Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २३ जुलै, २०२२

आपले सण -पोळा

                                                          आपले सण

                                                              पोळा 

  विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात विविध सण साजरे केले जातात त्यापैकी महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण म्हणजे बैलपोळा. हा सण भारताच्या विविध भागात देखील साजरा केला जातो.
शेतीच्या कामात शेतकऱ्यांबरोबर राहणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र, सुखदुःखाच्या सोबती म्हणजे बैल. या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, वर्षभरातून एक दिवस तरी त्याला विश्रांती मिळावी या हेतूने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्याला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा सण आहे. श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो.
पोळ्याच्या आधीच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. बैलांना हळद व तुपाने किंवा तेलाने शेतात यालाच खांद शेकणे असे म्हणतात. बैलांना संपूर्ण सजवले जाते.या दिवशी बैलांना कामातून पूर्ण आराम मिळतो. शेतकरी बैलाला सजवण्यासाठी बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करतात त्यांच्यासाठी बाशिंग, तोडे, घुंगराच्या माळा, कवड्याच्या माळा, गोंडे ,रंग, पाठीवर टाकण्यासाठी झुल अशा विविध वस्तू आणतात.
पोळ्याच्या दिवशी बैलाच्या पूर्ण अंगावर रंगाने ठिपके काढतात. त्याच्या पाठीवर झूल टाकतात, शिंगाना बेगड, गळ्यात विविध घुंगरांच्या माळा, कवड्याच्या माळा व पायात तोडे घालतात. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा शृंगार करतो
पोळ्याच्या दिवशी घरातील महिला बैलांसाठी पुरणाचा स्वयंपाक करतात लहान मुले मुली या दिवशी अतिशय आनंदात असतात.
त्यानंतर पोळा भरविला जातो गावातील विशिष्ट ठिकाणी सर्व बैल जमा होतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळील आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात तिथे सर्व बैलजोड्या ढोल. सनई वाजवत एकत्र आणल्या जातात. नंतर मानचाई तोरण तोडतो व पोळा फुटतो बैलाला मारुतीच्या देवळात नेतात नंतर घरी आणले जाते. घरातील महिला बैलांच्या पायावर पाणी टाकतात, बैलाच्या कपाळावर हळद, कुंकू,तांदूळ लावून त्याला ओवाळतात व पुरणपोळीचा गोड घास खाऊ घालतात.
नंतर बैलांना घरोघरी नेऊन त्यांची पूजा करतात आणि पुरणपोळी खाऊ घालतात. 
_________________________________________

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा