Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

22 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना

: ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरू तू.... 


श्लोक 

- क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थच साधयेत् । क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ॥ 

- क्षणाक्षणाचा उपयोग करून विद्या प्राप्त करावी. तसेच कण कण जमा करून द्रव्य मिळवावे. क्षण वाया घालविले तर विद्या कशी मिळणार? तसेच कण वाया घालविले तर धन कसे जमा होणार?


चिंतन

- शान न इसकी जाने पाये, चाहे जान भले ही जाये. - विश्वविजय करके दिखलाये, तब होवे प्रण पूर्ण हमारा झंडा ऊँचा रहे हमारा - श्यामलाल पार्षद 


-झेंडा हा प्रत्येक राष्ट्राची अस्मिता, अभिमान असतो. झेंडा आपल्या देशाचे प्रतीक असतो, प्रतिनिधित्व करतो. म्हणून अशा झेंड्याची शान राखणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी प्राणार्पण करावे लागले तरी बेहत्तर. आपल्या राष्ट्राचा सन्मान साऱ्या जगात झाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. 


कथाकथन 

- 'राष्ट्रध्वज' : सन १९३१ मध्ये राष्ट्रीय सभेने चरखांकित तिरंगी ध्वज 'राष्ट्रध्वज' म्हणून मान्य केला. राष्ट्रध्वजाचे केशरी, पांढरा व - हिरवा हे तीन रंग धर्माचे निदर्शक नसून, ते गुणांचे निदर्शक आहेत. केशरी धैर्य, त्याग, शौर्य आणि समर्पण 

 पांढरा - सत्य, शांतता, पावित्र्य, साधेपणा व ज्ञान 

 हिरवा समृद्धी, कृतज्ञता, प्रसन्नता आणि श्रद्धा


भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या ध्वजावर चरख्याऐवजी अशोकचक्र अंकित करण्यात आले. २२ जुलै १९४७ रोजी भारतीय घटना समितीने त्याला मान्यता दिली. सारनाथ येथील अशोक स्तंभावर कोरलेले ते धर्मचक्र आहे. आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी पुढीलप्रमाणे राष्ट्रध्वजाचे माहात्म्य वर्णिलेले आहे. “ध्वज हा ऐक्याचे नि स्वातंत्र्याचे प्रतीक असतो. आपल्या ध्वजाचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा काय अर्थ? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा, साधेपणाचा निदर्शक आहे. त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते चक्र सद्गुणांची, प्रगतीची व धर्माची खूण. या ध्वजाखाली कार्य करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे असू देत. आज आपल्याला सर्व बाजूंनी आव्हान आहे. धर्माचे ते आव्हान स्वीकारले पाहिजे नाहीतर आपण मागे राहून जाऊ. या चक्राचा आणखी एक अर्थ आहे. चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की, गतिमान राहा. डबक्यात बसून राहू नका. केशरी रंग हा त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे. हिरवा रंग तर या हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली सर्वांना आधार मिळेल, संरक्षण मिळेल. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारी वृत्तीने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू या." सुविचार

 'देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्वस्व देतो, तो कृतार्थ होतो.' - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् वाटेल त्या कारणासाठी स्वतःची ताकद खर्च करण्यात खरी हिंमत नसून, योग्य कारणांसाठी प्राणांची बाजी लावण्यात खरा परा आहे. म. गांधी -

 

 → दिनविशेष • टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा १९०८ :

 - बंगालची फाळणी जाहीर झाल्यानंतर देशात सगळीकडे असतोष माजला. दहशती कृत्यांचे प्रमाण वाढू लागले. तशात १२ मे १९०८ रोजी टिळकांनी 'देशाचे दुर्दैव' हा अग्रलेख लिहिला. त्याचा आधार घेऊन त्यांना अटक करण्यात आली. १३ जुलै १९०८ पासून सेशन्स कोर्टात खटल्याचे कामकाज सुरू झाले. २२ जुलै १९०८ रोजी रात्री १० वा. सर्व काम संपवून न्यायाधीशांनी टिळकांना ६ वर्षे काळे पाणी व १००० रु. दंड अशी शिक्षा फर्मावली. ही शिक्षा ऐकल्यानंतर टिळकांनी काढलेले उद्गार संस्मरणीय झाले. ते म्हणाले, 'ज्युरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे.' या शिक्षेच्या काळातच त्यांनी 'गीतारहस्य' हा संशोधनात्मक ग्रंथ लिहून पूर्ण केला.

 

 

 → मूल्ये देशप्रेम, राष्ट्राभिमान, एकाग्रता..

 

 → अन्य घटना 

 • विश्वासराव पेशवे यांचा जन्म - १७४२.

  • महात्माजींच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रहास सुरुवात झाली. - १९३०. 


  • आपल्या तिरंगी झेंड्याची राष्ट्रध्वज म्हणून स्वीकृती - १९४७. 


  • कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतीदिन - १९७३ 


  •स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे दलित चळवळीतील आघाडीचे नेते व माजी खासदार बापूसाहेब राजभोज यांचे निधन - १९८४. 

 

• मराठीतील नामवंत साहित्यिक ग. ल. ठोकळ यांचे निधन १९८४. → उपक्रम 


 • राष्ट्रध्वजासंबंधीच्या गीतांची माहिती सांगा. • विविध देशांतील राष्ट्रध्वजांच्या चित्रावरून द्यावी.-> समूहगान

• दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए... १९८४. सामान्यज्ञान 

- भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या एका स्तुपावरून घेतले आहे. एका चौकोनी बैठकीवर चार सिंह एकमेकांकडे पाठ करून उभे असल्याचे दिसले. बैठकीच्या चौकटीवर चारही बाजूंवर मध्यभागी धर्मचक्र असून त्याच्या दोन्ही बाजूंस बेफाम धावणारे घोडे दाखविले आहेत. समोरून पाहिले असता तीनच सिंह दिसतात. या चिन्हाच्या खाली देवनागरी लिपीमध्ये "सत्यमेव जयते" असे लिहिलेले आहे.

• हरितक्रांती - कृषी उत्पादन

•  श्वेत क्रांती - रेशीम उत्पादन 

• नील क्रांती - मत्स्य उत्पादन 

• लाल क्रांती - शेळी - मेंढी उत्पादन 

• अमृत क्रांती - नद्या जोड प्रकल्प 

•  पीत क्रांती - तेलबीया उत्पादन 

•  धवल क्रांती दुध उत्पादन 

• रजत क्रांती - अंडी उत्पादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा