Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास १.इतिहासाची साधने प्रश्नोत्तरे

          १.इतिहासाची साधने प्रश्न:- इतिहासाची साधने कोणती ?
उत्तर :- भौतिक, लिखित आणि मौखिक


प्रश्न:- गांधीजींचे ऐतिहासिक स्मारक कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर :- पुण्यातील आगाखान पॅलेस


प्रश्न:- लिखित साधने कोणकोणती आहेत ?
उत्तर :- पत्रव्यवहार, नोंदी, वृत्तपत्रे व चरित्रे


प्रश्न:- विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे मासिक कोणते ?
उत्तर :- निबंधमाला


प्रश्न:- गोपाळ हरी देशमुख यांचे साप्ताहिक कोणते ?
उत्तर :- प्रभाकर व शतपत्रे


प्रश्न:- ध्वनीमुद्रित म्हणजे काय ?
उत्तर :- भाषणे, गीते जतन करून ठेवण्याचे साधन


प्रश्न:- चित्रपटाची निर्मिती प्रथम कोणत्या व्यक्तीने केली ?
उत्तर :- दादासाहेब फाळके


प्रश्न:- पहिली चित्रफीत कोणत्या साली निर्मित करण्यात आली ?
 उत्तर :- इ.स. १९१३


प्रश्न:- ऐतिहासिक नकाशे व आराखडे कोणत्या संस्थेमार्फत निर्माण करण्यात आली ?
उत्तर :- सर्व्हे ऑफ इंडिया


प्रश्न:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केलेली वृत्तपत्रे व साल कोणते ?
उत्तर :- जानेवारी १९२० मुकनायक, इ.स. एप्रिल १९२७ बहिष्कृत भारत आणि जनता व प्रबुद्ध भारत


प्रश्न:- अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कोणत्या स्वातंत्र्यलढ्यातील वीराची व त्याच्या कार्याची माहिती मिळते ?
उत्तर :- स्वातंत्र्यवीर सावरकर


प्रश्न:- मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा सेवा आश्रमात कोणत्या नेत्याची देशभक्ती दिसून येते ?
उत्तर :- महात्मा गांधी


इतिहासाची साधने महत्वपूर्ण आशय

१. भौतिक साधने
२. लिखित साधने
३. मौखिक साधने


१. भौतिक साधने
१) इमारती व वास्तू (इमारती, मूल, रस्ते, पाणपोया, अंदमान सेल्युलर जेल इ.)

२) पुतळे आणि स्मारके राज्यकर्ते समाजातील प्रतिष्ठत - व्यक्ती याविषयी माहिती, उदा. विविध ठिकाणची स्मारक..


२. लिखित साधने

पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, नियतकालिक, आत्मचरित्रे, पुस्तक, फॅक्टरी रेकॉर्ड, परदेशी व्यक्तींच्या नोंदी

वृत्तपत्रे व नियतकालिके- समकालीन घटनांविषयी माहिती राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींबद्दल माहिती. उदा. विष्णूशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला. लोकहितवादी प्रभाकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता.. प्रबुद्ध भारत

नकाशे व आराखडे- शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप लक्षात येते. सर्व्हे ऑफ इंडियाने सर्व प्रांताचे शहराचे किंवा नकाशे बनवले आहेत.


३. मौखिक साधने :-
लोकगीते पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, स्फूर्ती

स्फूर्तीगीते - स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात रचना काही लिखित तर काही मुखोद्गत.

पोवाडे - घटना अथवा व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती.

प्रेरणा, चैतन्य, स्फूर्ती निर्मितीसाठी उपयोग..

श्राव्य व दृकश्राव्य साधने –

ध्वनिमुद्रण, चित्रपट यांचा समावेश

छायाचित्रे – दृक साधन अधिक विश्वसनीय

ध्वनिमुद्रिते (रेकॉर्डस् ) श्राव्य साधन. कोणत्याही नेत्याने केलेले भाषण, गीत इ. रविंद्रनाथ टागोरांचे 'जन गण मन' हे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, म. गांधी यांची ध्वनीमुद्रित भाषणे श्राव्य साधने म्हणून अभ्यासासाठी वापरतात.

चित्रपट दृकश्राव्य साधन १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा