Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

22 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

 



→ प्रार्थना

 ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम गुरू तू... 

श्लोक 

 कार्म, क्रोध तथा लोभ स्वादु, शृंगारकौतुके । अतिनिद्रातिसेवा च विद्यार्थी यष्टवर्जयेत ।। 

 -सावित्री जय-1 विद्यास्यति काम, क्रोध, लोभ, चविष्ट पदार्थ, छानछोकी, अनावश्यक गोष्टीबद्दल उत्कंठा दाखविणे, अति निद्रा, अतिकष्ट या आठ गोष्टी ब 

 → चिंतन 

 -रामाच्या हितासाठी आपल्या जिवाचे दिव्य करण्यास हनुमान अणुभरही कचरला नाही. एका रामसेवेशिवाय इतर कोणतीही गोष्ट त्याच्या निवती रामाची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या जीवनाचे एकमेव व्रत होते. आपल्याला आज अशी अंतःकरणपूर्वक भक्ती भक्ती पाहिजे स्वामी विवेकानंद


 -कथाकथन 

 -'स्वामी विवेकानंद' - १८९३ च्या सप्टेंबर मध्ये अमेरिकेतल्या शिकागो येथे जागतिक पातळीवर धर्मपरिषद भरली होती. हिंदु प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तिथे उपस्थित राहिले होते. त्या जागतिक पातळीवर रंगलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामी केवळ पाच-सात मिनिटे बोलले असतील, त्यांनी आपल्या या तेजस्वी भाषणाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांना उद्देशून 'बधूंनो आणि भगिनीनो' असे उद्गार काढले आणि प्रचंड कडकडाट झाला. खरे सांगायचे तर आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि अलौकिक देखणेपणाने स्वामी विवेकानंदांनी सर्वांनाच जिंकून घेतले होते. त्या एका छोटेखानी भाषणाने स्वामी जगभर प्रसिद्धीच्या झोतात आले. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ त्यांच्या वडिलांचे नाव होते विश्वनाथ दत आणि आईचे नाव होते भुवनेश्वरीदेवी. स्वामी विवेकानंदांची आई अतिशय धार्मिक वृत्तीची होती. तिने छोट्या नरेंद्रावर लहानपणी खूप संस्कार केले. जुन्या संस्कृत भाषेतल्या धर्मग्रंथांचा अभ्यास तिने छोट्या नरेंद्राकडून करुन घेतला होता. सदृ प्रकृती उत्तम अंगकांती, मधुर बोलणे, विलक्षण तेजस्वी डोळे, अतिशय तीव्र बुद्धी, थोडक्यात स्वामी विवेकानंदांना हे सारे आईकडून मिळाले. त्यांच्या आईने छोट्या नरेंद्राला वेणी नावाच्या एका शास्त्रीय संगीतातल्या उस्तादाकडे शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी ठेवले होते. थोडक्यात स्वामी विवेकानंदांच्या आईने त्यांची उत्तम अशी देखभाल ठेवली होती. वयाच्या अठराव्या वर्षी स्वामी विवेकानंदांची स्वामी श्रीरामकृष्ण सांशी गाठ झाली आणि स्वामींच्या एकूण आध्यात्मिक आयुष्याचा पूर्ण कायापालट झाला. त्रिखंडकीर्ती मिळवलेल्या स्वामी विवेकानंदांचे पूर्वायुष्य त्यांच्या आईने घडविले. बुद्धिवाद आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम केवळ स्वामींच्या आईनेच घडवला. मुलांनो, स्वामी विवेकानंदांचे हे देदिप्यमान आयुष्य पाहिल्यावर लक्षात येईल की आईचा मुलाच्या जडणघडणीत किती मोठा आणि महत्त्वाचा वाटा असतो. आपण जर स्वामी विवेकानंदांसारखे कर्तृत्वान झालात तर आईला किती आनंद होईल; नाही का?... म्हणून आईने केलेले संस्कार आपण कधी विसरु नये. मुख्य म्हणजे आईला विसरू नये.

सुविचार 

मातृपदच जगतात सर्वश्रेष्ठ पद होय, कारण फक्त त्यातच सगळ्यात जास्त निःस्वार्थतेचे धडे मिळून निःस्वार्थ कार्य करण्याची संधी सगळ्यात अधिक लाभत असते.' - स्वामी विवेकानंद

 • त्रिखंडात दुमदुमुन जावी जरी राष्ट्राची कीती । कार्यमत्रता जीवन व्हावे मृत्यु ही विश्रांतीना → दिनविशेष

  • स्वामी विवेकानंद स्मारक शिल्प : 

कन्याकुमारी मंदिराच्या दक्षिण-पूर्वेकडील सागरातील जोड खडकाम 'विवेकानंद रॉक' असे या जोड खडकातील लहान खडक समुद्र सपाटीलगत असून त्याचा पृष्ठभाग सपाट आहे. दुसरा मोठा खडक सागराच्या पृष्ठभागापासून सुमारे ५५ फूट उंच असून त्याचा पृष्ठभाग ५३४ फूट बाय ४२६ फूट एवढा प्रशस्त असून हाच खडक स्वामी विवेकानंदांनी साधनेसाठी निवडला, म्हणून यास 'विवेकानंद रॉक' म्हणतात. ते कालिमाता दुर्गादेवीचे उपासक असल्याने त्यांनी तपश्चर्येसाठी ही जागा निवडली. याच खडकावर त्यांचे भव्य, दिव्य स्मारक उभारले आहे. विवेकानंद मंडप १८० बाय साडे ११" बाय ५६' असून त्यात चौथऱ्यावर साडे सात फूट उंचीचा विवेकानंदांच उभा आहे. - या स्मारकाची उभारणी करण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथजी रानडे यांना द्यावे लागेल. संघाने या कार्या पक्षाच्या दैनंदिन जबाबदारीतून मुक्त केले. अवघ्या भारतातून सर्वपक्षीय संसद सदस्यांच्या ३२३ सदस्यांचे निवेदन पंतप्रधान आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या दीर्घ चिकाटीचा तो विजय ठरला. हे राष्ट्रीय स्वरूपाचे स्मारक असून त्यांच्या उभारणीच्या कार्याच्या आड राजकीय मतभेद, प्रांतभेद, पंथभेद आणि कसलेही पूर्वग्रह येता कामा नयेत ही भूमिका त्यांनी सर्वांच्या गळी उतरविली. जवळ जवळ सात वर्षे अहोरात्र खपून भारताने अभिमान बाळगावा असे हे स्मारक त्यांनी उभे केले. २ सप्टेंबर १९७० या दिवशी भारताचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. या स्मारकाच्या उभारणीत महाराष्ट्राच्या देणगीचा वाटा सर्वांत मोठा आहे.

 

 → मूल्ये 

 • संस्कृतीप्रेम, ध्येयनिष्ठा, राष्ट्रप्रेम.


 • अन्य घटना 

 • • ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन १८१८

 • एकनाथजी रानडे यांचा १९८२ 

 

उपक्रम

 • कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे चित्र व माहिती मिळवा. → समूहगान

  • दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए... 

  

सामान्यज्ञान 

• सुवर्ण मंदिर अमृतसर (पंजाब)

 • सूर्य मंदिर कोणार्क (ओरिसा) मीनाक्षी मंदिर तामिळनाडू - 

• शनी मंदिर - शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर

  • महादेव मंदिर - शिखर शिंगणापूर

 • महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर 

• साईबाबा मंदिर - शिर्डी - 

• विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर 

• संत एकनाथ मंदिर - पैठण

 • गजानन महाराज मंदिर शेगाव 

 • सिद्धेश्वर मंदिर सोलापूर- (९९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा