Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ७ मे, २०२१

बोधकथा- महाराष्ट्र राज्य

                




          'महाराष्ट्र राज्य स्थापनादिन १ मे' भारतात बोलल्या जाणाच्या भाषांची व त्या भाषांच्या बोलींची संख्या सुमारे १६०० आहे. त्यापैकी असामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमीळ, तेलगु, व उर्दू या भाषा प्रमुख आहेत. त्यातील संस्कृत, सिंधी व काश्मिरी या भाषा कोणत्याही राज्याच्या राजभाषा नाहीत. जम्मू व काश्मिरची राजभाषा उर्दू आहे. एक भाषा बोलणाऱ्या जनतेच्या सलग प्रदेशाचे एक राज्य असणे म्हणजे भाषावार प्रांतरचना होय. इंग्रज काळात एकेका प्रांतात अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रदेश असायचे. तसेच एक भाषा बोलणारे लोक अनेक प्रांतात विभागलेले होते. एक भाषक लोकांत सहज एकी होते, ती होऊ नये म्हणून इंग्रजांनी जाणून बुजून अशी प्रांतरचना केलेली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषावार प्रांतरचना करायचे आपल्या सरकारने ठरविले. एक भाषा बोलणाऱ्या लोकांचे एक राज्य असले तर सांस्कृतिकदृष्ट्या ते राज्य एकसंघ बनते आणि त्या राज्याचा विकासही योग्यरित्या होतो, या उद्देशाने भाषावार प्रांतरचना होणे जरुरीचे होते. केंद्र सरकारने सन १९५६ मध्ये भारतातील बहुतेक सर्व राज्यांची भाषावार प्रांतरचना केली. परंतु गुजराती व मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जनतेचे एक द्विभाषिक बनविले. गुजरात व महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये न करता केवळ मुंबईच्या प्रश्नावरून हे द्विभाषिक बनविले होते. या द्विभाषिकाविरूध्द गुजरातेत महागुजरात परिषद आणि महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती लढा देण्यासाठी कार्यरत झाली. द्विभाषिकांबद्दल दोन्ही भाषा जनतेत असंतोष होताच. सतत चार वर्षे जनतेने आंदोलने केल्यानंतर अखेर १ मे १९६० रोजी या द्विभाषिकाची मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये बनविण्यात आली. 

              मराठी भाषिकांची कित्येक दिवसांची मागणी मान्य झाल्याने १ मे १९६० हा दिवस महाराष्ट्रात अत्यानंदाचा दिवस होता. मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य या दिवशी अस्तित्वात आले व मराठी ही राजभाषा झाली, ही आपल्या अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हा वाढदिवस आपण दर वर्षी) अतिशय साजरा करीत असतो. महाराष्ट्र राज्य हे वीरांचे, संतांचे राज्य आहे तसेच ते कलावंतांचेही राज्य आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग आणि दुर्गम शिखरांच्या मुबलक उपलब्धतेमुळे साहजिकच शिल्पकलेचा महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त विकास झाला. दुर्ग, देवालये , लेणी, स्तूप, मूर्ती हे महाराष्ट्राच्या शिल्पकलेचे अलौकिक असे रूप आहे आणि वेरूळ - अजिंठ्याने तर महाराष्ट्राचे नाव जागतिक कलेच्या नकाशात अमर केले. शिल्पकलेप्रमाणेच चित्रकला, गायनकला, काव्य, साहित्य, नाट्यकला इतर अनेक कलांमध्ये महाराष्ट्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या महाराष्ट्र राज्यास १ मे रोजी प्रणाम आमुचा ! जय हिंद !! जय महाराष्ट्र !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा