Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

26 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 २६ डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना 

- सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो... 


श्लोक 

- प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौशल्या, देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथी ॥ - ग्रामगीता 

- भक्त प्रल्हादाची आई कयाधु, छत्रपती शिवाजीमहाराजांची आई जिजाबाई, रामाची आई कौशल्या, कृष्णाची आई देवकी या सर्व माता ग्रंथात वंदनीय ठरल्या आहेत. 10 चिंतन-

  दुसऱ्याच्या श्रमांवर जगू नका. काहीतरी मंगल, सुंदर, हितकर निर्माण करा. तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. भरपूर कष्ट करा. अथक परिश्रम ही माणसाने केलेली उत्तम गुंतवणूक आहे. कामावर प्रेम केल्याने कामातील नैपुण्य संपादन करण्यातले खरे सुख कळते. मार्गातील अडथळ्यांना तोंड देऊन यशस्वी होता येते. परंतु यशस्वी व्हायचं असेल तर नुसते ज्ञान असून भागत नाही. ज्ञानाबरोबरच शहाणपण आणि मुत्सद्देगिरीही जवळ असावी लागते.कथाकथन

 'कडू कमंडलू' भारतीय की युद्ध सतत अठरा दिवस चालू होते. अखेर कौरव हरले. पांडवले तरी रहते चांगले चांगले बोद्धे मारले गेले. अभिमन्यूचा मृत्यू तर सर्वांनाच जाणवत होता. धर्म हातून फार मोठे पाप झाले असे त्याला वाटू लागले. तो विलक्षण खिन्न झाला. अखेर त्याने मनाच्या समाधान भीम, नकुल, सहदेव साच्या भावंडांना त्याने आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला, "ला प यानी माना डोलावल्या पण अर्जुन काहीच बोलला नाही. "का बाबा! तू गप्प का?" धर्मराजाने विचारले. "काही नाही दादा, मी विचार आहे." "कसला विचार करतोस? सर्वात जास्त माणसे तूच ठार मारलीस आणि आता विचार कसला करतोस?" धर्मराज काही वैतागाने "रागावू नका दादा! पण श्रीकृष्ण आपल्याबरोबर येतील तर अधिक चांगले होईल असे मला वाटते." "तो कसला येणार? लुच्चा "भीम म्हणाला "पण विचारायला काय हरकत आहे?" नकुलाने प्रश्न केला. "तो येणार नाही." भीमाने आपले स् आहे. काही तरी युक्ती काढील आणि वाटाण्याच्या अक्षता लावील. पहा पाहिजे तर विचारून." अखेर सर्वानुमते श्रीकृष्णाला भेटायचे पाचही पांडव द्वारकेत पोचले. साऱ्यांना पाहून श्रीकृष्ण विचारात पडला. ही ब्याद इकडे का? भीम तर घुश्यातच होता. अर्जुन विचारात होता. सहदेव स्तब्ध उभे होते. अखेर धर्मानि आपला बेत सांगितला. श्रीकृष्ण मोठ्याने हसला. तो हसला म्हणजे श्रीम नेहमी सामने की त्याच्या मनात विचार आला. "बाबांनो! माझ्यासमोर कामाचा ढीग पडला आहे. द्वारकेची सारी घडी विस्कटली आहे. मला काही दिवस इथेच राहिले पाहिजे. काही तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही." श्रीकृष्णाने आपली असमर्थता व्यक्त केली. "मी सांगत नव्हतो तुम्हाला." भीम धर्मराजाला म्हणाला. "मी एक कमंडलू देतो. ज्या ज्या तीर्थक्षेत्री तुम्ही स्नान कराल त्या त्या तीर्थक्षेत्रात तो तुम्ही बुडवून काढा. श्रीकृष्ण म्हणाला. अर्जुनाला आनंद त्याने तो कमंडलू घेतला आणि सर्व पांडव तीर्थक्षेत्राला निघाले. वाराणसी केदारनाथ-बद्रिनाथ रामेश्वर अनेक सी करीत करीत अखेर पांडव पुन्हा इरकेत पोचले. धर्मराजाने तो कमंडलू श्रीकृष्णाला परत दिला आणि सांगितले, “घे बाबा! आम्ही ज्या ज्या ठिकाणी स्नान केले. त्या त्या सर्व ठिकाणी याला स्नान घातले. तीर्थक्षेत्रात बुडवून आणले." "फार छान! फार चांगले काम केलेत तुम्ही!!" श्रीकृष्ण हसत म्हणाला. मग तो कडू दूध भोपळ्याचा कमंडलू कृष्णाने आणि सर्वांना प्रसादासाठी थोडा थोडा तुकडा खायला सांगितला. श्रीकृष्णाने दिलेला प्रसाद तो! कोण नाकारणार ? सर्वांनी तो खाड़ा. अगदी सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. भीमाला अगदी राहवेना. तो संतापून म्हणाला, "तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागलो. कमंडलूला तीर्थयात्रा पडविली. तरी तो कडू कमंडलूच आम्हाला प्रसाद म्हणून देतोस ? कमाल आहे बुवा तुझी!" श्रीकृष्ण म्हणाला, "बाबांनो! इतक्या पवित्र ठिकाणी स्नान करूनही त्याचा कडवटपणा गेला नाही हे आश्चर्य आहे." नद्यांत स्नान करून कडवटपणा कसा जाईल?" धर्मनेि प्रश्न केला. "का जाऊ नये? नद्यांत तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने जर तुमची पापे धुतली जातात तर मग या कमंडलूचा कडवटपणा का जाऊ नये?" श्रीकृष्णाने विचारले, "हृदयात करुणेचा अथांग सागर असल व पश्चातापाने त्यात आंघोळ केली की देह शुद्ध होतो. 'मन चंगा तो कठौती में गंगा' हे विसरू नको." श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले. 10]सुविचार

 • हसा आणि हसवा, पहा आणि शोधा, विचारा आणि विचार करा, शिका आणि शिकवा

 • 

. दिनविशेष

 • ख्रिस्तजन्माचा दुसरा दिवस - ख्रिस्तजन्म झाल्यानंतरचा दुसरा दिवस आनंदाने साजरा करतात. ख्रिस्तजन्माच्या आनंदाप्रीत्यर्थं लोक एकमेकांच्या घरी जाऊन आनंद लुटतात. आपसातील मतभेद, दुःख, दैन्य विसरून मौजमजा करतात. जीवनातील आनंदाला सामोरे जा असा संदेश देणारा हा सण.

मूल्ये -

0 प्रेम, करुणा, आनंद


अन्य घटना - 

• ग्राहक दिन 

• प्रसिद्ध हिंदी लेखक प्रभाकर माचवे जन्मदिन -१९१७.


 उपक्रम 

• इतर धर्मीयांचे सण समारंभ जाणून घ्या. सर्व धर्मीयांचा मिळून एक सण साजरा करा.


समूहगान 

 ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा... 


 सामान्यज्ञान -

  • जगातील पहिले नाताळ शुभेच्छा कार्ड सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पाठविले गेले. या कार्डाच्या एक हजार प्रती काढल्या होत्या. पैकी १५ अस्तित्वात असून लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ही कार्डे ठेवली. लिथोग्राफी या तंत्राने ही कार्डे छापली होती. हेन्री कोलू या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपला चित्रकार मित्र वॉलकॉट होर्सले याच्याकडून ही कार्डे तयार करुन घेतली होती. 10] 

. युरोप खंड हे एक तुलनेने लहान खंड. तेथील लोकसंख्या सुमारे पन्नास कोटी असून दर चौ. कि.मी. मध्ये सरासरी सत्तर लोक राहतात. आल्पसू ही युरोपमधील उंच पर्वतराजी तर कॉकेशस पर्वतातील माउंट एलब्रास हे त्यातील सर्वोच्च शिखर, युरोपमध्ये अनेक छोट्या मोठ्या सामुद्रधुन्या व बेटे आहेत. वर्षभर अधुनमधून पडणारा पाऊस हे युरोपचे वैशिष्ट्य. समुद्राने वेढलेली बेटे असल्याने दर्यावर्दी जीवनावर विशेष भर. जर्मन, रशियन, लॅटिन या मुख्य तीन भाषांगधून इतर भाषा निर्माण होत गेल्या आहेत. जर्मन भाषेतून डच, डॅनिश, स्विडीश, इंग्लिश तर रशियन भाषेतून पोलिश, बल्गेरियन, झेक, स्लोव्हाक, सर्व, क्रोट, स्लाव्ह या भाषा; तर लॅटिनमधून स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, रोमन या भाषा तयार झाल्या असाव्यात असे मानले जाते. विसाव्या शतकात संपूर्ण जगभर या खंडाचे वर्चस्व होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा