Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ८ मे, २०२१

बोधकथा-शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

      शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

                   कर्मवीर भाऊराव हे स्वतः परिवर्तनवादी होते. त्यांच्याप्रमाणे संपूर्ण समाज परिवर्त व्हावा मुक्त विचार करणारी पिढी निर्माण व्हावी आणि जीर्ण झालेल्या कालबाह्य रुढी, परंपरा, कर्मकांड या विळख्यात समाजाला मुक्त | मनोवृत्तीचे विद्यार्थी निर्माण व्हावेत असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी जीवनकार्य सार्थकी लावले. १९२७ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म | यांच्या हस्ते छत्रपती शाह बोडींग हाऊस या नावाने वसतीगृहाचे उद्घाटन केले. याप्रसंगी एकत्रित मुले पाहून म. गांधी म्हणाले, भाऊराव साबरमती आश्रमात मला जे जमले नाही, ते तुम्ही येथे यशस्वी करून दाखविले आहे. यावरून शिक्षणमहर्षी भाऊराव पाटील यांच्या कार्याची ओळख पट कर्मवीराचा जन्म दि. २२ सप्टेंबर १८८७ मध्ये कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे सर्वसाधारण कुटुंबात झाला. काही माणसे ही जन्मतः पत्र असतात. काहींवर मोठेपण लादले जाते. तर काही माणसे ही स्वकर्तृत्वाने मोठी होतात. त्यांच्या पाठीशी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कोणतेही पाठबळ नसते. अशा सर्व शून्य क्षेत्रातून असणाऱ्यापैकी भाऊराव पाटील होते. परंतु सामाजिक वातावरणाने त्यांना बरेच काही शिकविलें त्यांच्या परिश्रमाने व दुरदृष्टीने सन १९५९ साली राष्ट्रपतीनी त्याना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविले. तर पुणे विद्यापीठाने डी लिट वा सल्यान पदवीने भाऊंना गौरविले. त्यांच्या स्वकर्तृत्वाने ते कर्मवीर म्हणून कीर्तीमान झाले. अजरामर झाले. सन १९०२ मध्ये कोल्हापूरच्या जैन वसतीगृहात त्यांनी राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेव्हाच त्यांना छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य पाहावयास मिळाले. महाराज कार्यामुळे ते प्रभावित झाले. पुढे त्यांचा राष्ट्रपिता महात्मा फुलेच्या सत्यशोधक चळवळीशी संबंध आला. त्या चळवळीचे सक्रीय सभासद झाले व पुर | सत्यशोधक चळवळीचे प्रभावी नेतेदेखील बनले. सर्व अनार्थाचे मुळ अविद्येत आहे. हे समजल्यामुळे सर्वप्रथम त्यांनी सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. एकाच वसतीगृहात | जातीधर्माची मुले एक त्र राहत असल्याने जातीवाद नष्ट होण्यास मदत झाली. त्यांनी दि. २५ सप्टेंबर १९१९ ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सम १९३५ साली त्यांनी रयत शिक्षण संस्थेची कायदेशीर नोंदणी केली व त्याद्वारे गाव तेथे शाळा हा उपक्रम राबविला. अशा प्रकारे रयत शिक्षण संस्थेचा माध्यमातून स्वावलंबीत शिक्षण, श्रममहात्म्य, कमवा व शिका -शिकवा स्वाभिमान-स्वाध्याय आणि समता इत्यादींचा देशातील शैक्षणिक क्षेत्रा "आदर्श ठेवून ठसा. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे या वीर पुरुषाला जनता शिक्षणमहर्षी म्हणू लागली. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हे प्रमुख साधन आहे. शिक्षणाशिवाय मनुष्य मतिहीन आणि गतीहीन बनतो, म्हणून तो वित्तहीन होतो. म्हणून त्यांनी ही शिक्षणाची गंगा गरिबापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. अर्थात याकरिता त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही फार मोठा सहभाग होता. या माऊलीने भाऊरावाच्या सत्कार्यार्थ स्वतःच्या | अंगावरील दागिनेसुद्धा विकले. राजकारणापेक्षा समाजकारण कठीण असते. कारण राजकारणात लोकांच्या खांद्यावरून पुढे चाल करावी | लागते. तर समाजकारणात लोकांना आपल्या खांद्यावरून पुढे न्यावयाचे असते. म्हणून प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीच्या श्रद्वावर उभी असते.. यांचे भान प्रत्येक पिढीला असावयास पाहिजे. ते भान भाऊरावाना होते. म्हणूनच त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचा सामान्य माणसाचा उत्कृर्ष हाच केंद्रबिंदु होता. संस्थेच्या सामान्य माणसाचा उत्कृष हाच केंद्रबिंदु होता. संस्थेच्या व्यवस्थापनात जात, गोत, पथ यांना मुळीच थारा नव्हता. तिचे स्वरूप | सर्वसमावेशक परंतु राजकारणापासून अलिप्त होते. संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरची धर्मशाळा सुपूर्द केली. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटीलही उपस्थित होते. हे तिन्ही महापुरुष समकालीन होतेच, शिवाय समाज सुधारणेच्या समध्येयानेही प्रेरित होते हे विशेष. कर्मवीर भाऊराव पाटील दि. ९ मे १८५९ आपल्यातून गेले तरी त्यांचे कार्य मात्र अजरामर आहे. कृषी वर भर ह्या बाबी समाजाच्या उपयोगी आहे. → सुविचार मला जे जमते ते कोणालाही जमू शकेल, कारण मी ही एक सामान्य माणस आहे.

1 टिप्पणी: