Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

23 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

            23 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

असो तुला देवा माझा सदा नमस्कार.... 


→ श्लोक 

- काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी ।। देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः ।।

-  योग्य वेळी पाऊस पडो व पृथ्वी धनधान्यदिनी समृध्द होवो. या देशात क्षोभ नसो (शांति राहों) सज्जनांना जय जिजाऊ 


→ चिंतन-

 प्रत्येक तरुणामध्ये दृढ इच्छाशक्ती पाहिजे. तो आपल्या ध्येयावर, निश्चयावर हिमालयासारखा दृढ, अढळ, निश्च राहिला पाहिजे. हजारो संकटे आली तरी त्याने हाती घेतलेले काम तडीस न्यायला हवे. तरुणांवर, बालकांचे, लहानांचे पालनपोषण, संव करण्याची आणि मोठ्यांचा प्रतिपाल करण्याची अशी दुहेरी जबाबदारी असते. ही जबाबदारी स्वतःच्या घराबरोबरच देशाच्या संदर्भातही पाडावी लागते. त्यासाठी हजारो संकटांना तोंड देण्यास उपयोगी पडेल अशी जबरदस्त इच्छाशक्ती तरुणांमध्ये पाहिजे. अशी इच्छा भवितव्य घडविण्यास कारक ठरत असते.


कथाकथन 

- 'यातली आई कोणती?' पेशवाईत एकूण साडेतीन शहाणे प्रसिध्द होते. सखाराम बापू, देवाजीपंत चोरपडे आणि विठ्ठल सुंदर, हे तीन पूर्ण शहाणे, तर नाना फडणीस हे अर्ध शहाणे. नाना फडणीस हे लेखणीबहाद्दर व मुत्सद्दी असले तरी ते समशेरबहाद्दर नव्हते, म्ह त्यांना 'अर्धा शहाणा' असे मानले जाई. परंतु या नानांची चातुर्याबद्दल फार ख्याती होती. एकदा एक सौदागर पुण्यातील शनिवारवाड्यावा दोन पोड्या घेऊन आला. रंग, रूप, उंची वगैरे एकूणएक बाबतीत दोन्हीही घोड्या अगदी एकमेकींसारख्या होत्या. पेशव्यांना हे वृत्त कळताच, ते वाड्याबाहेर आले आणि त्यांनी त्याला त्या घोड्यांची किंमत विचारली. सौदागर म्हणाला, "श्रीमंत, या दोन घोड्या मायलेकी आहेत. यातील आई कोणती आणि लेक कोणती हे ओळखून काढणाऱ्या चतुर माणसाला मी या घोड्या तशाच इनाम देण्यासाठी आणल्या आहेत. मी या विकण्यासाठी आणलेल्या नाही." पेशव्यांनी आपल्या पदरी असलेल्या सर्व अश्वपारख्यांना बोलावून घेऊन त्यांना त्या दोन घोड्यांपैकी आई कोणती व लेक कोणती याची पारख करायला सांगितले. पण कुणालाही ते सांगता येईना. अखेर पेशव्यांनी नाना फडणीसांना बोलावून, त्यांना तोच प्रश्न विचारला. नाना म्हणाले, "थोड्याच वेळात मी या सौदागराच्या प्रश्नाचं उत्तर देतो." पावसाळ्याचे दिवस होते ते. पुण्याजवळून वाहणान्या मुळा-मुठा नदीला पूर आला होता. नानांनी त्या दोन घोड्यांना नदीत घालण्याची आज्ञा सेवकांना फर्मावली. सेवक त्या घोड्या घेऊन नदीकडे चालू लागले असता नानाही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. तो सौदागर, पेशव्यांचे काही अधिकारी, एवढेच नव्हेतर खुद्द पेशवेही, नाना हे कोड कस सोडवतात हे पाहण्यासाठी नदीवर गेले. नदीकिनारी पोहचताच सेवकांनी त्या दोन घोड्यांना नदीच्या पुरात ढकललं पाण्याला अतिशय वेग असल्याने त्या घोड्या नदीत शिरायला नाराज होत्या; पण जेव्हा सेवक सर्वच बाजूंनी त्यांना नदीत हाकू लागले तेव्हा त्या दोन्ही घोड्या एका पाठोपाठ एक अशा नदीत शिरल्या आणि पैलतीराच्या दिशेनं पोहत जाऊ लागल्या. एक घोडी पुढं, तर दुसरी घोडी तिच्या मागोमाग अशा तन्हेनं त्या पोहू लागल्याचे पाहून, नाना त्या सौदागराला म्हणाले, "ती पुढं होऊन पोहते आहे ती आई आणि तिच्या मागोमाग पोहत जाणारी तिची लेक आहे" "कशावरून?" सौदागरानं प्रश्न केला. नाना म्हणाले. "जिला अनुभव जास्त आहे, ती प्रवाहातून पोहोताना पुढं झाली आहे. साहजिकच ती आई आहे, तर कमी अनुभव असलेली ती घोडी मागोमाग पोहत चालली आहे, ती पुढच्या घोडीची लेक आहे." नानांच हे म्हणणं अगदी रास्त असल्याचं त्या सौदागरानं मान्य केले व त्यांच्या चातुर्याबद्दल त्यानं त्या दोन्हीही घोड्या त्यांना तशाच बक्षीस देऊन, त्यांच्या कल्पक वृत्तीचं कौतुक केलं. 


→ सुविचार 

• सत्य हे एखाद्या दिव्याप्रमाणे असते, जे असत्याच्या अंधारात लपत नाही..



→ दिनविशेष -

 • कार्ल फ्रेडरिक विल्यम स्मृतिदिन १८९५ : मानवी रक्ताचा बाहेरून शरीरात पुरवठा करणे, त्याचे परीक्षण करणे, त्यायोगे मानवी जीव वाचविणे ही उपचारपध्दती आता प्रगत वैद्यक शास्त्रात खूपच सुलभ झालेली आहे. परंतु गेल्या शतकापर्यंत हे सर्वच अतिशय दुर्लभ होते. मानवी रक्तांसंबंधी महत्वाचे संशोधन जर्मन शास्त्रज्ञ कार्ल फ्रेडरिक विल्यम लुडूविख याने केले. यांचा जन्म वित्झेन हॉसर येथे दि. २९ डिसेंबर १८१६ मध्ये झाला. प्राध्यापक व शास्त्रज्ञ असणाऱ्या कार्लने 'मर्क्युरीअल ब्लड-गॅस पंप' शोधून काढला. त्यामुळे रक्तामधील वायुंचे मिश्रण दूर करून त्याचे परीक्षण करणे सुलभ झाले. रक्तप्रवाहाच्या शुध्दीकरणामध्ये आवश्यक असणारे प्राणवायूंचे महत्व याने सिध्द केले. ग्रंथीच्या अंत-स्त्रावासंबंधीही संशोधन केले. तसेच रूधिराभिसरणातील मज्जासंस्थेच्या कार्यासंबंधी अभ्यास केला. प्राण्यांच्या शरीरातून काही भाग काढून त्यातून कृत्रिम रक्तपुरवठा करून ते जिवंत ठेवण्याचा प्रयोग १८५६ मध्ये सर्वप्रथम यानेच केला. 


→ मूल्ये

• विज्ञाननिष्ठा, परिश्रम, अभ्यासूवृत्ती. 


→ अन्य घटना 

• जगप्रसिध्द नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म - १६१६.

•  पंडिता रमाबाई जन्मदिन - १८५८. म. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म १८७३.

 • लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगची स्थापना केली. - १९१६. 


→ उपक्रम - • मानवी रक्तगटासंबंधी माहिती सांगावी. 


- समूहगान

• राष्ट्र की चेतना का गान वंदे मातरम्... 


→ सामान्यज्ञान 

• इ. स. ४७६ च्या सुमारास आर्यभट्ट पहिला या भारतीय खगोलशास्त्रज्ञ व गणितीचा जन्म झाला. पृथ्वी आपल्याभोवती सतत फिरते; दैनंदिन गती आहे हे सांगणारा हा एकमेव भारतीय शास्त्रज्ञ. याने वर्षाचे एकूण दिवस ३६५, १५ घटी ३९ पळे, १५ विपळे इतक्या सूक्ष्मतेपर्यंत मोजले आहेत. याने 'पाय' ची किंमत ६२८३२/२०००० इथेपर्यंत दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा