Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २६ जुलै, २०२३

27 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

: मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे... 

श्लोक 

- अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् । अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवंच विद्यया ॥

 - अन्नदान हे श्रेष्ठ दान होय. विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. अन्नाने क्षणभरच तृप्ती होते. विद्येने जन्मभर तृप्ती मिळते. 

चिंतन 

- विद्वान कधीही फक्त पुरुषार्थावर किंवा फक्त दैवावर अवलंबून राहत नाहीत, तर ते या दोन्हींचा विचार करून मार्ग आक्रमित असतात.

-  समतोल विचार करणे हे खऱ्या विद्वानाचे लक्षण आहे. त्यानुसार तो वागत असतो. म्हणूनच कोणतेही काम करताना तो केवळ स्वप्रयत्नांवर विसंबून राहून गर्विष्ठ बनत नाही. प्रयत्नांना दैवाची जोडही लागते असे त्याला वाटते. अर्थात नुसत्या दैवावरही तो अवलंबून राहत नाही. प्रयत्न आणि दैव यांची योग्य सांगड जमली की कोणतेही कार्य अयशस्वी होत नाही. 


कथाकथन 

'परोपकार ते पुण्य':

 देवमूर्तीची पूजा, तीर्थाटन, यज्ञयाग, दानधर्म, कीर्तन-प्रवचन या कर्मकांडाने पुण्य होत नाही व देवही प्रसन्न होत - नाही. परोपकाराची कृत्ये करण्यानेच खरे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे परोपकार उपकृत लोकांचा दुआ म्हणजेच ईश्वराची कृपा आपणास मिळते. लोकांना छळणे, शारीरिक मानसिक पीडा देणं हे महापाप आहे. ते आपण कधीच करू नये. परोपकार म्हणजे योग्य माणसाला अडचणीत मदत करणे. कृतीने, शब्दांनी, पैसा, वस्त्रप्रावरणं देऊन मदत करणे हे पुण्यकर्म, व्रत म्हणून आचरावे, हे शक्य तोवर रोज करावे. तुम्ही म्हणाल की आम्ही मुले काय परोपकाराचे कृत्य रोज करणार? परोपकार म्हणजे धनदौलत देणेच नव्हे. तर साध्या साध्या दैनंदिन कामांत मदत करणंही परोपकारच होतो. पण हा | परोपकार अडचणीत असणाऱ्या, खऱ्या त्या योग्यतेच्या माणसावरच करावा. दुष्टदुर्जन, ढोंगी, स्वार्थसाधू माणसांवर उपकार केल्यास त्याचा गैरफायदा है। लोक घेतात व आपले उपकार व्यर्थ जातात. रोज आजाऱ्यांची शुश्रूषा करून अंध-अपंगांना मदत त्यांची कामे करून, आपल्या जवळील ज्ञान त्या ज्ञानाची आवश्यकता असणाऱ्यांना देऊन  शेजारपाजारचा वृद्ध माणसांचं काम व सेवा करून, मित्राला अडचणीत मदत करून, वस्त्रहीनाला वस्त्र देऊन, भुकेलेल्याला अन्न देऊन, तहाल्याला पाणी पाजून, निरक्षरांना साक्षर करून, हा परोपकार करता येतो. परोपकार काही पुन्हा त्या व्यक्तीकडून आपल्याला मदत मिळावी, हा हेतू ठेवून करू नये. आपले खाऊचे पैसे, पॉकीटमनीतून पैसे वाचवून ते गरजूंना देता येतील. दुःखिताचे दुःख ऐकून घेऊन त्याचे सांत्वन करणेही परोपकार होऊ शकतो. कोणाविषयी कणव (दया) | | उत्पन्न झाली मनात, तर त्याला मदत करण्यात तिचे रूपांतर केलं पाहिजे. उदा. कारगील युद्धातील शहीद, वादळग्रस्त, भूकंपग्रस्त लोकांना मदत करणे हेही परोपकाराचे कृत्यच आहे. लोकांना शब्दांनी, कृतीने पीडा देऊन पापाचे धनी बनू नये. 

सुविचार 

• शुद्ध व तीक्ष्ण बुद्धी ही संसाररूपी महासागराचा तळ गाठून तेथून तेजस्वी आचाराचे माणिक मोती शोधून आणते व खऱ्या कल्याणाचा मार्ग दाखविते.

 • परोपकार म्हणजे खरे पुण्य आणि पाप म्हणजे लोकांना पीडा देणं, छळणं हेच पाप होय - संत तुकाराम 

• जो माणूस फक्त स्वतःसाठीच जगतो तो लहान, जो दुसऱ्यांसाठी जगतो तो महान. वेळ ही आपल्याला मिळालेली अत्युच्च देणगी आहे. 

•  लोकसेवा हीच ईश्वरसेवा होय. बुद्धिमान बना, न्यायशील बना व सद्संगती ठेवा. 

दिनविशेष 

- • इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याचा स्मृतिदिन १८४४ 

-: जॉन डाल्टन हा सुप्रसिद्ध इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिक - | विज्ञानशास्त्रज्ञ होउन गेला. अणुसिद्धान्त व वायूचे गुणधर्म यांसंबंधी त्याने महत्त्वाचे कार्य केले. १७८७ मध्ये त्याने वातावरणाच्या निरीक्षणांची नोंद  ठेवण्यास सुरुवात केली. मृत्यूपर्यंत त्याने हे कार्य चालू ठेवले व दोन लक्षांहून जास्त नोंदी संग्रहित केल्या. १७९३ मध्ये त्याने रंगांधत्वाचा (एका किंवा अधिक रंगांची डोळ्याला संवेदना न होण्याचा) शोध लावला. वातावरणविज्ञानाचा शास्त्र या दृष्टीने पाया घातला व त्यामुळे त्याला युरोपभर प्रसिद्धी मिळाली. अणू हे अविभाज्य व अविनाशी आहेत असे त्याचे मत होते. डाल्टन याची कित्येक अनुमाने चुकीची असल्याचे नंतर अढळून आले; परंतु त्याचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे रसायनशास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. रॉयल सोसायटीने १८२२ मध्ये सदस्य म्हणून त्याची निवड केली आणि १८२५ मध्ये अणुसिद्धांताबद्दल सोसायटीतर्फे त्याला बहुमानाचे पदक दिले. 

मूल्ये

 • सत्यशोधन, चिकाटी, विज्ञाननिष्ठा.

 → अन्य घटना

  • रोलंड बॅरन फोन एटव्हॅश या हंगेरियन शास्त्रज्ञाचा जन्म १८४४. 

• थोर नेते उत्तमराव राठोड जन्मदिन - १९२८ 

• मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामकरण करण्याचा विधिमंडळात निर्णय - १९७८.

उपक्रम 

• विद्यार्थ्यांकडून अणुशक्तीच्या कार्याबद्दल माहिती मिळवावी. 

•  भारतातील शास्त्रज्ञांची माहिती गोळा करण्यास सांगावी. 

  → समूहगान

• बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या.....

 → सामान्यज्ञान 

 • मानवाचा पूर्वज वानर आहे असा डार्विनचा सुप्रसिद्ध सिद्धांत आहे; परंतु वानरापेक्षा अस्वलाचे माणसाशी अधिक साम्य असून, अस्वलापासूनच मानवाची उत्क्रांती झाली असली पाहिजे, असा नवा सिद्धांत नेपल्समधील शास्त्रज्ञ डॉ. अॅमेनडोला यांनी प्रतिपादन केले आहे. अस्वले श्रमविभागणीचा अवलंब करून शिकार करतात. अस्वले गुहेत राहतात. ती अन्नाचा साठाही करून ठेवतात. या सर्वांवरून वानरांपेक्षा अस्वल माणसाच्या जवळचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा