ्या घशात हाड अडकल्यामुळे माझ्याने बोलवत नाही. भयंकर वेदनाही होताहेत! पक्षी भीत म्हणाला, 'तुम्ही मला अभयदान दिलत तर मी तुमच्या घशात अडकलेलं हाड आताच काढून टाकीन." सिंहाने त्याला अभयदान दिले आभारदेखील मानले व त्याला हाड काढण्यास सांगितले. पक्षी पण मोठा हुशार होता. न जाणो आपण तोंडात शिरल्यावर ह्याने आपल्याला टाकले तर? या विचाराने त्याने प्रथम सिंहाच्या खालच्या आणि वरच्या जबड्याच्या दरम्यान एक वेताची काठी उभी करून ठेवली. नंतर घशात चोचीने ते हाड आडवे पाडले. तेव्हा ते आपोआप बाहेर पडले. त्याबरोबर पक्ष्याने जबड्यामधील काठी काढून तो चटकन तेथून उडून गेला. दुसऱ्या दिवशी सिंहाने एका रेड्याची शिकार केली, आणि त्याच जागी बसून तो त्यांचे मांस खाऊ लागला. थोड्यावेळाने तो पक्षी तिथे समाचाराला आला. "महाराज" तो पक्षी सिंहाला म्हणाला, "आपली प्रकृती पूर्ण बरी झाली असं दिसतंय!" "हो," सिंह म्हणाला. "बरी झाली आ म्हणून तर आज शिकार करून ही मेजवानी चालली आहे." पक्षी म्हणाला, 'तर मग काल मी तुमच्यावर केलेल्या उपकाराचा तुम्हाला विसर पडला अस मी समजतो." "हो," सिंह म्हणाला, "पण त्या उपकाराचं बक्षीसही मी तुला कालच देऊन टाकलं आहे!' पक्षी म्हणाला, "ते कोणते बरो पहा" सिंहाने उत्तर दिले, “मी सर्वदा प्राण्यांची हत्या करून आपलं पोट भरणारा प्राणी असूनही तुला माझ्या तोंडातून जिवंत बाहेर जाऊ दिलं हे मोठे उपकारच नाहीत का?" आणखी दुसऱ्या बक्षिसाची तू माझ्याकडून अपेक्षाच कशी करतोस ? 'आपण म्हणता ही गोष्टही खरीच आहे म्हणा पक्षी म्हणाला", "ज्या प्राण्यावर उपकार केले असता अपकार होण्याचा संभव असतो, ज्यात मित्रधर्म काय हे ठाऊक नसतं, अशा प्राण्याकडून उपकाराच्या फेडीची अपेक्षा न केलेलीच बरी !" असे म्हणून तो पक्षी तेथून उडून गेला.
• सुविचार -
• • खरी मैत्री मोकळ्या हृदयाने बोलते, न्याय सल्ला देते, केव्हाही मदत करण्यास तयार असते, धैर्याने मार्ग शोधते, → धीटपणाने (घेते हे ठाऊक नसतं, अशा प्राण्याकडून उपकाराच्या फेडीची अपेक्षा न केलेलीच बरी! असे म्हणून तो पक्षी तेथून
→ दिनविशेष -
• मार्कोनी मार्केझे मूल्यल्मो जन्मदिन - १८७४ : इटालियन भौतिकी शास्त्रज्ञ, बिनतारी तारयंत्र विद्येच्या विकासात काम केल्याबद्दल १९०९ साली नोबेल पारितोषिकाचा बहुमान फेर्डिनांट ब्राऊन यांच्या समवेत प्राप्तः मार्कोनी याचा जन्म २५ एप्रिल १८७४ मध्ये येथे झाला. विद्यार्थिदशेतच त्यांना भौतिकीय व विद्युतशास्त्रांची गोडी लागली. १८९४ साली त्यांनी आपल्या वडिलांच्या इस्टेटीवर बिनतारी सं वहनासंबंधी प्रयोग करण्यास प्रारंभ केला. संदेशवहनाचा पल्ला २.५ किलोमीटर इतका वाढविण्यात त्यांना यश मिळाले. आपले प्रयोग पुढे ठेवण्यास त्यांना इटलीत फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. म्हणून ते १८९६ साली इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी अनेक प्रात्यक्षिके करून दाखविली सॉल्झबरी मैदानावर सुमारे ६.५ कि.मी. व ब्रिस्टल खाडीपार सुमारे १४.५ कि.मी.अंतरावर संदेश पाठविण्यात त्यांना यश मिळाले. माकांनी या १९०२ से १९१२ या काळात अनेक नवीन शोधांची पेटंटस् मिळविली. १९१८ मध्ये इंग्लंडमधून ऑस्ट्रेलियाला पहिला रेडिओ संदेश पाठ मार्कोनी यांना शक्य झाले. १९१४ साली त्यांनी इटालियन भूसेनेत लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला. १९१६ मध्ये कमांडर म्हणून नाविक दलात लांच बदली झाली. १९१९ मध्ये पॅरिसमधील शांतता परिषदेसाठी इटलीचे पूर्णाधिकारी प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. १९३५ मध्ये सबंधीच्या त्यांच्या तत्वाचे व्यवहार्य प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. मार्कोनी यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ नोबेल पारितोषिकाखेरीज इ अनेक बहुमान मिळाले. ते रोम येथे २० जुलै १९३७ रोजी दिवंगत झाले.
→ मूल्ये
- • विज्ञाननिष्ठा, उपक्रमशीलता.
→ अन्य घटना
• रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोध्दार १८६९.
• रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात १९८२. -
• युरोपातून भारतात येताना आफ्रिका खंडाला घालावा लागणारा वळसा वाचविणाऱ्या प्रसिध्द 'सुवेझ' कालव्याच्या बांधकामास प्रारंभ - १८८९
→ उपक्रम
• मार्कोनी यांनी लावलेल्या शोधांची माहिती सांगून त्यांचे महत्व विशद करणे.
→ समूहगान -
• जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा...
→ सामान्यज्ञान
उपकरण -उपयोग
टेलिस्कोप -आकाशस्थ ग्रहमोल बघता येणारे उपकरण
धर्मोग्राफ -तापमानातील बदलाची नोंद
व्होल्टामीटर-विजेचा दाब मोजणे
फॅदोमीटर-समुद्राची खोलीमोजण्याचे यंत्र -
विविध भाषांतील जगप्रसित्र महाकवी.
महाकवी-भाषा
तुलसीदास-हिंदी
शेक्सपियर -इंग्रजी
मिर्झा गालीब -उर्दू
रवींद्रनाथ टागोर-बंगाली
-
महाकवी-भाषा
शेख सादी-पार्शियन
व्हर्जिल-लॅटिन
गटे-जर्मन
डाण्ट-इटालियन
सॅली उंधा-फ्रेंच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा