Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, ३ डिसेंबर, २०२३

1 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

              1 डिसेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...... 


→ श्लोक 

- वाच्छा सज्जनसंगमे, परागुणे प्रीतिर्, गुरौ नम्रता, विद्यायां व्यसनं, स्वयोषिति रतिः, लोकापवादात् भयम्। भक्तिः शूलिनि, शक्तिः आत्मदमने, संसर्गमुक्तिः खलैः, एते येषु वसन्ति निर्मलगुणाः तेभ्यो महदुद्भ्यो नमः।। (भर्तृहरि - नीति)

-  सज्जनांच्या संगतीची आवड, दुसऱ्यांच्या गुणाविषयी आनंद, गुरुसंबंधी नम्रता, विद्येविषयी आसक्ती आपल्या पत्नीवर प्रेम, लोकि शंकराच्या ठिकाणी भक्ती, आत्मनिग्रहाचे सामर्थ्य, दुष्टांच्या सहवासापासून दूर राहणे, हे शुद्ध गुण ज्यांच्यामध्ये वास करतात, त्या माझा नमस्कार असो! 



→ चिंतन 

- खरे शिक्षण म्हणजे अंतर्गत मनोभूमिकेची वाढ होय. शिक्षण म्हणजे नुसता शब्दांचा संग्रह नव्हे. भोवतालच्या परिस्थितीस अनुरुप शोधून काढून त्याने चालावयाचे. हा मनोधर्म शिक्षणाने उत्पन्न केला पाहिजे. - स्वामी विवेकानंद



→ कथाकथन -

 'अज्ञानातलं दुःख' - व्यापारयुगामध्ये भारतातील उर्जायिनी नगरात शिखिध्वज या नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. तो सर्वगुणसंपन्न होता. त्यानं सुराष्टाधिपतीच्या चुडाला या नावाच्या सुंदर कन्येशी लग्न केलं. त्यानंतर त्यानं पीवनातील विषयांचा यथेच्छ उपभोग घेतला, लम्हेने अनेक वर्षे लोटल्यानंतर त्याच्या आयुमर्यादला ग्रहण लागलं. चुडालेला तर या साया भुक्तीनंतर विरक्ती प्राप्त झाली. तिला आत्मतत्वाची झाल्यामुळे तिचं सौंदर्य वाढलं. राजाही राज्यत्याग करून अरण्यात गेला. एका तपानंतर राजा जराजर्जर झाला. त्या कालावधीत ज्ञान हेव परश्रेय आहे ही गोष्ट चुडाला हिला पटली होती. चुडाला अरण्यात गेली आणि तिनं ब्रह्मकुमारचं रूप धारण करत राजाला एका हत्तीची गोष्ट सांगितली. विध्य पर्वताच्या वनात एक मोठा हत्ती होता. त्याला एका माणसानं लोखंडी जाळ्यात पकडलं. परंतु त्या मत्त हत्तीनं आपल्या दातांनी ते जाळं फोडून टाकल हे पाहून त्या हत्तीला पकडणारा तो माणूस झाडावर चढला. तो हत्ती झाडाखालून जात असताना त्या माणसानं एकदम त्याच्या मस्तकावर उडी मारली. परंतु हत्तीच्या मस्तकावर न पडता तो माणूस खाली जमिनीवर पडला. त्याला पाहताच हत्तीला त्याची दया आली; आणि त्या माणसाला काही न करता हत्ती अरण्यात निघून गेला. परंतु हत्तीला पकडण्यासाठी त्यांन एक मोठा खड्डा खणला. तो खड्डा त्यानं गवतानं झाकून टाकला. काही दिवसांनी तो हत्ती नात संचार करता फसून त्या खड्ड्यात पडला आणि भयंकर दुःख भोगू लागला. ब्राह्मणकुमाराच्या रूपानं चुडालेनं या गोष्टीचं तात्पर्य राजाला सांगितलं, 'राजा, या गोष्टीतील हत्ती म्हणजेच तू आहेस. हत्तीला पकडणारा माणूस म्हणजे तुझ्या ठिकाणी असणारं अज्ञान होय. या अज्ञानानंच तुला आशा पाशाच्या लोखंडी जाळ्यात पकडलं. परंतु स्त्री वगैरेंचा त्याग करत विवेक आणि वैराग्य या दोन वज्रप्राय दातांनी तू आशारुपी जाळं तोडून टाकलंस आणि ते अज्ञान पुन्हा तुझ्यावर झडप मारीत असताना ते तुझ्यापुढे खाली पडलं. परंतु त्याला तू सर्वत्यागरुपी खड्गानं मारून टाकलं नाहीस. त्यामुळे ते पुन्हा उठलं आणि त्यांने आपल्या पराभवाची आठवण ठेवून तुला या तपरुपी गहन घात चांगलच डांबून ठेवलं आहे. राजा अशा रीतीने हा तुझाच वृत्तांत सांगितला आहे. तरी या तपोरुप खड्डयातून वर निघ आणि या तुझ्या अज्ञानरूप शत्रुच्या नाशासाठी मोठ्या चिकाटीनं प्रयत्न कर !' दुःख हे अज्ञानात असतं आणि सुख हे ज्ञानात असतं हे माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे,

 


 सुविचार 

 शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांची ज्याला आसक्ती नसते, त्याला पूर्ण ज्ञानी किंवा संत म्हणावे. • नवनिर्मितीचा जन्म हा वेदनेच्या पोटातूनच होत असतो. वेदनेला घाबरणारे नवनिर्मिती करू शकत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा