Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

29-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

29-जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

- मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच सेवा...

श्लोक

अमर शहीदों का यह वन्दन । वीर सपूतों का अभिनंदन वसुन्धरा का यह गौरव है। इपकृत इससे हैं जन जन गूँज रहा नभ - मण्डल सारा । अमर रहे गणतंत्र हमारा. दैनंदिन शालेय परिपाठ 

 अमर हुतात्म्यांनी या प्रजासत्ताकाला वंदन करूनच आपले प्राण दिलेले आहे. भारत मातेच्या त्या वीर सुपुत्राचे अभिनंदन आम्ही करतो. हे जासत्ताक या पृथ्वीवरचे एक गौरवशाली राज्य आहे. सारे भारतीय त्याच्या योगाने उपकृत झालेले असून सर्वत्र त्याचा जयघोष चालू आहे त्याने आकाश दुमदुमून गेले आहे. हे प्रजासत्ताक अमर होवो.

 → चिंतन 

 - देवा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही, तो स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थितील मी बदलू शकते, ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे. आणि अशा परिस्थितीचा भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. 

→ कथाकथन 

- वाचनाचे वेड' - चीनमध्ये क्वांग हंग नावाचा एक लहान मुलगा होता. त्याला वाचनाचा खूप नाद होता. 'वाचाल तर वाचाल' किंवा ग्रंथ आपले गुरु' हे त्याला कोणी न सांगताच पटले होते. तो मिळेल तेथून चांगली - चांगली पुस्तके आणीत असे व ती वाचून काढीत असे पुस्तक वाचतांना त्याला अतिशय आनंद होत असे. पुस्तकं त्याला तहान भुकेचाही विसर पाडत असे. परंतु त्याची परिस्थिती अगदी गरिबीची होती. त्यामुळे पुस्तके विकत घेऊन वाचणे त्याला शक्यच नव्हते. क्वांग एका प्राध्यापकांच्या घरी काम करीत असे. त्या प्राध्यापकांच्याकडे खूप पुस्तके होती. स्वाग कामाचे पैसे न घेता त्याऐवजी त्यांच्याकडची पुस्तके आणून वाचत असे. परंतु क्वांगची पुस्तके वाचण्याची हौस काही पुरी होत नव्हती. पुस्तके मिळविण्यासाठी त्याला दिवसा काम करावे लागत होते. त्यामुळे वाचनासाठी त्याला मोकळा वेळ फार मिळत नसे. आणि रात्री वाचन करावे तर त्याच्या घरी दिवा नसे. पण, इच्छा असली की मार्ग सुचतोच, सगळ्या अडचणी दूर होतात, हेच खरे. दिव्याचा विचार करता करता त्याला | एक युक्ती सुचली. त्याच्या शेजारीच एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या घरात अगदी मध्यरात्रीपर्यंत मोठ-मोठे दिवे जळत असत. क्वांगने मग केली एक युक्ती त्याने आपल्या घराच्या व शेजारच्या घराच्यामागे जी भिंत होती त्या भिंतीला एक बारीकसे छिद्र पाडले. रात्री दिवे लागले की, त्या छिद्रातून प्रकाश येत असे. क्वांग पुस्तक हातात घेऊन उभा राही व त्या छिद्रातून येणाऱ्या मंद प्रकाशात पुस्तक वाचून काढी, हे त्याचे वाचनाचे वेड त्याला मोठेपणी फार उपयोगी पडले. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असूनही क्वांग काबाडकष्ट करून खूप शिकला, मोठा झाला, मोठेपणी हा चीनमध्ये एक प्रसिध्द ज्ञानी, विचारवंत म्हणून ओळखला जात असे. याला कारण होते त्याचे लहानपणाचे वाचनाचे वेड. 

→ सुविचार : 

• वाचाल तर वाचाल • शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन आवश्यक आहे. • वाचन हे मनाचे अन्न आहे • वाचन सर्व शिक्षणाचा पाया आहे. • वाचनामुळे व्यक्ती विद्वान व चारित्र्यसंपन्न होऊ शकते. • वाचन ही जन्मभर पुरून उरणारी शिदोरी आ • आपले वाचन हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. • वाचनामुळे मनुष्यास आकार येतो. सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आ | लिखाणामुळे तो सर्वांगीण होतो.

दिनविशेष 

निवृत्तीनाथ यांचा जन्मदिन १२७३ - निवृत्तीनाथ यांचा जन्म शके ११९५ प्रतिपदा म्हणजे २९ जानेवारी १२७३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. निवृत्तीनाथ सर्वांत बडीत, 'संन्याशाची मुले' ना भाचा फार छळ झाला. लहानपणी चुकून निवृत्तीनाथ अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले. तेथे गहिनीनाथ तपश्चर्या करीत होते. त्यांच्या पायावर | लोटांगण घालून निवृत्तीनाथ त्यांचे शिष्य झाले. त्यांनी निवृत्तीनाथांना श्रीकृष्णाची उपासना करण्याची, नाथ पंथाची दीक्षा दिली आणि नामस्मरणाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. लहान वयात त्यांना प्राप्त झालेले ज्ञान, बोध त्यांनी ज्ञानदेवादि भावंडांना दिला. ज्ञानदेवांना गीतेवर टीका करण्याची प्रेरणा दिली. ज्ञानदेवांनीही आपल्या गुरुचा गौरव ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी भावपूर्ण शब्दात केला आहे. निवृत्तीनाथांचे ४०० अभंग उपलब्ध असून त्यातील योग काही अद्वैतपर तर काही कृष्णभक्तीपर आहेत. 

→ मूल्ये 

-• बंधुता, आदरभाव

→ अन्यघटना 

कोलंबस स्मृतिदिन - १५०६

 • मराठीतील प्रसिध्द कवी दासोपंत देशपांडे यांचे निधन - १६१६ 

 • रामकृष्ण मिशन या संस्थेची १९३९

  • भारताच्या उत्तर व दक्षिण टोकांना जोडणारी दिल्ली ते मद्रास ही तामिळनाडू एक्सप्रेस सुरु करण्यास आली→ उपक्रम - 

 • हरिपाठातील अभंग शिकवावेत. • निवृत्तीनाथांचे काही अभंग शिकवावेत. • पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना...

→ समूहगान - 

• पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना...


→ सामान्यज्ञान -

 • जगातील प्रमुख • संस्थापक - गौतमबुद्ध. • उमगस्थान भारत ख्रि. पूर्व सुमारे ५०० वर्षे. 

• ग्रंथ त्रिपिटक. • पवित्र स्थळे - लुम्बिनी, • संस्थापक - येशू ख्रिस्त. • इगमस्थान पॅलेस्टाईन सुमारे २००० वर्षांपूर्वी. • ग्रंथ बायबल • पवित्र स्थळ (अ) बौद्ध धर्म बुद्धगया. (ब) ख्रिस्त धर्म • व्हॅटिकन सिटी. (क) हिंदू • संस्थापक नाही. स्थापना ख्रि. पूर्व सुमारे १५०० २००० च्या सुमारास • ग्रंथ रामायण, वेद, - महाभारत, भगवद्गीता • पवित्र स्थळ - काशी. (ड) इस्लाम -• संस्थापक - महंमद पैगंबर. • उगमस्थान अरबस्तान, ७ व्या शतकात. • ग्रंथ कुराण • पवित्र स्थळ मक्का. (इ) यहुदी (ज्यु-ज्युडाइझम्) -• संस्थापक मोझेस • उगमस्थान पॅलेस्टाईन ख्रि. पूर्व - - • जेरूसलेम. (ई) जैन • संस्थापक भगवान महावीर • उगमस्थान - १३०० वर्षे. • ग्रंथ - तोराह. • पवित्र स्थळ भारत सुमारे २००० वर्षापूर्वी • ग्रंथ अरण्यसूत्र, उत्तराध्यनमूत्र, आगम • पवित्र स्थळे पारसनाथ (बिहार), पावापुरी, श्रवणबेळगोळ (के) शीख- • संस्थापक •गुरू नानक, • उगमस्थान - पंजाब, १६ व्या शतकात. • ग्रंथ - ग्रंथसाहेब • पवित्र स्थळ - अमृतसर. (ड) कन्फ्यूशिया- नियम • संस्थापक - कन्फ्युशियस. उगमस्थान चीन ख्रि. पूर्व ५०० वर्षे. • ग्रंथ धार्मिक तत्त्वे. • पवित्र स्थळ - बीजिंग (पेकिंग)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा