Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

29 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

 29 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ  प्रार्थना 

 मंगलमय चरणि तुझ्या विनंती हीच देवा....

 

 → श्लोक 

 - अहंतागुणे नीति सांडी विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोंकी । परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुध्दि सांडुनि जाते ।। 

 - हे मना, अहंकाराने विचारी मनुष्य सुध्दा नीती सोडून वागतो. त्याची बुध्दी शास्त्राची प्रमाणेही मानीत नाही. अनीतीच्या बळावर वरपांगी मोटी प्राप्त झाला, तरी मन त्याला साक्षी असते. (मनात ते डाचत राहते.)चिंतन

 वयाने वाढत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सर्वजण मान देतात, असे नाही. परंतु एखाद्या माणसाने जर या जगात काही चांगले  चि दाखविले असेल, इतरांसाठी तो झटला असेल, तर अशा कर्तृत्ववान माणसाला लोक आपोआप मोठेपणदेत असतात.

  

कथाकथन

'खरा मालक' एकदा एक परदेशी व्यापारी आपल्या घोड्यावर बसून अकबर बादाहाला भेटण्यासाठी दि | येत होता. वाटते त्याला एक लंगडा आडवा आला. म्हणाला, 'महाराज, मी लंगडा आहे, परंतु मला माझ्या मुलीला भेटायला दिल्लीला → कथाकथन आहे. माझी मुलगी आजारी आहे. कृपा करून मला घोड्यावर बसून दिल्लीकडे घेऊन चला. | लंगड्याला घोड्यावर बसविले. - - व्यापाऱ्याला त्याची दया आली प्राप्त झाला, तरी मन त्याला साक्षी असते. (मनात ते डाचत राहते.) थोडा वेळ तो घोड्याचा लगाम धरून चालू लागला. थोड्या वेळाने त्याने घोडा थांबविला व तोही घोड्यावर बसू लागला. परंतु लंगडा क घोड्यावर बसू देईना. तो म्हणू लागला, 'हा घोडा माझा आहे. तू चालता हो.' दोघांचे चांगलेच भांडण लागले. मारामारीवर पाळी आली. इ | बादशाहाचा एक शिपाई धावत तिथे आला. त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही घोड्यावर आपला हक्क सांगत होते. शेवटी म्हणाला, 'चला दोघेही बादशहापुढे, तिथं तुम्हाला न्याय मिळेल.' शिपायाने दोघांनाही बादशहापुढे उभे केले. दोघांनीही आपली तक्रार | लंगडा आता चांगला दोन पायांवर उभा होता. बादशहाने खटला बिरबलावर सोपविला. बिरबल म्हणाला, 'घोडा इथंच ठेवून दोघेही निघून जा | बरोबर नऊ वाजता याच ठिकाणी हजर रहा.' घोडा ठेवून दोघेही निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दोघेही हजर झाले. बिरबलाने त्या दोघांना घोड्यांच्या पागेत नेले. त्या ठिकाणी त्या घोड्य | दिसणारे दहा-बारा घोडे होते. बिरबलाने दोघांना सांगतले. 'चला ओळखा तुमचा घोडा' अगोदर लंगड्याला सांगितले. त्याने बराच वेळ घोड़ पाहिले. परंतु त्याला घोडा दाखविता आला नाही. व्यापारी मात्र चट्कन आपल्या घोड्याजवळ जाऊन उभा राहिला. घोड्यानेही मालकाच्या ज | आपले अंग घासले. त्याच्या पाठीवर थोपटीत व्यापारी म्हणाला, 'महाराज, हा पहा माझा घोडा.' बिरबलाने त्याचा घोडा त्याला परत दिला. लंग मात्र चांगलाच दंड सुनावला. 


→ सुविचार - • सत्य जाणणाऱ्यालाच खरे-खोटे काय ते कळते 

• सत्याचाच विजय होतो,असत्याचा नव्हे.

 • जो सत्याचरणी आहे, तोच खरा सुखी असतो. 

 • • सत्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही व असत्यापेक्षा भयंकर असे जगात काहीच नाही. 


→ दिनविशेष -

 • लोकनायक माधव श्रीहरी यांचा जन्मदिन - १८८० : लोकनायक माधव श्रीहरी अणे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य पुढारी होते. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे २९ ऑगस्ट १८८० रोजी झाला. वकिली करीत असताना अनेक सार्वजनिक कार्यात त्यांनी भाग घेतला. विदर्भात अनेक नवीन संस्था त्यांनी स्थापन केल्या. 'लोकमत' हे साप्ताहिकही ते काही काळ चालवीत होते. १९२८ मध्ये ग्वाल्हेर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लो. टिळकांचे ते कट्टर अनुयायी असून होमरूल लीगचे एकदा उपाध्यक्षही होते. लोकमान्यांच्या | निधनानंतर त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात स्वतःस झोकून दिले. १९२० पर्यंत राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार इत्यादी चळवळीत त्यांनी भाग घेतला. काँग्रेसमाये अनेक पदे त्यांनी भूषविली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांची वकिली सनद रद्द केली. जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला. त्यांना वऱ्हाडाचे टिळक म्हणत. 'तिलक यशोऽर्णव' हे त्यांनी लिहिलेले लो. टिळकांचे संस्कृत चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिध्द झाले. अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीमुळे त्यांनी जी समाजसेवा केली त्यामुळे जनतेने त्यांच्यावर नितांत प्रेम केले. या प्रेमामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना लोकनायक म्हणत असे. दिनांक २६ जानेवारी १९६८ रोजी लोकनायक अणे यांचे निधन झाले.


मूल्ये - 

• समाजसेवा, राष्ट्रप्रेम. 


→ अन्य घटना 1- • तुकोजीराव होळकर यांचा स्मृतिदिन - १७९७. 

• हॉफी जादूगार 'ध्यानचंद' यांचा जन्म - १९०५. 

• पद्मश्री विखे पाटील यांचा जन्मदिन - १९०१. 

• म.गांधीचे दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला प्रयाण - १९३१. 

• स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झाली - १९४७.


 → उपक्रम 

 लोकनायक अणे यांचे चरित्र मिळवून वाचा. त्यांच्या 


→ समूहगान -

पेड़ों को क्यों काटते हो, दो पेड लगाके देखो ना....


सामान्यज्ञान 

•  →  नोबेल पुरस्कार विजेते भारतीय

 • सर चंद्रशेखर व्यंकट रमण - पदार्थ विज्ञान

 • हरगोविंद खुराणा - औषध विज्ञान

 •  • रवींद्रनाथ टागोर - साहित्य (गीताजंली)

 •  • मदर तेरेसा - मानवसेवा व विश्वशांती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा