Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मराठी व्याकरण,9 वी 10 वी,शब्दसिध्दि

 शब्दसिद्धी भाग - १




विद्यार्थी मित्रांनौ आजपासून आपण मराठी विषयाचे व्याकरण व भाषाआभ्यास या भागातील शब्दसिद्धी हा भाग सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थांनी दिलेला अभ्यास पूर्ण करुन, त्याची नोंद आपल्या गृहपाठाच्या वहीत करावयाची आहे...


आपल्याला यावर्षी शब्दसिद्धीतील खालील प्रकार अभ्यासायचे आहेत.

१) उपसर्गघटित शब्द

२) प्रत्ययघटित  शब्द

३) अभ्यस्त शब्द


त्यापूर्वी ...

- शब्दसिद्धी म्हणजे काय  ?

• भाषेमधला शब्द कसा तयार होतो, त्याला शब्दसिद्धी म्हणतात . ( सिद्ध होणे = तयार होणे )


• शब्दांचे दोन प्रकार : 

१) सिद्ध शब्द  

( सिध्द शब्द हा भाग आपल्याला  यावर्षी अभ्यासासाठी नाही , ) 

२) साधित शब्द


- सिद्ध शब्द

• भाषेत शब्द जसा आहे , तसा वापर केलेल्या शब्दांला सिद्ध शब्द म्हणतात ...


- सिध्द शब्दांचे चार प्रकार 

१) तत्सम शब्द २) तद्भव शब्द

 ३) देशी शब्द ४) परभाषीय शब्द


१) तत्सम शब्द 

• संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या    शब्दांना तत्सम शब्द म्हणतात .

उदा. 

दीप , अग्नी , चक्र , दुग्ध , गृह इत्यादी .


२) ताद्भव शब्द : 

• संस्कृत शब्दांपासून मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात .

उदा.

दीप  -->  दिवा , अग्नी -->  आग , चक्र -->  चाक इत्यादी 


३) देशी शब्द 

जे मूळ मराठीतील शब्द आहेत , त्यांना देशी शब्द म्हणतात .

उदा.

दगड , डोळा , घोडा , झाड , पोट , लुगडे इत्यादी .


४) परभाषीय शब्द 

• इतर भाषातून मराठी भाषेत रूढ झालेल्या ( आलेल्या ) शब्दांना परभाषीय शब्द म्हणतात.

उदा.

हिंदी -----> भाई , बात , दिल , बच्चा इत्यादी .

फारसी ---> अब्रू , पोशाख , हकिकत , महिना इत्यादी .

अरबी ----> इमान, जाहीर , खर्च , अर्ज इत्यादी .

गुजराती --> दादर, रिकामटेकडा, दलाल, ढोकळा इत्यादी .

कानडी ---> खलबत्ता, विळी, अडकित्ता, भांडे इत्यादी 

इंग्रजी ----> स्टेशन, आँफिस , बस , पेन इत्यादी .

पोर्तुगीज -> पगार, बटाटा, तुरुंग, कोबी इत्यादी .


( टिप : सिध्द शब्द हा भाग आपल्याला  यावर्षी अभ्यासासाठी नसला  ,  तरी पूर्वअभ्यास म्हणून आपल्याला हा भाग माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या भागावर पूर्वअभ्यासाचा भाग म्हणून परीक्षेत प्रश्न येऊ शकतात . याची नोंद घेऊन   अभ्यास करायचा आहे. ) 


पुढील भाग पुढच्या तासिकेला....

शब्दसिद्धी भाग - २


विद्यार्थी मित्रांनौ मागिल भागात  आपण मराठी विषयाचे व्याकरण व भाषाआभ्यास या भागातील शब्दसिद्धीचा (१) सिध्द शब्द व त्याचे प्रकार हा प्रकार शिकलो , आता आपण

(२)  साधित  शब्द व त्याचे शब्द प्रकार समजून घेऊयात...


२) साधित शब्द

• ( मुद्दामहून ) तयार केलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात .


- साधित शब्दांचे चार प्रकार आहेत :

१) उपसर्गघटित शब्द

२) प्रत्ययघटित शब्द

३) सामासिक शब्द

४) अभ्यस्त शब्द

( यातील सामासिक शब्द हा शब्द प्रकार आपल्या अभ्यासक्रमात नाही .)


१) उपसर्गघटित शब्द :

• मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात , त्यांना उपर्गघटित शब्द म्हणतात .

• आधी लागणाय्रा अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात.

उदा.

उपसर्ग      +    मूळ शब्द

(१) सु       +     विचार       --------> सुविचार

(२) प्र        +    गती         ---------> प्रगती

(३) यथा     +   शक्ती        ---------> यथाशक्ति 

(४) गैर       +  समज        ---------> गैरसमज

(५) दु:        +  काळ         ---------> दुष्काळ इत्यादी .


२) प्रत्ययघटित शब्द :

• मूळ शब्दांच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात, त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात .

• नंतर लागणाय्रा शब्दांना प्रत्यय म्हणतात .

उदा.

मूळ शब्द     +    प्रत्यय

(१) रस        +   इक       --------> रसिक

(२) बुध्दी     + मान        --------> बुध्दीमान

(३) दया      + आळू      --------> दयाळू

(४) दुकान   + दार        -------->  दुकानदार 

(५) माणूस  + की         --------> माणुसकी इत्यादी .


३) सामासिक शब्द :

• दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो , त्याला सामासिक शब्द म्हणतात .

( सामासिक शब्द तयार करतांना विभक्ती प्रत्यय व अन्य शब्द गाळले जातात..)

उदा.

(१) विद्येचे आलय ----->  विद्यालय

[ विद्या + आलय   ------> विद्यालय ( संधी ) ]

(२) क्रिडेसाठी अंगण ---> क्रीडांगण 

[ क्रीडां + अंगण    -------> क्रीडांगण ( संधी ) ]

(३) महान असे राष्ट्र ------> महाराष्ट्र 

(४) भूमी हीच माता ------> मातृभूमी

(५) झेंड्याला केलेले वंदन --> झेंडावंदन


४) अभ्यस्त शब्द : 

• एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे , अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात .

 • अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत.

उदा.

(१) क्षक्षक्षण, जवळजवळ, पैसाचपैसा ---> पूर्णाभ्यस्त


(२) आसपास, जवळपास, उभाआडवा, शेजारीपाजारी, पुस्तकबिस्तक  --------> अंशाभ्यस्त


(३) कडकड, बडबड, झुळझुळ, गुटगुटीत, तुरुतुरु, कडकडाट  --------> अनुकरणवाचक


- शब्दसिद्धी या भागावर परीक्षेत येणाय्रा प्रश्नांचे स्वरूप ..


१) कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.

[ महत्व, लुटूलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार ]

    प्रत्ययघटित         उपर्गघटित         अभ्यस्त

१) ------------         --------------         -------------

२) -------------        ---------------        ------------- 

( वरिल प्रश्न बाँक्स काढून सोडवावे )


२) पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा :

( हा प्रश्न वरील प्रश्नाप्रमानेच आहे, येथे शब्द कंसात न देता आकृतीत दिल्या जाते. )


३)  ' अति ' उपसर्ग असलेले चार उपर्गघटित शब्द लिहा.


(१) ------------ (२) ---------- (३) --------- (४) -----------


( अशाप्रकारे कोणतेही उपसर्ग देऊन चार उपर्गघटित शब्द लिहायला सांगितल्या जाईल )


४) ' वान ' प्रत्यय असलेले चार प्रत्ययघटित शब्द लिहा.


(१) ----------- (२) ----------- (३) ------------ (४) ------------ 


(अशाप्रकारे कोणतेही प्रत्यय देऊन चार प्रत्ययघटित शब्द लिहायला सांगितल्या जाईल. )


५) चार अभ्यस्त शब्द लिहा.


(१) ----------- (२) ----------- (३) ----------- (४) ----------- 


• गृहपाठ


- आपण आतापर्यंत शिकलेल्या .....

• सिध्द शब्द 

( १) तत्सम शब्द         (२) तद्भव शब्द 

(३) देशी शब्द             (४) परभाषीय शब्द


• साधित शब्द

(१) उपर्गघटित शब्द    (२) प्रत्ययघटित शब्द

(३) सामासिक शब्द     (४) अभ्यस्त शब्द


वरिल सर्व शब्द प्रकाराचे प्रत्येकी दहा शब्द आपल्या वहीत खालील पध्दतीने लिहून काढा...


      शब्द                               प्रकार

(१)   -------------                    ------------- 

(२)   -------------                    -------------  

(३)   -------------                    ------------- 


( अशाप्रकारे  लिहावे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा