Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी, इतिहास व नागरिकशास्त्र,१. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा

      इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा









रिकाम्या जागा भरा
(१) 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक'........ यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त (क) लिओपॉल्ड रांके ड ) कार्ल मार्क्स

(२) 'आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज ' हा ग्रंथ .......याने लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको
(ड) व्हॉल्टेअर (क) लुसिआँ फेबर

 (३) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला असे म्हणतात. (अ) पुरातत्त्वज्ञ (क) भाषाशास्त्रज्ञ (ब) इतिहासकार
(ड) समाजशास्त्रज्ञ


(४) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेचं सुरुवात मेसोपोटेमियातील...... संस्कृतीमध्ये झाली. (ब) इजिप्शियन (ड) मोहेंजोदडो (अ) सुमेर (क) अरब

उत्तरे : (१) 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.
 (२) 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
(३) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला 'इतिहासकार' असे म्हणतात.
(५) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली.

---------------------------------------------
 (१) आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
(अ) रोमन (ब) जर्मन (क) ग्रीक (ड) फ्रेंच

(२) 'हिस्टरी' हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व होऊन गेलेल्या या .......पाचव्या शतकात ग्रीक इतिहासकाराने ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
(अ) लिओपॉल्ड रांके  (ब) जॉर्ज हेगेल (क) मायकेल फुको (ड) हिरोडोटस


(३) इ स १७३७ मध्ये जर्मनीमधील विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.
 (अ) ऑक्सफर्ड (क) गॉटिंगेन (ब) केंब्रिज (ड) स्टॅनफर्ड

(४) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने यांच्या विचारांचा प्रभाव होता.
(अ) कार्ल मार्क्स (ब) व्हॉल्टेअर (क) जॉर्ज हेगेल (ड) लिओपॉल्ड रांके

(५) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली (अ) सर्वेक्षण (ब) अॅनल्स (क) अनुवाद (ड) नॅशनॅलिझम

 उत्तरे : (१) आधुनिक इतिहासलेखनाच्या परपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. 

(२) 'हिस्टरी' हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. 

(३) इ.स. १७३७ मध्ये जर्मनीमधील गॉट काेण विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. 

(४) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने लिओपॉल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. 


(५) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये 'अॅनल्स' नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली.


---------------------------------------------
(१) 'अॅनल्स प्रणाली' सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय इतिहासकारांना दिले जाते.
(अ) जर्मनी ब)ग्रीक क) रोमन ड) फ्रेंच

(२) १९९० नंतर ...... हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.
(अ) कामगार  ब) स्त्री  (क) पुरुष (ड) शेतकरी

 (३) मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. (अ) मायकेल फुको (ब) कार्ल मार्क्स  (क) रेने देकार्त(ड) व्हॉल्टेअर

 (४) सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे,..... हे या विषयात शक्य नसते.
(अ) गणित (ब) विज्ञान (क) भूगोल (ड) इतिहास
 (५) उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला
(अ) लेखनशैली 'असे म्हणतात. (ब) इतिहासाची साधने  (क) इतिहासलेखन
(ड) निरीक्षण पद्धती

उत्तरे : (१) अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.
(२) १९९० नंतर स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला
(३) मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा मायकेल फुको याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
(४) सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे, हे इतिहास या विषयात शक्य नसते.
 (५) उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन असे म्हणतात.


 पुढील संकल्पना स्पष्ट करा : 

(१) द्वंद्ववाद.
उत्तर : (१) एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली (२) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धान्तांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात

 (२) अॅनल्स प्रणाली. उत्तर : (१) राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच 'अॅनल्स प्रणाली' असे म्हणतात.

 (२) 'अॅनल्स' (Annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे, असे मानणारी अॅनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.

.टिपा लिहा : 

(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल.
उत्तर : (१) जॉर्ज हेगेल हा जर्मन तत्त्वज्ञ होता. (२) त्याच्या 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस' या तत्त्वज्ञानपर ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख यांचे (३) 'रिझन इन हिस्टरी' हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे. (४) भूतकालीन घटनेचा अर्थ लावण्यासाठी हेगेलने 'वंद्ववादी संकलन केलेले आहे. पद्धतीची मांडणी केली.

(२) कार्ल मार्क्स.
उत्तर : (१) कार्ल मार्क्स हा शतकात होऊन गेला. जर्मन विचारवंत एकोणिसाव्या (२) त्याने 'दास कॅपिटल' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने मांडलेला वर्गसंघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो. (३) 'मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे' असे त्याने म्हटले आहे.(४) 'इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. असे त्याचे मत होते त्याच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासनव्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आली

(३) मायकेल फुको
उत्तर : (१) मायकेल फुको हा विसाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता (२) त्याने 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला (३) त्याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. (४) पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती दृष्टिकोनातून विचार केला. वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या

(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके. 
उत्तर : (१) जर्मन इतिहास तत्त्ववेत्ता लिओपॉल्ड रांके याने शास्त्रीयदृष्ट्या ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर भर दिला (२) 'द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' हे त्याचे दोन प्रसिद्ध ग्रंथ होत (३) त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्घती कशी असावी, हे सांगताना इतिहासातील काल्पनिकतेवर टीका केली. (४) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
 १) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
उत्तर : (१) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषी इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली (२) स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला (३) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला (४) सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी झाले निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू केले.

 २) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' म्हटले आहे.
उत्तर : (१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली.
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो (३) फुको यांनी इतिहासातील स्थित्यतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखनपद्घतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले आहे.

 (३) इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही. उत्तर : (१) वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सार्वकालिक नियम मांडणे शक्य होते. (२) इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो (३) त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही (४) एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही .

(४) अठराव्या शतकात इतिहासलेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले
उत्तर : (१) अठराव्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान (२) वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला या क्षेत्रांमध्ये खूप प्रगती झाली (३) वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे. असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला (४) पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहासलेखन यांसंबंधी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले त्यामुळे अतिरंजितता, भाबडेपणा जाऊन इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले

 पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) 'इतिहासलेखन म्हणजे काय?
उत्तर : इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो (१) उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे (२) त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे (३) त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे (४) उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक सशोधन करणे या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

(२) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह उत्तर : फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात पुढील धरला? मताचा आग्रह धरला (१) एखादी गोष्ट सत्य आहे, असे निःसंशयरीत्या निश्चित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये (२) एखादया समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. (३) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे

 (३) व्हॉल्टेअर यांना 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते?
उत्तर : व्हॉल्टेअरच्या मते, इतिहास लेखनासाठी (१) वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा (२) तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. (३) या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर याला 'आधुनिक इतिहास लेखनाचे जनक' असे म्हटले जाते.

 (४) इतिहास संशोधनाची उद्दिष्टे लिहा. उत्तर : इतिहासाचे संशोधन पुढील उद्देशाने केले जाते - (१) भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे आकलन करून घेणे (२) ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे. (३) सखोल अभ्यास करून त्यातील प्रांत कल्पना काढून टाकून तथ्य समोर ठेवणे. (४) गतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावणे,

 (५) प्राचीन काळात भूतकाळातील स्मृत्तींचे कोणकोणत्या गोष्टींमधून जतन केले जात असे?
उत्तर : प्राचीन काळात इतिहासलेखनाची वा घटनांची नोंद करण्याची पद्धत जगभरातच नव्हती; परंतु पुढील पद्धतीने भूतकालीन स्मृतींचे जतन केले जात असे : वेगवेगळ्या
(१) वडीलधाऱ्या व्यक्तीकडून पूर्वजांच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या गोष्टी पुढील पिढीला सांगणे.
(२) गुहाचित्रांद्वारे स्मृर्तीचे जतन करणे. (३) कहाण्यांचे कथन करणे,
(४) गीत व पोवाड्यांचे गायन करून स्मृतींचे जतन करणे.

 (६) अठराव्या शतकात इतिहासलेखनात कोणते बदल झाले ?
उत्तर : अठराव्या शतकात इतिहासलेखनात पुढील बदल झाले
(१) इतिहासलेखनात वैज्ञानिक पद्धतीने ऐतिहासिक घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. (२) ईश्वरविषयक चर्चा व तत्संबंधीचे तत्त्वज्ञान यांना महत्त्व देणे कमी झाले (३) इतिहारस्लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. (४) विदधापीठांत इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान मिळाल्याने ती इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनून तिथे सखोल अभ्यास सुरू झाला, याचा इतिहास लेखनावर परिणाम झाला,

(७) इतिहासलेखनाच्या मर्यादा स्पष्ट करा उत्तर : इतिहासाचे संशोधन, अभ्यास आणि लेखन ही अखंड चालणारी प्रक्रिया असली, तरी इतिहासलेखनाच्या काही मर्यादा आहेत, त्या पुढीलप्रमाणे - (१) इतिहासलेखनात विज्ञानातील प्रायोगिक पद्धती आणि निरीक्षण यांचा वापर करून घटनांची मांडणी करता येत नाही, (२) भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेऊन तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. (३) वैज्ञानिकाप्रमाणे इतिहासकार सर्वकालोन नियम मांू शकत नाही. (४) इतिहासकाराने मांडलेले नियम, सिद्धांत पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते

 प्र. दिलेल्या उतान्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा: (एकूण ४ गुण) पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २: ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुख्वात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सक्ष्य परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यांतील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षापूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून, तो सध्या फ्रान्समधील लुब्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे.

(१) जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख केव्हाचा आहे व तो कोठे ठेवण्यात आला आहे?
 उत्तर : जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी असून, तो फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

(२) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा आला आहे प्रथम कोठे सुरू झाली?
उत्तर : मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीच्या काळात ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा प्रथम सुरू झाली.

(३) जगातील पहिल्या शिलालेखात कोणत्या गोष्टींची नोंद केलेली आढळते? उत्तर : जगातील पहिल्या शिलालेखात पुढील गोष्टींची नोंद (१) सुमेर राज्यात होऊन गेलेल्या राजांच्या नोंदी. केलेली आढळते (२) या राजांमधील संघर्षाच्या कहाण्या. (३) दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धांच्या नोंदी. (४) या शिलालेखाने ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणता येईल

 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण)
 (१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
उत्तर : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला. त्याच्या मते - (१) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. (२) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. (३) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. (४) उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. (५) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वेशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये - (१) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. (२) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो. (३) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
(४) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.

 (३) 'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
उत्तर : (१) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक (२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली (३) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. (४) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियनस्, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. (५) १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.

(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर : लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते (१) इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. (२) इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. (३) या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. (४) इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. (५) जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भरे दयायला हवा.

. (५) एखादा दस्तऐवज इतिहासलेखनासाठी विश्वासार्ह उरण्यासाठी कोणकोणत्या अधिकारी व्यक्तींची गरज असते ?
उत्तर : इतिहासलेखनासाठी विश्वासार्ह साधनांची गरज असते. एखादा दस्तऐवज विश्वासार्ह ठरण्यासाठी पुढील अधिकारी व्यक्तींची गरज असते (१) दस्तऐवज ज्या भाषेत आणि ज्या लिपीत लिहिला असेल, ती भाषा व लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची उपलब्धता असली पाहिजे. (२) अक्षरांचे वळण आणि लेखकाची भाषाशैली कोणत्या काळातील आहे, हे जाणणारी व्यक्ती हवी.
(३) लेखनासाठी वापरलेला कागद कोणत्या प्रकारचा व कोणत्या काळात वापरला जात असे, याची माहिती असणारा जाणकार असावा. (४) पत्राखाली असणाऱ्या अधिकारदर्शक मुद्रांचा ज्याने अभ्यास केला आहे, अशी तज्ज्ञ व्यक्ती असावी. (५) दस्तऐवजातील संदर्भाचे तौलनिक विश्लेषण करून इतिहासलेखन करणारा इतिहासतज्ज्ञ असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा