Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १७ मार्च, २०२४

आठवी इतिहास 3.ब्रिटिश सत्तेचे परिणाम

    3.ब्रिटिश सत्तेचे परिणाम


स्वाध्याय

प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :

1. युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले होते ?

(1) 15 वे शतक

(2) 16 वे शतक

(3) 17 वे शतक

(4) 18 वे शतक

उत्तर-15 वे शतक

_____________

2. पोर्तुगीज,-------फ्रेंच व ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

(1) ऑस्ट्रियन

-(2) डच

(3) जर्मन

(4) स्वीडिश

उत्तर-डच

–---–---------------------------

3. पुढील घटना कालानुक्रमे लिहा :

(अ) वसईचा तह

(ब) सतीबंदीचा कायदा

(क) दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती

(ड) सालबाईचा तह

(1) (अ), (क), (ब), (ड)

(2) (ब), (क), (ड), (अ)

(3) (ड), (अ), (क), (ब)

(4) (क), (ड), (ब), (अ)

उत्तर-(ड), (अ), (क), (ब)

_____________________


4. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :

(1) 1782 - सालबाईचा तह

(2) 1818 - तैनाती फौजेचा करार

(3) 1848 - साताऱ्याचे राज्य खालसा

(4) 1884 – पिटचा भारतविषयक कायदा मंजू

उत्तर-1818 - तैनाती फौजेचा करार

________________________


5. पुढील घटना कालानुक्रमे लिहा :

(अ) सतीबंदीचा कायदा

(ब) रेग्युलेटिंग अॅक्ट

(क) पिटचा भारतविषयक कायदा

(ड) विधवा पुनर्विवाह कायदा

(1) (ब), (क), (अ) आणि (ड)

(2) (क), (अ), (ड) आणि (ब)

(3) (ड), (अ), (ब) आणि (क)

(4) (ब), (अ), (क) आणि (ड)

उत्तर-(ब), (क), (अ) आणि (ड)

_________________________

6. 1802 मध्ये -----केला. पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार

(1) थोरले बाजीराव

(2) सवाई माधवराव

(3) पेशवे नानासाहेब

(4) दुसरा बाजीराव

उत्तर-दुसरा बाजीराव

________________

7. इंग्रजांचे------- हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते.

(1) सूरत

(2) कोचीन

(3) गोवा

(4) मुंबई

उत्तर-मुंबई

_______

8.1782 साली संपले. तह' होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध

(1) वडगावचा

(2) वसईचा

(3) सालबाईचा

(4) अहमदनगरचा

उत्तर-सालबाईचा

______________

9. इंग्रज-मराठे यांच्यात दुसरे युद्ध झाले; कारण

(1) सालबाईचा तह झाल्यामुळे

(2) वसईचा तह काही मराठा सरदारांना मान्य नसल्याने

(3) इंग्रजांचा हस्तक्षेप असह्य झाल्याने

(4) इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव झाल्याने

उत्तर-वसईचा तह काही मराठा सरदारांना मान्य नसल्याने

______________________

10. इ. स. 1774 ते 1818 यांदरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात एकूण किती युद्धे झाली ?

 (1) दोन

(2) तीन

(3) चार

(4) पाच

उत्तर-तीन

________

11. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली ?

(1) लॉर्ड वेलस्ली

(2) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(3) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

(4) लॉर्ड कर्झन

उत्तर-लॉर्ड वेलस्ली

______________

12. पुढीलपैकी बरोबर जोडी ओळखा :

(1) 1773 - पिटचा कायदा

(2) 1765 – रेग्युलेटिंग अॅक्ट

(3) 1798 – तैनाती फौज पद्धत

(4) 1784 - दुहेरी राज्यव्यवस्था

उत्तर-1798 – तैनाती फौज पद्धत

_______________________

13. तैनाती फौजेशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा :

(1) इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) राजांनी आपल्या पदरी बाळगावा.

(2) लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम दयावी.

(3) महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने करावे.

(4) भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे.

उत्तर-महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने करावे.

_______________________

14. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांच्याशी तह करून------या अधिकाऱ्याची छत्रपतींचे मदतनीस म्हणून नेमणूक केली. 

(1) ग्रँड डफ

(2) लॉर्ड वेलस्ली

(3) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(4) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

उत्तर-ग्रँड डफ

___________

15. 1848 साली लॉर्ड डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून --------हे राज्य खालसा केले.

(1) पुणे

(2) कोल्हापूर

(3) सांगली

(4) सातारा

उत्तर-सातारा

__________

16. 1827 साली-------यांनी राजनीतीविषयक 'सभानीति' या नावाचा ग्रंथ छापून घेतला.

(1) दुसरा बाजीराव

(2) रंगो बापूजी गुप्ते

(3) छत्रपती शिवाजी महाराज

(4) छत्रपती प्रतापसिंह

उत्तर-छत्रपती प्रतापसिंह

___________________

17. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी कोण होते ?

(1) दुसरा बाजीराव

(2) रंगो बापूजी गुप्ते

(3) तात्यासाहेब टोपे

(4) दौलतराव शिंदे

उत्तर-रंगो बापूजी गुप्ते

_________________

18. छत्रपती प्रतापसिंह यांनी------ असा रस्ता बांधला.

(1) सातारा - वाई-प्रतापगड

(2) सातारा- महाबळेश्वर-प्रतापगड

(3) सातारा - पुणे- प्रतापगड

(4) सातारा - -कोल्हापूर - प्रतापगड

उत्तर-सातारा- महाबळेश्वर-प्रतापगड

_________________

19. संस्कृत, मराठी व इंग्रजी शिकण्यासाठी सातारा येथे पाठशाळा कोणी बांधली ?

(1) दुसरा बाजीराव

(2) छत्रपती प्रतापसिंह

(3) छत्रपती शिवाजी महाराज

(4) रंगो बापूजी गुप्ते

उत्तर-छत्रपती प्रतापसिंह

__________________

20. बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू करणारा------

(1) रॉबर्ट क्लाइव्ह

(2) लॉड मेकॉले

(3) लॉर्ड वेलस्ली

(4) ग्रँड डफ

उत्तर-रॉबर्ट क्लाइव्ह

________________

21. भारतातील बंगाल प्रांतात रॉबर्ट क्लाइव्हने -------   मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली.

(1) इ. स. 1773

(2) इ. स. 1765

(3) इ. स. 1782

(4) इ. स. 1848

उत्तर- इ. स. 1765

________________

22. 1773 च्या रेग्युलेटिंग अॅक्टनुसार बंगालचा गव्हर्नर-जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(1) लॉर्ड वेलस्ली

(2) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(3) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज 

(4) लॉर्ड कर्झन

उत्तर-लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

____________________

23. भारतात पहिला गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा.

(1) लॉर्ड वेलस्ली

(2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

(3) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(4) लॉर्ड बेंटिंक

उत्तर-लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

____________________

24. रेग्युलेटिंग अॅक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्जला -------इलाख्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला.

(1) मुंबई - कलकत्ता

(2) कलकत्ता-मद्रास

(3) मुंबई- मद्रास

(4) मुंबई- अहमदाबाद

उत्तर-मुंबई- मद्रास

________________

25.कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण आणणारा कायदा------

(1) रेग्युलेटिंग अॅक्ट

(2) पिटचा भारतविषयक कायदा

(3) दुहेरी राज्यव्यवस्था

(4) तैनाती फौजेचा करार

उत्तर-पिटचा भारतविषयक कायदा

_____________________

26. मुलकी नोकरशाहीचा प्रमुख उद्देश-----

(1) भारतात व्यापार करणे

(2) भारतात सत्ता दृढ करणे

(3) भारतातील प्रदेशांचे रक्षण करणे

(4) महसूल गोळा करणे

उत्तर-भारतात सत्ता दृढ करणे

________________________

27. भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती करणारा-----

(1) लॉर्ड मेकॉले

(2) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

(3) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(4) लॉर्ड डलहौसी

उत्तर-लॉर्ड कॉर्नवॉलिस

________________

28. मुलकी नोकरशाहीशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा :

(1) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये.

(2) अधिकारी पदावरील व्यक्ती आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण असावा.

(3) जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला जाईल.

(4) महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे होता; तर शांतता-सुव्यवस्था राखणे हे काम नवाबाकडे असेल.

उत्तर-महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे होता; तर शांतता-सुव्यवस्था राखणे हे काम नवाबाकडे असेल.

________________________

29.-------यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायदयाची संहिता तयार केली.

(1) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(2) लॉर्ड मेकॉले

(3) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज

(4) रॉबर्ट क्लाइव्ह

उत्तर-लॉर्ड मेकॉले

_______________

30. इंग्रज कायदेपद्धती वैशिष्ट्यांशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा :

(1) कायदयासमोर सर्व समान हे तत्त्व लागू केले..

ळ्

(2) लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली विधिसमितीने कायदयांची संहिता तयार केली होती..

(3) नवे कायदे सामान्य लोकांना समजत नव्हते.

(4) जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.

उत्तर-जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.

________________________

31. इंग्रजांच्या राजवटीतील जमीन महसूलविषयक धोरणासंबंधित नसलेला पर्याय ओळखा :

(1) जमिनीची मोजणी करून क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी केली.

(2) इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला.

(3) शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती केली.

(4) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी महसूल पद्धती सुरू केली.

उत्तर-इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला.

______________________

32. 'शेतीचे व्यापारीकरण' या संबंधित नसलेली बाब पुढील पर्यायांपैकी कोणती?

(1) अन्नधान्याच्या उत्पन्नाऐवजी नफा मिळवून देणारी नगदी पिके घेणे.

(2) कापूस, नीळ, तंबाखू, चहा यांसारखी पिके घेणे.

(3) शेतीत उत्पादित होणारे अन्नधान्य घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी वापरणे.

(4) इंग्रजांनी नगदी पिके घेण्यास उत्तेजन दिले.

उत्तर-शेतीत उत्पादित होणारे अन्नधान्य घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी वापरणे.

______________________

33. भारतातील वाहतूक व दळणवळण सुधारणांमधील भारतातील पहिला महामार्ग कोणता ?

(1) कलकत्ता - मुंबई

(2) कलकत्ता- दिल्ली

(3) दिल्ली - मुंबई

(4) कलकत्ता-मद्रास

उत्तर-कलकत्ता- दिल्ली

_________________

34. 1853 साली या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली.

(1) मुंबई - दिल्ली

(2) पुणे - मुंबई

(3) मुंबई-ठाणे

(4) मुंबई - कलकत्ता

उत्तर-मुंबई-ठाणे

____________

35. 'वाहतूक व दळणवळण व्यवस्था' या संबंधित नसलेली बाब पुढील पर्यायांपैकी कोणती ?

(1) लोकांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली.

(2) शहरे व लष्करी ठाणी जोडली गेली..

(3) इंग्लंडच्या धर्तीवर भारतात न्यायालये स्थापन करण्यात आली.

(4) महामार्ग व रेल्वेमार्ग सुरू केले.

उत्तर-इंग्लंडच्या धर्तीवर भारतात न्यायालये स्थापन करण्यात आली.

_____________________

36. 1854 मध्ये------ यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.

(1) जमशेदजी टाटा

(2) रतनजी टाटा

(3) कावसजी नानाभॉय दावर

(4) जमशेदजी जीजीभॉय

उत्तर-कावसजी नानाभॉय दावर

____________________

37. 1855 मध्ये बंगालमधील----- सुरू झाली. येथे तागाची पहिली गिरणी

(1) कोलकाता

(2) रिश्रा

(3) हुगळी

(4) ढाका

उत्तर-रिश्रा

________

38. जमशेदजी टाटा यांनी ------येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलादनिर्मितीचा कारखाना स्थापन केला.

(1) मुंबई

(2) कोलकाता

(3) जमशेदपूर

(4) रिश्रा

उत्तर-जमशेदपूर

____________

39. विल्यम जोन्स याने -------. साली कोलकाता येथे 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल' या संस्थेची स्थापना केली.

(1) 1774

(2) 1784

(3) 1802

(4) 1827

उत्तर-1784

________

40. ब्रिटिश राजवटीत भारतीय कारागिरांच्या उदयोगांचा -हास झाला; कारण--------

(1) कारागिरांचे कौशल्य कमी दर्जाचे होते.

(2) कारागिरांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा होता.

(3) कारागिरांना भांडवल पुरवठा उपलब्ध नव्हता.

(4) ब्रिटिश आयात मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेले.

उत्तर-ब्रिटिश आयात मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेले.

_______________________

41. ब्रिटिशांनी भारतात दळणवळण वाहतूक सुरू केली;

कारण-------

(1) भारतातील कच्चा माल बंदरांपर्यंत वाहून नेण्यासाठी

(2) ब्रिटिश पक्का माल देशभराच्या बाजारपेठांत पोहोचवण्यासाठी

(3) भारतीयांचा प्रवास सुविधेसाठी

(4) ब्रिटिश व्यापारवाढीकरिता आणि प्रशासनाची सोय व्हावी यासाठी

उत्तर-ब्रिटिश व्यापारवाढीकरिता आणि प्रशासनाची सोय व्हावी यासाठी

___________________

42. जर्मन विचारवंत------ यांचा गाढा अभ्यासक होता. हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास

(1) मॅक्सम्युलर

(2) जॉन स्टुअर्ट एल्फिन्स्टन

(3) लॉर्ड मेकॉले

(4) विल्यम जोन्स

उत्तर-मॅक्सम्युलर

_____________

43. 1829 मध्ये----- याने सतीबंदीचा कायदा केला.

(1) लॉर्ड डलहौसी

(2) लॉर्ड बेंटिंक

(3) लॉर्ड रिपन

(4) लॉर्ड मेकॉले

उत्तर-लॉर्ड बेंटिंक

_____________

44. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा -------याने केला.

(1) लॉर्ड डलहौसी

(2) लॉर्ड बेंटिंक

(3) लॉर्ड ॲम्हर्स्ट

(4) लॉर्ड रिपन

उत्तर-लॉर्ड डलहौसी

_______________

45. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस कोणी केली?

(1) लॉर्ड बेंटिंक

(2) लॉर्ड डलहौसी

(3) लॉर्ड मेकॉले

(4) लॉर्ड रिपन

उत्तर-लॉर्ड मेकॉले

_______________

46. इ. स. मध्ये मुंबई, मद्रास (चेन्नई) व कलकत्ता विद्यापीठांची स्थापना करण्यात आली..

(1) 1853

(2) 1857

(3) 1855

(4) 1907

उत्तर-1857

__________

47. पुढील पदातील समान संबंध ओळखा :

लॉर्ड डलहौसी : विधवा पुनर्विवाह :: ? : सतीबंदी

(1) लॉर्ड बेंटिंक

(2) लॉर्ड कॉर्नवॉलिस

(3) लॉर्ड वेलस्ली

(4) लॉर्ड रिपन

उत्तर-लॉर्ड बेंटिंक

____________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा