Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २४ जुलै, २०२३

नववी भूगोल- 1)वितरणाचे नकाशे

 


■प्र. पुढील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा :

(१) वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

उत्तर : अयोग्य. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखादया घटकाचे/चलाचे (उदा., तापमान, पर्जन्य, लोकसंख्या इत्यादी) एखादया प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो.

-------------------------------

(२) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

उत्तर : योग्य. (१) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात एका घटकाचे एखादया प्रदेशातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात.

-------------------------------

(२) उपविभागातील घटकांचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारांत घेऊन त्या उपविभागाचे योग्य त्या गटात (मूल्यवर्गात) स्थान निश्चित केले जाते व त्यानुसार संपूर्ण उपविभागासाठी संबंधित मूल्यवर्ग

ग्राहय धरले जाते. अशा प्रकारे, क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी (उपविभागांतर्गत) घटकांचे एकच मूल्य असते.

-------------------------------

(३) क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

उत्तर : अयोग्य. (१) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात एका घटकाचे एखादया प्रदेशातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारातघेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात.

(२) प्रत्येक गटाचे (मूल्यवर्गाचे) मूल्य वेगळे असते.

(३) त्यामुळे प्रत्येक मूल्यवर्गाच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात.

अशा प्रकारे, क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत जातात.

-------------------------------

(४) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

उत्तर : अयोग्य. (१) ज्या चलांचे वितरण विलग असते (उदा. लोकसंख्या, पाळीव प्राणी इत्यादी चलांचे वितरण) अशा चलांचेवितरण दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा वापरतात.

(२) ज्या चलांचे वितरण सलग असते, अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.

(३) उंची या चलाचे वितरण सलग असते. त्यामुळे उंची

दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशाऐवजी समघनी नकाशा वापरतात.

-------------------------------

(५) लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.

उत्तर : अयोग्य. (१) लोकसंख्या या चलाचे वितरण सलग नसते.

(२) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशाऐवजी टिंब नकाशा किंवा क्षेत्रघनी नकाशा वापरतात.

-------------------------------

(६) टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.

उत्तर : योग्य. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये मुक्तपणे विखुरलेल्या घटकाच्या मूल्यानुसार प्रत्येक टिंबाच्या आकाराचे प्रमाण ठरवले जाते.

-------------------------------

(७) समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करीत नाहीत.

उत्तर : अयोग्य. (१) जेव्हा एखादया चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो.

(२) समान मूल्य असणारी ठिकाणे एका रेषेने (सममूल्य रेषेने) जोडून

जे नकाशे तयार केले जातात, त्यांना समघनी नकाशे म्हणतात. अशा प्रकारे, समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार केले जातात.

-------------------------------

(८) टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.

उत्तर : योग्य. (१) टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना एखादया भौगोलिक घटकाविषयी केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.

(२) एखादया प्रदेशामध्ये एखादा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे, तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन त्या घटकाचे वितरण दाखवले जाते.

 (३) जो घटक एखादया प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो,

(उदा., लोकसंख्या, पाळीव प्राणी इत्यादी) अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोईस्कर ठरते. अशा प्रकारे, टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.

-------------------------------

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.

उत्तर : (अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग : वितरणाच्या नकाशांद्वारे एखादया प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध स्पष्ट होतो.

(ब) वितरणाच्या नकाशांचे प्रकार : वितरणाच्या नकाशांचे पुढील तीन प्रकार पडतात :

(१) टिंब पद्धत : मुक्तपणे विखुरलेल्या घटकाचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा वापर केला जातो. टिंब पद्धतीच्या नकाशात एखादया प्रदेशामध्ये एखादा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे, तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन त्या घटकाचे वितरण दाखवले जाते.

(२) क्षेत्रघनी पद्धत : क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे तयार करताना एखादया भौगोलिक घटकाविषयीची आकडेवारी ५ ते ७ वर्गमूल्यांच्या आधारे वेगवेगळ्या छायांनी किंवा छटांनी दाखवली जाते.

(३) समघनी पद्धत : जेव्हा एखादया चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो.

उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. समघनी पद्धतीच्या नकाशात संबंधित चलाचे वितरण सममूल्य रेषांच्या आधारे दाखवले जाते.

-------------------------------

(२) समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक स्पष्ट करा.

उत्तर : समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) जेव्हा एखादया चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. याउलट जेव्हा एखादया चलाचे वितरण विलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी

क्षेत्रघनी पद्धतीचा वापर केला जातो.

(२) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध यांचा वापर केला जातो.

(३) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो.

-------------------------------

(३) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण

दाखवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.

उत्तर : (१) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त असते.

(२) लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो. 

(३) टिंब पद्धत : टिंब पद्धतीच्या नकाशात एखादया प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे, तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन त्याचे वितरण दाखवले जाते. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे, तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखवली जाते.

(४) क्षेत्रघनी पद्धत : क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य

विचारात घेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात. प्रत्येक गटाचे (मूल्यवर्गाचे) मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या (मूल्यवर्गाच्या) मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या छटांच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनिहाय वितरण दाखवले जाते. 

-------------------------------

 प्र.  पुढील माहितीसाठी कोणत्या नकाशापद्धतीचा वापर कराल ?

(१) जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

उत्तर : क्षेत्रघनी नकाशा पद्धत.

-------------------------------

(२) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.

उत्तर : समघनी नकाशा पद्धत.

-------------------------------

(३) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.

उत्तर : टिंब नकाशा पद्धत.

-------------------------------

(४) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.

उत्तर : क्षेत्रघनी नकाशा पद्धत.

-------------------------------

(५) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण.

उत्तर : समघनी नकाशा पद्धत. 

-------------------------------

*प्र.  पाठ्यपुस्तक पान क्र. ८ वरील कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :

(१) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे ?

उत्तर : जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे.

-------------------------------

(२) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.

उत्तर : जिल्ह्यात पूर्वे दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे व पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

-------------------------------

(३) सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ते ठिकाण कोणते ?

उत्तर : सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे. ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहर होय.

-------------------------------

(४) सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

उत्तर : गगनबावडा हा सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा