Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

13 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

       13 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना 

- नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा ..  


→ श्लोक 

- विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्ये कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते ।। 

- विद्वता आणि राजेपण या गोष्टी कधीही समान नसतात. (कारण) राजाची पूजा त्याच्या देशात होते. परंतु विद्वानांची पूजा सगळीकडे होते. 


→ चिंतन- 

सज्जन माणूस आपल्या चांगल्या अंत:करणाच्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. सज्जन माणूस हा दयावान, माणुसकीला जपणारा, परोपकारी असतो. तो स्वार्थी नसतो म्हणूनच सभोवतालच्या सर्वांचाच सहानुभूतीने विचार करू शकतो. सज्जन, संतमहंतांच्या गोष्टीमधून याचे भरपूर दाखले आपल्याला पाहावयास मिळतात. वाळवंटात व्याकुळ झालेल्या गाढवाची तहान भागवणारे संत एकनाथ, गाडी भरून ऊस वाटेतल्या मुलांमध्ये वाटून टाकणारे संत तुकाराम अशी कितीतरी उदाहरणे! सज्जन माणसे ही झाडासारखी सहकारी, परोपकारी असतात.कथाकथन 

- 'जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन' - सन १९१९ मध्ये इंग्रज सरकारने माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर केल्या. भारतीय जनतेत फूट पाडणाऱ्या या सुधारणांमुळे भारतात सर्वत्र असंतोष निर्माण झाला होता. जनतेचा असंतोष दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारने रौलट अॅक्ट नावाचा काळा कायदा देशभर जारी केला. त्यामुळे तो असंतोष अधिकच उफाळला व इंग्रज सरकारचा निषेध गावागावातून होऊ लागला. या काळ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक सभा पंजाबच्या नेत्यांनी आयोजित केली होती. सभेला स्त्री-पुरुष व बालके मिळून सुमारे २० हजार लोक जमले होते. तो गुढीपाडव्याचा शुभ दिन होता. पंजाबचे नेते लाला हंसराज यांचे भाष सभेत चालू होते. या बागेभोवती चहुबाजुनी उंच भिंतीचे कंपाऊंड होते व एकच प्रवेशद्वार होते. ही सभा उधळून लावण्यासाठी जनरल डायर हा इंग्रज अधिकारी लष्कर घेऊन आला व सरळ गोळीबार करण्याची आज्ञा त्याने लष्कराला दिली. बागेच्या प्रवेशद्वारातून लष्कराचा अंदाधुंद गोळीबार असल्याने तेथून पळून जाण्यासही मार्ग नव्हता. त्या अमानुष गोळीबारात हजारो स्त्री-पुरुष व बालके मरण पावली व त्यापेक्षाही अधिक जखमी झाली. जखमींना पाणीसुद्धा मिळू शकले नाही. जनरल डायरने अमृतसरमध्ये लष्करी कायदा जारी केला. त्यानंतर अनेक दिवस पंजाबमध्ये त्याचे अत्याचा चालू होते. जनतेतील असंतोष दडपून टाकण्यासाठी त्याने हे जे हत्याकांड केले, अत्याचार केले त्याची बातमी इंग्रज सरकारने पंजाब बाहेर लवकर उ दिली नाही. जेव्हा पंजाबच्या बातम्या बाहेर पडल्या तेव्हा देशभरात इंग्रज सरकारच्या पाशवी राजवटीविरुद्ध असंतोषाचा डोंब जनतेत उसळल भारतभर इंग्रज सरकारचा निषेध कित्येक दिवस होत होता. त्या वर्षीच्या गुढीपाडव्याचा तो दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 'काळा दिवस' म्हणून ओळखला जातो. अशी कितीतरी निरपराध स्त्री-पुरुषांची व अजाण बालकांची क्रूरपणे हत्या इंग्रजांनी स्वातंत्र्यलडे दडपून टाकण्यासाठी केली आहे. या दिवशी बळी गेलेल्या त्या निरपराध जीवांच्या स्मृतीला आदरांजली वाहणे, हे आपले कर्तव्य आहे. (१३ एप्रिल) - (चालू) 


→ सुविचार 

• तुम्ही सर्वजण एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू नम्र मनाचे व्हा! 


→ दिनविशेष - 

• वसंत रामजी खानोलकर जन्मदिन - १८९५- वैद्यकीय प्राध्यापक व संशोधक. मनुष्याचे आरोग्य ग्रासणाऱ्या कॅन्सरसारख्या रोगावर त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे १९५० मध्ये ते अध्यक्ष होते. 'ए लुक अॅट कॅन्सर' हे त्यांचे पुस्तक विशेष महत्त्वाचे समजले जाते. अँटॉमिक रेडिएशनचे परिणाम शोधून काढण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी शंभराच्यावर संशोधन लेख प्रसिद्ध केलेले आहेत. १९५५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला. 


→ मूल्ये

 • सहृदयता, संशोधक वृत्ती


अन्य घटना

 • जालियनवाला बाग हत्याकांड घटना या दिवशी घडली - १९१९. 

 

→ उपक्रम -

 • विविध रोगांवर औषधे शोधणाऱ्या शास्त्रज्ञांची नावे व माहिती मिळवावी.

  • माणसाच्या मित्र किटकांची नावे मिळवावीत. 

  

→ समूहगान - 

• या भूमिचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान...


 → सामान्यज्ञान 

 • दुर्लक्षित असणारे व कानाकोपऱ्यात बसणारे कोळी प्रत्यक्षात माणसाचे मित्र आणि संहारक कीटकांचे शत्रू आहेत. मोठ्य प्रमाणावर ते संहारक कीटकांचा नाश करतात. त्यामुळे धान्यशेती, फुलशेती, वनशेती, जंगले यांचे संरक्षण होते. कोट्यावधी वर्षांपासून कोळी पृथ्वीवर अस्तित्त्वात आहेत. आपण घरात कोठेही बसलो तरी आजूबाजूच्या १-२ मीटर परिसरात एखादा तरी कोळी असतो. कोळी हिमालयावरदेखील असतात. परंतु अंटार्क्टिका खंडात कोळी नाहीत. • गुजराथमध्ये पालमपूर येथे हिऱ्यांना पैलू पाडण्याचे खूपच मोठे उद्योग चालतात. हा पारंपरिक शिकवणीचा, जोखमीचा, कौशल्याचा, चिकाटीचा व्यवसाय आहे. पण याचमुळे आज भारत हिऱ्यांना पैलू पाडून पुन्हा निर्यात करण्यात जगातील एक अग्रेसर देश बनला आहे.


वाणाचे घटक-सूत्र-शेकडा प्रमाण(आकारमानानुसार)

१. नायट्रोजन -N- 78.084

२. ऑक्सिजन-0-20.946

३. आरगॉन-Ar-0.934

 ४. कार्बन डायऑक्साइड-CO-0.033

  ५. निऑन-Ne-0.0018

   ६. हेलिअम -He-0.0000052 


,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा