Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

23 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

             २३ नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

- असो तुला देवा, माझा सदा नमस्कार..... 

→ श्लोक

 -अहिंसा परमो धर्मः, तथा अहिंसा परं तपः । अहिंसा परमं सत्यं, ततो धर्मः प्रवर्तते ।। अहिंसा परमो धर्मः, तथा ऽ हिंसा परो दमः । अहिंसा परमं दानम्, अहिंसा परमं तपः ।।

 - (महाभारत) "अहिंसा हा परम धर्म आहे, तसेच अहिंसा हे परम तप आहे. अहिंसा हे परम सत्य आहे. त्या सत्यापासून धर्माचे प्रवर्तन होते अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तसे अहिंसा हा सर्वश्रेष्ठ इंद्रियनिग्रह आहे. सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि सर्वश्रेष्ठ तप आहे." 


→ चिंतन -

 क्षमाशस्त्र जया नराचिया हाती । दुष्ट तयाप्रति काय करी ।। (संत तुकाराम) क्षमाशील वृत्तीनं समर्थ माणूस जास्त सामर्थ्यवान बनतो. क्षमा हे तेजस्वी पुरूषाचं तेज आहे. तपस्वी लोकांचं ब्रह्म आहे. सत्य आहे. गवत नाही तेथील अग्री आपोआप विझतो, क्षमा जेथे असते; तेथे दुष्टाचा दुट असाच नाहीसा होतो. 'सामर्थ्यवंताचे क्षमा म्हटले आहे. (सामर्थ्य हेच जीवन; दुर्बलता म्हणजे मृत्यू होय - स्वामी विवेकानंद)



कथाकथन -

 आज्ञाधारक उपमन्यु - धौम्य ऋषींचा दुसरा आवडता शिष्य उपमन्यू. एकदा त्याची परीक्षा घेण्याचे गुरुजींनी ठरवि लगेच आपल्या गाई चारण्यासाठी अरण्यात जायचे. मात्र तेथे गाईचे दूध प्यायचे नाही." उपमन्यूने गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे दुसन्या दिव कामाला सुरुवात केली. दोन-तीन दिवस झाले तरी उपमन्यू ताजातवाना पाहून गुरुजी म्हणाले, “उपमन्यू, तू गाईचे दूध तर पीत नाहीस यावर उपमन्यू म्हणाला, "गुरुजी मी तुमची आज्ञा कशी मोडीन? फक्त वासरे दूध पितात तेव्हा जे थेंब खाली पडतात, तेवढेच मी चाटतो." गुरुजी म्हणाले, "हे बरोबर नाही. उद्यापासून हे थेंबही तू चाटता कामा नये." उपमन्यू म्हणाला, “ठीक आहे.” दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पोटात न गेल्यामुळे संध्याकाळी तो भुकेने अगदी व्याकूळ झाला. पण गुरुजींची आज्ञा पाळणे हे आपले कर्तव्य तो विसरला नाही. संध्याकाळी तो गुरे घेऊन आश्रमाकडे निघाला; पण अगदी राहावेना रस्त्यातल्या एका झाडाची पाने त्याने खाल्ली. ते झाडे रुईचे होते. ती पाने खाल्ल्यामुळे त्याला दिसेनासे झाले. अशा परिस्थितीत कसातरी धा आश्रमाकडे येत असता, तो एका खोल विहिरीत पडला. रात्र झाली तरी उपमन्यू आश्रमात आला नाही, त्याला शोधण्यासाठी गुरुजी काही शिष्यांना बरोबर घेऊन रानात आले. तेथे त्यांना उपमन्यू ि पडलेला आढळला. त्यांनी उपमन्यूला बाहेर काढले. त्याची ती अवस्था पाहून गुरुजींना फार वाईट वाटले. लागलीच त्यांनी उपमन्यूच्या डोळ्यांक फिरवला. त्यांच्या तपाच्या सामर्थ्यामुळे उपमन्यूला पूर्वीसारखे दिसू लागले. आपण बिचाऱ्या उपमन्यूची फार कडक परीक्षा घेतली, याबद्दल गुरु वाईट वाटले. मग उपमन्यूच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवीत तेम्हणाले, "शाब्बास उपमन्यू! तू परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालास !”




सुविचार

 आत्मत्याग व आत्मविसर्जन म्हणजे दुसऱ्यासाठी शरीराचा, मनाचा फार काय पण सर्वस्वाचा देखील होम करण्याची भाग उपस्तूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत तेम्हणाले, “शाब्बास उपमन्यू! तू परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालास !" सतत तयारी. ' - स्वामी विवेकानंद • संस्कार संपन्न मुले ही देवाच्या चांगुलपणाची स्मिते आहेत. • नम्र झाला भूता । कोडिले अनंता संत तुकाराम • कृती हे ज्ञानाचे, आज्ञाधरकपणाचे सुंदर फळ आहे. • तुम्ही जितके चांगलेपणाने वाग तितका अधिक चांगुलपणा तुम्हाला प्राप्त होईल. • सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर



दिनविशेष 

- कल शाम को जपदीशचंद्र बोस, बंगालमधील विक्रमपूर जिल्ह्यातील राणीखल या गावी यांचा जन्म दि. ३० मे १८५८ ला झाला. कलकता कर विजन सेथून पदार्थाविज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांचा अभ्यास पुरा करुन ते कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजात अध्यापन करीत. त्यांनी विद्युतशक्ती संबंधीचे संशोधन करुन विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध लावून संचायक बनवला. बिनतारी संदेश पाठविण्यात त्यांना यश मिळाले अनवतींना स्याम्, मज्जातंतू, सुखदुःखादी विकार असतात याचा शोध लावला. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रिझोनंट देव ऑकिलोटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हर, क्रेसकोग्राफ, बॅलन्सिंग अॅपरेटस्, डायमेट्रिकल कॉन्टॅक्शन अॅपरेटस् व रेझोनंट इ. उपकरणे शोधून काह बदलत्या वातावरणाचा वनस्पतींवरील परिणाम, वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण, अन्न ग्रहण, पचन इ. वर संशोधन केले. १९१७ मध्ये बोस इस्टिट्यूट हो संस्था स्थापली व एक मुखपत्रही सुरु केले. वनस्पतीशास्त्रावर अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले

. मूल्ये

 देशभक्ती, साहित्यप्रेम. 

अन्य घटना

 • कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा जन्म - १८७२

 •  • उद्योगपती वालचंद हिराचंद यांचा जन्म १८८२.


 → उपक्रम • 'मानापमान' नाटकातील नांदीचे गायन करता येते का पाहा. शास्त्रज्ञ व लावलेले शोध यांचा तक्ता तयार करुन वर्गामध्ये लावा. 

 • तुम्ही पाहिलेल्या नाटकाची गोष्ट पंचवीस ओळीत लिहा.

  • वनस्पतींच्या संवेदनांची उदाहरणे निरीक्षणाने सांगा. 


→ समूहगान

 • राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम्..


. → सामान्यज्ञान 

• पर्यावरणाचा विचार केल्यास देशाच्या क्षेत्रफळाच्या ३० टक्के भागावर जंगल असणे आवश्यक आहे. भारतीय वनखात्याच माहितीनुसार २० टक्के भागावर जंगले उरले आहे. तर उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांनुसार हे प्रमाण ८ टक्के असण्याची शक्यता आहे. (१९२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा