Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

22 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

      22 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम गुरू तू... 

 

• श्लोक

•  -विचारैक्य मिळो चित्ती हृदयी एकता अशी की कार्ये तुमची व्हावी सुसंघटीत नीटशी ।। 

→ तुमचे (आमचे) विचार (आशा आकांक्षा) समान असोत. हृदयें व मनें यांची अशी एकता होवो की, त्यामुळे सर्व कार्यामध्ये सुसंघटितपणा येवो. 


→ चिंतन-

 आपल्या मनाची दारे-खिडक्या जो सदैव उपड्या ठेवतो त्याच्याच हृदयात ज्ञानाचा व प्रेमाचा प्रकाश खेळतो. 'अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल कराने' असे या सृष्टीचे गहन रूप आहे. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचा उगम, विकास आणि अंत यामागचे रहस्य समजून घेणे म्हणजे विज्ञान. त्यासाठी देवाने माणसाला दिलेल्या पंचज्ञानेंद्रियांचा आणि बुध्दीचा जागेपणी उपयोग करून घेतला तर माणसाला अधिकाधिक आणि नवनवीन माहिती कळेल, रहस्ये उलगडू शकतील. त्या नवीन माहितीच्या आकलनाने माणसाचे सृष्टीतील स्थान समजू शकेल आणि अपरिहार्यपणे दुसऱ्या जीवाबद्दलचे प्रेम वाढत जाऊ शकेल.


कथाकथन 

- 'महावीर जयंती' - साऱ्या जगाला प्रेम आणि शांती, अहिंसा आणि अपरिग्रह यांचा सनातन संदेश देणारे भगवान महावीर याच | पवित्र भूमित जन्माला आले. जैनात २४ तीर्थंकर झाले. त्यापैकी शेवटचे तीर्थकर वर्धमान महावीर होत. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी चातुर्याम धर्म सांगितला होता. तो अस्तेय, अहिंसा, सत्य व अपरिग्रह या चार तत्वांवर आधारलेला होता. त्यात महावीर यांनी ब्रम्हचर्याची भर घातली आणि तो पंचव्याधर्म झाला. स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाचा प्रसार करून, स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार दिला. त्या वेळच्या परिस्थितीनुसार महावीरांनी घेतलेला निर्णय फारच धाडसाचा होता. त्यांनी हिंसेला केलेल्या विरोधामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागातील हिंसा निषेधार्ह ठरवली. अशा या थोर धर्मवीराचा जन्म इसवी सनपूर्व सहाव्या शतकात मगधातील कुंडग्राम येथे झाला. बालपणापासून ते चिंतनशील होते. कालांतराने वैराम्यशील बनले. ते वर्धमानचे महावीर कसे झाले. याची एक गोष्ट आहे. महावीरांचे मूळ नाव वर्धमान होते. ते ज्ञानसाधनेसाठी जंगलात जात, जेथे शांतता आहे, तेथेच ज्ञानसाधना चांगली होऊ शकते. ते वृक्षाखाली साधनेला बसत, तेव्हा तेथील परिसराला एक वेगळेच चैतन्य येई. त्या जंगलातून फिरणारे पशू-पक्षी, | हिंस्त्र पशूसुध्दा त्यांच्या वाटेला कधी गेले नाहीत. त्यांच्या ज्ञानसाधनेला बाधा येऊ नये म्हणून पक्षीसुध्दा चिवचिवाट न करता शांत बसून राहात, तीच परिस्थिती पशूंची होती. ते ज्या वृक्षाखाली ज्ञानसाधना करीत बसले होते, त्या वृक्षालाच एकदा विषारी सर्पाने विळखा घातला होता. ते सर्पाला ठार मारू शकत होते, परंतु त्यांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता, सर्पाचे हिंसकत्वच नष्ट केले, त्या दिवसापासून लोक त्यांना 'महावीर' म्हणू लागले. वासनांचा आणि मोहांचा त्याग करून, त्यांच्यावर विजय मिळविणारे ते जितेंद्रिय होते. त्यांचा छळही झाला. परंतु त्यांनी न बोलता सहन केला. त्यांच्या मताचे महत्व अनन्यसाधारण आहे. जैन लोकांचा शाकाहार, अहिंसा आदि तत्वे सर्वांनाच हितकारक आहेत. आजच्या समाजात जैन लोक शांतीप्रिय व परोपकारी घटक मानले जातत. आपणही महावीर जयंतीदिनी आपल्या मनातील, हृदयातील हिंसा, द्वेष, असूया यांचा त्याग करून, त्यांच्या पवित्र चरणी विनम्र होऊ या.


सुविचार [- • कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये, कोणालाही पीडा देऊ नये. सत्य बोलावे, वृक्षा अभिमान बाळगू नये, सर्वांवर करावे, इंद्रियांवर ताबा ठेवावा, जातिभेद मानू नये महावीर • दृढ विश्वास हा महान कार्याचा जनक आहे. → दिनविशेष प्रेम • श्रीनिवासशास्त्री व्ही.एस. स्मृतिदिन-१९४६ : पुण्याच्या भारत सेवक समाजाचे अध्यक्ष, प्रसिध्द जी वक्ते, राज्यघटना शास्त्रज्ञ व सूक्ष्म बुध्दीचे राजकारणी. जन्म १८६९ मध्ये झाला. कुंभकोणम् येथील शिक्षण संपवून त्यांनी प्रथम शिक्षकाचे काम पत्करले. देशी, परदेशी खेळांतील प्रावीण्य व सर्व परीक्षांतील उज्ज्वल यश यामुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. नामदार गोखले यांच्याशी त्यांचा १९०७ च्या सुमारास परिचय झाला. त्यानंतर ते भारतसेवक समाजाचे सभासद (१९१०-२० ), मद्रास कायदेमंडळातील सरकारनियुक्त सभासद (१९१३-१५) झाले आणि त्यांच्या सामाजिक कार्याला प्रारंभ झाला. नामदार गोखले यांच्यानंतर ते भारतसेवक समाजाचे अध्यक्ष झाले (१९१५-२०). त्यांचे इंग्रजी वक्तृत्व अतिशय दर्जेदार होते. साम्राज्य परिषद, राष्ट्रसंघ वसाहतीमधील दौरा, वॉशिंग्टन परिषद, तीनही गोलमेज परिषदा यांसारख्या त्याच्या परदेशातील कार्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. भारताच्या अखंडत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी ते एक होते. शेवटी राजकारणावरून त्यांचे लक्ष रामायणासारख्या ग्रंथावर खिळून राहिले. मूळ संस्कृत रामायणाचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. तत्वनिष्ठ राजकारणामुळे त्यांच्याबद्दल सर्वोच्या मनात आदराची भावना वसत होती. 


मूल्ये - 

• राष्ट्रप्रेम, ध्येयनिष्ठा,


→ अन्य घटना

 • दिनकरराव जवळकर जन्मदिन - १९१२. 

 • वसुधरा दिवस १९७२

  • इतिहास संशोधक चंद्रनाम नारनवरे जयंती - १९१५.

   • जानकीदेवी बजाज यांचे निधन - १९७९. 

   • हर्षद मेहताने केलेले कोट्यवधी रूपयांचे गैरव्यवहार उघडकीस आले - १९१२. 


→ उपक्रम 

• वसुंधरा दिवसाबद्दल माहिती सांगणे. 


समूहगान - 

• दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए... 


→ सामान्यज्ञान -

• भारतामध्ये सस्तन प्राण्यांच्या ३५० जाती, पक्षांच्या १२०० जाती, तर कीटकांचे २००० हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी सस्तन प्राण्यांच्या ६६ जाती, पक्ष्यांच्या ३८ जाती, सरपटणाऱ्या व उभयचर प्राण्यांच्या १८ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वन्य जीवांच्या संरक्षणासाठी भारतात ५५ राष्ट्रीय उद्याने व २४७ अभयारण्ये आहेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा