Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ८ मे, २०२१

बोधकथा- नाशाचे कारण आपसांतील भांडण

  'नाशाचे कारण आपसांतील भांडण



                 कज्जलक नावाचा एक फासेपारधी होता. एकदा त्याने नेहमीप्रमाणे जाळे लावले व तो झाडाआड लपून बसला. थोड्या वेळाने त्या जाळ्यात चार मोठे पक्षी अडकले. ते पाहून कज्जलकाला फार आनंद झाला. तो उठून त्या   जाळ्याजवळ जाणार, तेवढ्यात एक चमत्कार घडला. त्या चारही पक्ष्यांनी आपसात संगनमत केले. त्यांची एकजूट झाली. पायातील जाळ्यासकट ते उंच उडाले. कज्जलकाने कोणत्याही प्रकारे दुःख केले नाही. तो निराश झाला नाही. पक्षी जाळे घेऊन चालले होते त्या दिशेने तो जमिनीवरून धावू लागला. वाटेत एक आश्रम होता. तेथील मुनींनी आपली सगळी धार्मिक कामे आटोपली होती. ते आश्रमाबाहेर मोकळ्या जागेत गोष्टी करत बसले होते. ते म्हणाले, “अरेरे, हे कसे रे तुझ वागणे?” पक्षी आकाशात उडत आहेत आणि तू जमिनीवरून त्यांचा पाठलाग करतोय. ते सापडतील का?” पारधी म्हणाला, “होय. काही वेळाने ते निश्चितच खाली येतील. संकटामुळे त्यांच्यात, एकजूट झाली होती. संकट कमी झाले म्हणजे तुला कधीतरी एकतेची भावना नाहीशी होते.’’ थोडेसे यश मिळाल्यावर माणूस शेफारतो. पुढचा मागचा विचार करण्याची शक्ती नाहीशी होते. जय मिळवण्यात मोठा वाटा कोणाचा, असा वाद त्यांच्यामध्ये निर्माण होतो. मग ते भांडू लागतात. त्यांच्यात फूट पडते. ते परस्परांचा द्वेष करू लागतात. त्याचा परिणाम असा होतो की, सर्वांचे अधःपतन घडते. हा जगाचा सामान्य नियम आहे. तो या पक्ष्यांनाही लागू आहे. मी त्यांच्या आपसांतील भांडणाची आणि खाली पडण्याची वाट पहात आहे." असे म्हणून कज्जलक जाळ्याच्या दिशेने पुन्हा धावू लागला. त्याचे म्हणणे खरे ठरले. थोड्याच वेळाने ते पक्षी आपसात भांडू लागले. एक म्हणाला, “ही माझी युक्ती आहे.” दुसरा म्हणाला, "पण सर्वात अधिक शक्ती माझी आहे.” तिसरा म्हणाला, "कोणीकडे उडायचे ते मी सांगितले." चौथा म्हणाला, “मी विरुध्द दिशेने उडत नाही, हे तुमच्यावर माझे उपकारच आहेत.” हळूहळू यांचे असहकार्य सुरू झाले. एक जोराने ओरडू लागला तर दुसरा संथपणे उडायचा. तिसरा मुळीच उडायचा नाही. एक सरळ उडायचा तर दुसरा तिरपा उडायचा. तिसरा वर उडायचा तर चौथा खाली ओढायचा. लवकरच ते एकमेकांशी मोठमोठ्याने भांडायला लागले. आपण जाळ्यात अडकले आहोत, हे विसरून ते एकमेकांना मारायला लागले. त्याबरोबर ते त्या जाळ्यात गुरफटले गेले आणि धदिशी खाली पडले. थोड्याच वेळात तो पारधी कज्जलक तेथे येवून पोहचला. त्याने रागाने आपल्या हातातील दांडक्यांचा एकएक फटका त्या पक्ष्यांना मारला. मरता मरता ते पक्षी म्हणाले, 'अरेरे! आम्ही आपसांत भांडलो म्हणून आमचे मरण ओढवले. ' 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा