Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ११ जुलै, २०२३

12 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

 


प्रार्थना

: या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे.... 

श्लोक 

- देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी । मना चंदनाचे परी त्वा झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥

-हे सज्जन मना, मरणानंतरही आपली चांगली कीर्ती राहील, अशीच वर्तणूक ठेवावी. तू चंदनाप्रमाणे झीज आणि आपल्या कीर्तीचा सुगंध पसरू दे. त्यामुळे तू स्वतः तर समाधानी राहशीलच, पण सज्जनांनाही संतुष्ट करशील.

चिंतन 

-ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून प्रत्येक शरीर हे देवाचे देऊळ आहे.

- हे सारे जग ईश्वराने निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात ईश्वराचा | अंश आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात ईश्वर राहत असतो. साहजिकच प्रत्येकाचे शरीर हे त्या देवाचे मंदिर बनते. अशा या शरीररूपी मंदिराची प्रत्येकाने स्वच्छता ठेवायला हवी आणि प्रत्येकाने हृदयातील ईश्वराला सदैव प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. 


कथाकथन

'सावता मादी' 

-सावता माळी नावाचे संत ज्ञानेश्वरांच्या काळात होऊन गेला. तो पांडुरंगाचा परमभक्त होता. दिवस, रात्र, त्यांच्या तोंडी सतत विठोबाचे नाव असायचे. संत सावता माळी यांचा जन्म इ.स. १२५० च्या दरम्यान झाला. याचा अर्थ ते संत ज्ञानेश्वरांपेक्षा जवळ जवळ पंचवीस वर्षांनी मोठे होते. त्यांच्या वडिलांचे नाव परसूबाबा आणि आईच नाव होते नंगिताबाई. पंढरपूरजवळच अरणभेंडी नावाचे एक गावात ते राहत. सावताच्या पत्नीचे नाव जनाबाई. जनाबाईचा पांडुरंगाकडे एवढा ओढा नव्हता; पण सावता विठ्ठलभक्त होता. त्याची हरिभक्ती पाहून जनाबाईला आनंद व्हायचा. एकदा काय झाले, जनाबाईच्या माहेरची खूप माणसे अरणभेंडीला आली. तिला खूप आनंद झाला, पण सावता कुठे घरात होता? तो आपल्या शेतात खुरपे घेऊन काम करत होता. तोंडात सारखा 'विठोबा! विठोबा!' असा गजर. बायको शेतावर त्याला बोलवायला आली. हाक मारू लागली; पण सावताला तिची हाक ऐकूच आली नाही. कारण त्या मुख्यांच्या वास्यात त्याला प्रत्यक्ष पांडुरंग दिसत होता. ते दोघे एकमेकांशी बोलत होते. सावता एकदम तल्लीन झाला होता. बायको चिडली. तिने ओचीपदर खोवला नि तडक शेतात शिरली. तिने सावताला गदागदा हलवले; पण तरीही सावताला भानच नव्हते. ती रागाने घरी गेली. माहेरच्यांना तिने दुःखाने सांगितले " बाबा! ह्यांना कसलेच भान नाही. मुलांचे नाही. तुम्ही किती वर्षांनी आलात त्याचे भान नाही. सारखे 'विठोबा विठोबा' करत मुख्यांकडे पाहत बसले आहेत. किती हाका मारल्या. किती गदागदा हलवले; पण त्यांना ऐकूच येत नाही. काय करु?" म्हणून ती रडू लागली. सर्वांनी तिचे सांत्वन केले आणि सर्वजण शेतावर गेले. बघतात तर सावता माळी शेतात टाळ घेऊन नाचत होता. आनंदाने वेडा | झाला होता. तोंडात सारखा 'पांडुरंग ! पांडुरंग !!' हा घोष होता आणि गंमत म्हणजे शेतातला मुळा आणि भाजी सावत्याभोवती गरागरा नाचत होती. तो चमत्कार पाहून सावता माळ्याची विठोबाची भक्ती सर्वांना जाणवली. सावताची बायको जनाबाई. तिचे वडील, आई, भाऊ सर्वांनी भर शेतात सावता माळ्याला साष्टांग नमस्कार घातला. सावता आपला भजनात तल्लीनच, त्याला कसलेच भान नव्हते; पण जेव्हा त्याला जाग आली तेव्हा बघतो तर सर्वजण त्याच्याभोवती हात जोडून उभे होते. आपल्या सासरकडची मंडळी आपल्याला भेटायला आली आणि आपण घरात नसणार म्हणून बायको चिडली असणार, हे त्याला कल्पनेने कळले. सावता सर्वांच्या पाया पडला आणि म्हणाला, “बाबांनो! मला क्षमा करा. ह्या विठोबाच्या नादाने मी घरच विसरून गेलो. मला सगळीकडे केवळ तोच दिसतो. त्यामुळे मी सतत त्याच्याच सहवासात राहतो. ह्या शेतात तर प्रत्येक मुळ्यात प्रत्येक भाजीत मला तो दिसतो. पण मह क्षमा करा..." आणि बायकोकडे पाहून तो प्रसन्न हसला आणि तिला सावताने उपदेश केला 

-प्रपंची असूनी परमार्थ साधावा याचे आठवावा पांडुरंग ॥उंच नीच काही न पाहे सर्वथा। पुराणींच्या कथा पुराणींच ॥ पटका आणि पत्र साथ उतावीत या उगा तो काळ जाऊ नेदी ॥ सावता म्हणे कांते जपें नामावळी । हृदयकमळी पांडुरंग 

-असा हा सावतामाळी विठ्ठलभक्त होता. ॥


सुविचार 

-कांदा, मुळा, भाजी अवधी विठाई माझी संत सावतामाळी. 


दिनविशेष - • संत सावता माळी यांचा समाधी दिन - १२९५ :


- तेराव्या शतकात पंढरीचा विठोबा चांगलाच 'लेकुरवाळा' झाला होता. ज्ञानेश्वर, नामदेव यांचे प्रभावी नेतृत्व लाभून महान संत निर्माण झाले. सावता माळी हे अशाच संतांमधील एक महान भगवत्भक्त. आपले बागकामाचे काम करीत असतानाच ते विठोबाच्या नामसंकीर्तनात तल्लीन होत असत. संबंध बागकामच त्यांना हरिरूप वाटे. माझी विठाईच कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरी कोथिंबीर या रूपांनी नटून आली आहे, अशी त्यांची भावना असे. त्यांच्या जीविताचे मर्म नामाचिये बळे न भीऊ सर्वथा । कळीकाळाच्या माथा सोटें मारु ॥ वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी । विठ्ठल गाऊनी नाचो रंगी ॥ या त्यांच्याच शब्दांत सुंदर रीतीने व्यक्त झाले आहे. अशा या महान विठ्ठलभक्ताने १३ जुलै १२९५ रोजी पंढरपूरजवळ अरणमेडी येथे समाधी घेतली. 

मूल्ये 

निसर्गप्रेम, सर्वधर्मसमभाव, भक्तिभाव. 

अन्य घटना 

- जगाच्या इतिहासातील श्रेष्ठ रोमन योद्धा ज्युलियस सीझर याचा जन्म इ. स. पू. १००

-अमेरिकन साहित्यिक हेन्री डेव्हिड थोरो यांचा जन्म १८१७ • इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्मदिन १८६४

उपक्रम

- निसर्ग निरीक्षणासाठी छोट्या सहली काढाव्या • संत सावता माळी यांचे अभंग पाठ करून म्हणून घ्यावेत.

  

 समूहगान देश हमारा, निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा....

 - - सामान्यज्ञान

 • साहित्य अकादमी ही संस्था १९१४ मध्ये स्थापन करण्यात आली. भारतीय साहित्याचा विकास करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. एका भारतीय भाषेतील साहित्याचे दुसऱ्या भारतीय भाषेत भाषांतर करणे. इतिहास आणि समीक्षण प्रकाशित करणे, फेलोशि देणे ही कामे या संस्थेतर्फे केली जातात. तसेच उत्कृष्ट ग्रंथास पुरस्कार देण्याचे कामही या संस्थेमार्फत केले जाते. (५८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा