Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

16 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठप्र

 ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान... 


श्लोक -

 सहकार्याची प्रबल भावना | हेथि शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा सहकार्यावाचोनि शिक्षणा । महत्व नाही जनसेवेचे प्रमाणपत्र । त्यासि महत्व याचे सर्वत्र उद्याचे कष्ट, आजचे कन्या पुत्र समजोनि त्यांना सुधारावे - ग्रामगीता सहकार्याची प्रबळ भावना हेच शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणले पाहिजे. सहकार्या वाचून शिक्षणाला महत्व नाही. जनसेवेचे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. आजचे कन्या - पुत्र हे उद्याचे राष्ट्र समजून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न व्हावा नुसते उच्च शिक्षण नको. उच्च शिक्षण आता मागच्या युगात लुप्त झाले. आता भारताचा सुपुत्र हा कष्टिक व्हावा. बलवान व्हावा. शिक्षणातच जीवनाचे काम असावे. शिक्षण आणि काम या दोन्हींची उत्तमरित्या सांगड घालता आली पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर भोजनाची चिंता करण्याची गरज नाही. भीक मागण्याची पाळी येणार नाही.


 → चिंतन

  - मुले अगदी उत्सुकतेने गोष्टी का एकतात? ज्या वेळी प्रत्यक्ष वातावरणच कल्पनाशक्तीच्या भरारीला विलक्षण हातभार लावणारे ठरते, अशी संधीप्रकाशाची वेळ मुलांना का आवडते? गोष्टींमुळे कोणत्याही मुलांचे भाषासामर्थ्य का वाटते आणि त्यांच्या विचार प्रक्रियेला बळकटी का येते? कारण, गोष्टीतील प्रतिमांभोवती भावनात्मकतेचे एक रंगपटल निर्माण होत असते. गोष्टीतील शब्द मुलांच्या कल्पनेत वास करून राहतात. अद्भुततेने रंगलेले शब्द ऐकताच किंवा उच्चारताच मुलांचे श्वास रोखले जातात. मुलांनी गोष्टी केवळ ऐकल्याच पाहिजेत असे नव्हे, तर आपल्या कल्पनेच्याव्दारे गोष्टी रचल्याही पाहिजेत.

कथाकथन -

 'अढळ श्रध्दास्थान' - मुलांनो, आपल्या आईचे जसे आपल्या आईवर नितांत प्रेम आणि श्रध्दा असते तसेच सहान वयात तर जाईच मुलांची सारसर्वस्य असते. मायेची माऊली तू सुखाची साऊली । म्हणूनि जगाने तुझी थोरवी गायिली ॥ एका आईव्यतिरिक्त मुलांना कोणीही नको असत्ते. दोडक्यात काय तर मुलगा किंवा मुलगी सज्ञान होईपर्यंत आईच त्यांचे जीवन व्यापून असते. मुले मोठी होऊ लागतात. नवी मित्रमंडळी त्यांना भेटतात. मुलांच्या गरजा बदलतात. छंद बदलतात, त्यांच्या जगण्याच्या दिशा बदलतात. मुले जशी जशी मोठी होऊ लागतात तशी तशी जाणीव बदलू लागते. लहानपणी आईने व्यापलेले जे विश्व असते ते विश्वच मोठे होते. खरे तर हा काळाचा महिमा आहे. मुलांचे स्वभाव बदलतात हे सत्य नाकारता येत नाही. कवयित्री ऊर्मिला ढाकरे यांच्या कवितेत म्हटले आहे की, सर्व गुन्हे माफ होतील ते आईच्याच हृदयी । सांगते पुन्हा तुला रे पुन्हा आई न मिळे जगी । आईचे प्रेम न मिळे पाप तयाने केलेची आश्चर्याची गोष्ट ही आहे की आईचे प्रेम मात्र अतूटच असते. एका मुलाव्यतिरिक्त तिच्याही मानसिक विश्वात | अनेकांनी प्रवेश केलेला असतो. परंतु आई आपल्या मुलाला मात्र क्षणभरही विसरत नाही. हे सत्य शिल्लकच राहते. जसा अमर्त्य देव शाश्वत आहे तसे आईचे प्रेमसुध्दा शाश्वतच आहे. मुलांचे आईप्रेम मात्र शाश्वत राहील की नाही हे कधी सांगता येत नाही. विशेषतः मुलांची लग्नकार्ये पार पडली की त्यांचे। आयुष्यथ पार बदलून जाते. खूप वेळेला असा अनुभव येतों की मुलांची लहानपणी असलेली आईची ओढ पुढे पूर्णपणे संपुष्टात येते. आपण आज जे घडतो आहोत, स्वतःच्या पायावर उभे आहोत याचे सारे श्रेय आपल्या आईलाच फक्त द्यायला हवे, याची जाणीव हळूहळू कमी होत जाते हा सार्वत्रिक अनुभव आहे. समाजात वावरताना फार थोडे मातृभक्त भेटतात. त्यांचे आईवेड खरे तर कधी कधी पराकोटीला पोहचलेले असते. कारण त्यांच्या पाशी विवेक असतो. अवळ श्रध्दा असते. मातेची महती आणि थोरवी त्यांना खऱ्या अर्थाने कळलेली असते म्हणून तर ते आईला आणि तिच्या प्रेमाला क्षणभरही विसरू शकत नाहीत. आपल्या प्राणप्रिय आईला कुठल्याही परिस्थितीत अंतर देऊ नका... तिला कदापिही दुःख देऊ नका. तिला पातना होतील असे वर्तन कधीही नका. संत सहवास दुर्मिळ आहे परंतु आई दुर्मिळ नाही. ती तुमच्यापाशी आहे. तिच्याच सहवासात रहा. 


→ सुविचार आईविना संगोपन म्हणजे, सत्व काढून घेतलेले अन्न, लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णता होय.

 • माता, महात्मा व परमात्मा यांचा कधीही विसर पडू देऊ नका.

  • मातेसारखे छत्र नाही, मातेसारखी गती नाही.


 → दिनविशेष 

 • चिंतामण गणेश कर्वे यांचा स्मृतिदिन - १९६०, मराठी कोशकार आणि लेखक, जन्म वडोद्यास शिक्षण बडोदा व पुणे येथे झाले. डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या' कार्यात त्यांचे महाय आले. १९२८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रीय कोशमंडळाची स्थापना केली. 'महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश' यासारख्या कोशांच्या रचनेत एक संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची कामगिरी बाल सुलभ विश्वकोशाच्या रचनेत त्यांचा सहभाग होता. कोशकार्याखेरीज 'मानवी संस्कृतीचा इतिहास, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, कोशकार केतकर यांसारखी उल्लेखनीय पुस्तकेही त्यांनी लिहिली. भाषा, वाड्मय, इतिहास, संस्कृती आदि विषयांवर त्यांनी चारशेहून अधिक लेख लिहिले. माहितीचा अचूकपणा. मांडणीचा नेटकेपणा व संक्षेप, सूक्ष्म संशोधन बुध्दी आणि अभिनिवेशरहीत स्पष्ट प्रतिपादन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. १९५८ पासून ते भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार होते. पुणे येथे १६ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले. 


→मूल्ये 

शोधकवृत्ती, वाचनप्रियता, साहित्याभिरुची 


→ अन्य घटना

 भारतातील पहिल्या इंजिनिअरींग कॉलेजची पुणे येथे स्थापना १८५४ 

 • आमंडसेन दक्षिण ध्रुवावर पदार्पण १९११

  • भारत-पाक युध्दात पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली. बांगला देश मुक्त १९७१

   • आनंद यादव यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार १९९० 

   

 उपक्रम

  विविध शब्दकोश कसे अभ्यासावयाचे, त्यातील माहितीचा उपयोग कुठे कसा करून घ्यावयाचा हे सांगणे. 


→ समूहगान 

• आओ बच्चों तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्तान की... 


→ सामान्यज्ञान -

 • १८ व्या शतकातील शास्त्रज्ञांनी जगाला शिसपेन्सिलीची देणगी दिली. मूळ पेन्सिलीच्या विकासातून आज पेन्सिलीचे सुमारे ३० विविध प्रकार उपलब्ध भारतात पेन्सिलीचे ४० उत्पादक असून १५ कोटी पेन्सिली दर वर्षी तयार होतात. ग्राफाईट, चिकणमाती | यांच्या मिश्रणाने आतील शिसे आणि विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे वरील आवरण यापासून पेन्सिल बनविली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा