Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

14 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 14 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

 ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.... • 


श्लोक -

 नुसते नको उच्च शिक्षण । हे तो गेले मागील युगी लपोन आता व्हावा कष्टिक, बलवान । सुपुत्र भारताचा वार में शिक्षणातचि जीवनाचे काम | 

 दोन्हींची सांगड व्हावी उत्तम 

चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी - ग्रामगीता नुसते उच्च शिक्षण नको. उच्च शिक्षण आता मागच्या युगात लुप्त झाले. आता भारताचा सुपुत्र हा कष्टिक व्हावा. बलवान व्हावा. शिक्षणातच जीवनाचे काम असावे. शिक्षण आणि काम या दोन्हींची उत्तमरित्या सांगड घालता आली पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर भोजनाची चिंता करण्याची गरज नाही. भीक मागण्याची पाळी येणार नाही.


चिंतन

 एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकर


→कथाकथन 

- ‘दोन दिलदार सैनिक' (संवेदनशीलता) - पैगंबर साहेबांच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षात अरब व रोमन लोकांमध्ये जंगी लढाई झाली. त्या डाईत दोन्ही पक्षांचे बरेच सैनिक मारले गेले. बरेच जखमी झाले. संध्याकाळ झाली म्हणजे सामान्यपणे लढाईही बंद होत असे. एके दिवशी अशाच तऱ्हेने साई बांबल्यानंतर अरबांच्या लष्करातील एक जण आपल्या चुलतभावाच्या शोधार्थ निघाला. हेतू हा की त्याचे प्रेत मिळाले तर दफन करावे आणि जिवंत आवळला तर सेवा करावी. कदाचीत तो पाण्यासाठी तळमळत असेल, असे मनात आणून त्याने आपल्या बरोबर लोटाभर पाणीही घेतले होते. तडफड करणाऱ्या जखमी शिपायांच्यामधून तो चालला होता. इतक्यात त्याचा भाऊ त्याला दिसला. तो खरोखरच पाण्यासाठी तडफडत होता. जखमांतून रक्त वाहत होते. तो जगण्याची आशा नव्हतीच. त्याने त्याच्या तोंडाशी पाणी धरले. इतक्यात कोण्यातरी जखमी सैनिकाचा 'पाणी' असा स्वर त्याच्या कानी पडला. तेव्हा त्या दयाळू सैनिकाने आपल्या भावाला म्हटले, "प्रथम त्याला पाणी नेऊन दे, मग मला पाज, "ज्या दिशेकडून तो आवाज येत होता त्या दिशेने तो भराभरा पावले टाकत गेला. पाहतो तर एक जखमी सरदार होता. तो त्याला पाणी पाजणार, इतक्यात तिसऱ्या ठिकाणी पाण्याकरीता आवाज आला. हा जखमी सरदार सुध्दा त्या पहिल्या सरदाराइतकाच संवेदनशील परोपकारी होता, त्यानेही काहीशा अशाच शब्दांनी व काहीशा खुणांनी दर्शविले की प्रथम तिकडून आवाज येत आहे तिकडे पाणी नेऊन द्यावे. हा गृहस्य वायुवगाने जिकडून आवाज येत होता तेथे जाऊन पोहचला. पाहतो तर त्याचेही डोळे मिटलेले. दुःखी अंतकरणाने खुदाची प्रार्थना करीत हा स्वतःच्या भावापाशी पोहचला तर त्याची नाडी बंद पडलेली दिसली. त्याचाही जीव निघून गेला होता. माणसाच्या हाती पडत नाही. आली तरी हाती घेतलेले काम काम करीत राहिले तर यश नकता । कोशिश करें इन्सान नदीच्या उगमापासून थेट बांचे १२ सहकारी असे दि. डीने त्यांनी प्रवास केला. प्रकारे अभ्यासपूर्ण पाहणी मच्छलीपट्टण या ठिकाणी च नव्हे तर पुढील अनेक णार नाही. अशा रितीने तिघांपैकी एकालाही पाणी मिळाले नाही. पण, पहिले दोघे आपल्या संवेदनशीलतेमुळे आपले नाव अमर करून गेले. इतिहासाच्या पृष्ठांमध्ये आपल्या निर्मळ त्यागाचे नमूने तर पुष्कळ पाहण्यात येतात. त्यांचे वर्णन कसलेल्या लेखणीतून उतरले असेल, तर ते आपल्या डोळ्यांतून दोन थेंबही पाडील. पंरतु हा अद्भूत दृष्टांत देण्याचा हेतू हा की त्या वीर पुरुषांसारखा त्याग, संवेदनशीलता आपल्यामध्ये यावी आणि आपल्या कसोटीच वेळ येईल तेव्हा आपणही दुसऱ्याला पाणी पाजून मग स्वतः प्यावे. दुसऱ्याला जगवूनच स्वतः जगावे. दुसऱ्याला वाचवितांना स्वतःला मरण आ तर हसतमुखाने निघून जावे! 

→ सुविचार

 • इतिहास वाचाल तर इतिहास घडवाल चंदन स्वतः झिजते, पण दुसऱ्यांना सुवास देते, तसे माणसाने वागावे. • सहानुभूती, प्रेम, मदत व सहकार्य या गोष्टी दिल्याने दुप्पट होऊन सव्याज मिळतात. • जखम करणारा ती विसरतो, पण ज्याला ज होते तो ती कसा विसरेल? क्रांतीचा उगम दुःखी आणि त्रस्त लोकांच्या अंतःकरणातून होत असतो..


दिनविशेष 

•ग.दि. माडगूळकर स्मृतिदिन १९७७ १ ऑक्टोबर १९१९ रोजी या गावी ग. दि.जन्म त्यांचे सांगली जिल्ह्यातील (जुन्या औध संस्थानातील) माडगूळ, आटपाडी, औप आणि कुठल या ठिकाणी त्यांचे मंद्रिकापर्यंतचे शिक्षण झाले. कलाक्षेत्राच्या आवडीने त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळविला. नट, पटकथा लेखक, गीतकार, कथाकार इ. विविध नात्यांनी त्यांनी चित्रपटष्टी गाजवून सोडली. १६५ मराठी हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत माडगूळकरांचा लेखक म्हणून सहभाग आहे. चित्रपट गीतांचा तर त्यांनी अक्षरश: पाऊस पाडला, गीत, भावगीत, अभंग, ओवी, लावणी, पोवाडा, समूहगीत, आरत्या, भूपाळ्या, अंगाईगीत, बालगीत अशा विविध प्रकारच्या गीतांनी त्यांनी चित्रपट अमर केले. माडगूळकरांचे गीतरामायण घरोघरी पोचले. महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून त्यांचा गौरव झाला. राम जोशी, पेडगावचे शहाणे, ऊनाऊस, जगाच्या पाठीवर, दो आँखे बारा हाथ या त्यांच्या चित्रपटकथांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'आदर्श माता' म्हणून त्यांच्या आईचा गौरव होत असतानाच व त्यांनी लिहिलेले 'मातृवंदना' हे गीत गाईले जात असतानाच पंचवटी या पुण्यातील घरी त्यांचे निधन झाले. माडगूळकर गेले पण त्यांची वाणी मात्र अमर आहे.

' मूल्ये 

-• राष्ट्रभक्ती, सौंदर्याभिरुची, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, साहित्यप्रेम.


 → अन्य घटना 

 • तैमुरलंगाची भारतावर स्वारी - १३४८

  • राजा छत्रसालाचे निधन - १७३३

  • डॉ. बिरबल साहानी यांचा जन्म १८९१

   • उपेन्द्रनाथ यांचा जन्मदिन १९१० संजय गांधी यांचा जन्मदिन - १९४६ +

   

 उपक्रम - 

 • 'गीतरामायण' आणि विविध चित्रपटांमधील माडगूळकरांची बालगीते, राष्ट्रभक्तीपर गीते विद्यार्थ्यांना ऐकविणे 


→ समूहगान

देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल....


→ सामान्यज्ञान

. • नवीन ऊर्जा पर्याय शोधत असताना जुन्या पवनचक्क्यांना पुन्हा नव्याने ऊर्जितावस्था येत आहे. वाऱ्याच्या शंक्तीचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेण्यासाठी पवनचक्कीच्या रचनेवर संशोधन होत आहे. जुन्या रचनेएवजी भूपृष्ठाला समांतर पवनचक्कीची पाती फिरविल्यास वाऱ्यापासून अधिक ऊर्जा मिळते, असे संशोधन झाले आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा