Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

21 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 21 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ


→ प्रार्थना -

 प्रार्थना देवा तुला, मिटु देरे वैर वासना....

श्लोक 

- ॐ धर्मं चरत माऽधर्मम् । सत्यं वदत नानृतम् । दीर्घ पश्यत मा हस्वम् । परं पश्यत माऽपरम् ।। धर्माचरण करावे, अधर्माने वागू नये, खरे बोलावे, खोटे बोलू नये. व्यापक विचार ठेवावे, संकुचित वृत्ती नको.


  → चिंतन - 

  सत्याचा, करारीपणाचा, एकनिष्ठेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासही दारिद्र्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावाच लागतो. - लो.टिळक

  . बलिदान मृत्यूत असते. तर त्याग पदात असतो म्हणून तुमच्या बलिदानातून दुसऱ्याचे किंवा राष्ट्राचे कल्याण झाले पाहिजे. तसेच तुमच्या त्यागातून समाजहित होत असेल किंवा इतरांचे कल्याण होत असेल तर अवश्य चांगले कार्य केले पाहिजे. तेच खरे जीवन जगणे होय.


कथाकथन -

 आजाद हिंद सरकार स्थापना - २६ जानेवारी १९४१ रोजी सुभाषचंद्र इंग्रजांच्या नरजकैदेतून निसटले व वेषांतर करून गुप्तपणे काबूलमार्गे जर्मनीला पोहोचले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांनी इंग्रजांचा शत्रू हिटलर याच्याशी संधान बांधले जर्मनी व इटली या राष्ट्रांनी युध्दात । बंदी केलेल्या भारतीय सैन्याचा उपयोग भारताला स्वतंत्र करण्यासाठी व्हावा, अशी त्यांची मनीषा होती. त्या सैन्याची आजाद हिंद सेना सुभाषबाबूंनी जर्मनीत उभारली होती व ते तेव्हापासून नेताजी झाले होते. परंतु हिटलरने म्हणावा असा प्रतिसाद न दिल्याने ते एका पाणबुडीने गुप्तपणे जपानला गेले. जपान हे राष्ट्र सुध्दा इंग्रजांविरूध्द युध्दात उतरले होते व जपानी सैन्याने पूर्वेकडे सिंगापूर र्यंत धडक मारली होती. आपली अंदमान निकोबार बेटेही जिंकली होती. ४० हजार भारतीय सैन्य युध्दबंदी केले होते. जपानमध्ये स्थायिक झालेल्या रासबिहारी घोषांनी त्या सैन्याची आजाद हिंद सेना ५ जुलै १९४३ रोजी उभारली होती. सुभाषबाबू जपानला पोहोचल्यावर त्या सेनेचे नेतृत्व त्यांनी सुभाषबाबूंच्याकडे सोपविले. ते सिंगापूरला पोहचले. तेव्हा सिंगापूर व मलायामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. व नेताजींना भरभरून आर्थिक मदत केली. ४० हजार भारतीय सैनिकांनी त्यांचा उत्स्फूर्तपणे जयजयकार केला. जपानने आजाद हिंद सेनेला शस्त्रास्त्रांची, आर्थिक मदत सुरू केलेली होतीच. एवढी पूर्वतयारी झाल्यावर नेताजींनी २१ ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे हजारो भारतीयांच्या साक्षीने व आजाद हिंद सेनेच्या मेळाव्यात हंगामी आजाद हिंद सरकारची स्थापना केली. त्यांच्यासमोर भाषण करताना ते म्हणाले होते, "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूँगा” त्यांच्या आवाहनाने हजारो भारतीय तरुण आजाद हिंद सेनेत दाखल झाले. त्यावेळी कित्येकांनी आपले सर्वस्व नेताजींच्या चरणी अर्पण केले. याच मेळाव्यात नेताजींनी 'चलो दिल्ली' व 'जय हिंद' या घोषणा दिल्या. त्यांच्या आदेशाने आजाद हिंद सेना ब्रह्मदेशातील आराकान पर्वतराजीतून आसामात बेधडकपणे शिरली. पण दुर्देव | • असे की जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या नगरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि ती शहरे पूर्णपणे बेचिराख झाली. आजाद हिंद सेनेला सहाय्य करणाऱ्या जपानने इंग्लंड-अमेरिकेपुढे शरणागती पत्करली. आजाद हिंद सरकारची कुमक बंद झाली. जपानी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी निघालेल्या नेताजींचे निधन विमान अपघातात झाले, असे टोकीओ रेडिओने जाहीर केले व त्यांच्याबरोबर आजाद हिंद सेनेच्या सरकारची इतिश्री झाली आणि आजाद हिंद सेनेचीही वाताहत झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या त्या आजाद हिंद सैनिकांना शतशः प्रणाम! 


→ सुविचार 

• आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू, खंबीर हृदय व उसळणारे रक्त - ना.सी. फडके • स्वतःच्या बाजूला न्याय आहे याची पक्की जाणीव असली म्हणजे माणूस अजिंक्य होऊन बसतो. - आगरकर,


 → दिनविशेष - 

 • रामशास्त्री प्रभुणे स्मृतिदिन - १७८९ : रामशास्त्रींचा जन्म साताऱ्याजवळच्या माहुली गावचा. जन्मदात्याचे निधन आणि - आगरकर, घरची गरिबी यामुळे लहानपणीच त्यांना एका सावकाराकडे शागीर्द म्हणून रहावे लागले. सावकाराने केलेला अपमान जिव्हारी लागल्याने विद्या संपादन करण्याचा निश्चय करून ताड्कन नोकरी व घरदार सोडून राम थेट काशीला पोहोचला आणि अतिशय कठोर परिश्रम व एकाग्र चित्ताने अभ्यास करून विद्या व धर्मशास्त्रांमध्ये पारंगत होऊन रामचा रामशास्त्री झाला. पेशव्यांच्या दरबारी धर्मशास्त्री म्हणून रहिलेले रामशास्त्री पुढे न्यायशास्त्री झाले. निस्पृह, परखड, स्पष्टवक्ते असूनही सुधारक विचारांचे म्हणून पेशवाईत त्यांनी अलौकिकत्व मिळविले. पेशव्यांच्या खुनाबद्दल राघोबा पेशव्यांना परखडपणे जाब विचारण्याची शक्ती फक्त रामशास्त्री यांच्यातच होती. पेशव्यांचा राज्यात पाणीही पिणार नाही, अशी प्रतिज्ञा करून माहुलीला गेले. पुढे सवाई माधवरावांनी पुन्हा त्यांना सन्मानपूर्वक बोलावून सरन्यायधीशपदावर त्यांची नेमणूक केली. 


→ मूल्ये 

- • सत्यनिष्ठा, न्यायप्रियता.  

→ अन्य घटना 

• आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म - १८३३

. • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सरकारची स्थापना केली. - १९४३. 

• 

→ उपक्रम 

• रामशास्त्रींच्या जीवनातील प्रसंगांचे नाट्यीकरण करा.

 • पानिपत कादंबरी वाचा. 


→ समूहगान

 • कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा... 


→ सामान्यज्ञान -

 • गवताच्या पात्यासारखा दिसणाऱ्या झाडापासून ते ५० मीटर (सुमारे १६५ फूट) उंच वाढणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. अरूणाचल प्रदेशात आढळणाऱ्या 'बांबूसा टुल्डा' या जातीचा बांबू फक्त ३० ते ४० सें.मी. वाढतो. त्याचा उपयोग लोणच्यासाठी करतात

 . • स्कायलॅब - रशियाचे सोयूझ हे अंतराळस्थानक १९७१ साली अवकाशात गेले. ४९ फूट लांब व १५ फूट परीघ असलेले हे प्रचंड धूड 

 • अमेरिकेचे पहिले अंतराळस्थानक स्कायलॅब हे १९७३ मध्ये अवकाशात गेले. दोन मजल्याचे हे स्थानक ४८ फूट लांब व २२ फूट परिघाचे होते. सौरऊर्जेचा वापर करीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा