Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी, इतिहास व नागरिकशास्त्र,५.प्रसारमाध्यमे आणि इतिहास

      प्रसारमाध्यमे आणि इतिहास
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। (प्रत्येकी १ गुण) 

(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ......यांनी सुरु केले.
 (अ) जेम्स ऑगस्टस हिकी (ब) सर जॉन मार्शल (क) अॅलन ह्यूम माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन

 (२) दूरदर्शन हे.....माध्यम आहे
 (अ) दृक् (ब) श्राव्य(क) दृकश्राव्य (ड) मुद्रण
३)..... हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय
(अ) दीनबंधू ब) प्रभाकर (क) दर्पण
ड) केसरी

 (४) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात केला जातो.
 (अ) वृत्तपत्र दिन  (ब) पत्रकार दिनक) मुद्रण दिन (ड) नियतकालिक दिन

 (५) 'प्रभाकर' या वर्तमानपत्रातून यांची समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
 (अ) भाऊ महाजन (क) लोकहितवादी (ब) बाळशास्त्री जांभेकर (ड) कृष्णराव भालेकर

 उत्तरे: (१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले.
(२) दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम आहे.
 (३) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय.
(४) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
(५) 'प्रभाकर' या वर्तमानपत्रातून लोकहितवादी यांची समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.

 (१) मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान..... वृत्तपत्राकडे जातो. (अ) प्रभाकर (ब) दर्पण (क) इंदुप्रकाश (ड) ज्ञानोदय

(२) 'दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे यांचे सहकारी होते. (अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ब) नारायण मेघाजी लोखंडे (क) महात्मा जोतीराव फुले (ड) लोकमान्य टिळक

(३) आगरकर व लोकमान्य टिळक यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली (अ) दीनबंधू व इंदुप्रकाश (ब) दर्पण व प्रभाकर (क) ज्ञानोदय व दिग्दर्शन

 (४) एकविसाव्या शतकात (ड) केसरी व मराठा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. (अ) प्रतिनिधी (क) वृत्तपत्रे (ब) नियतकालिके (ड) पुस्तके

(५) मराठी भाषेतील हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले (अ) दिग्दर्शन (क) प्रभाकर उत्तरे: (ब) दर्पण (ड) ज्ञानोदय

उत्तरे:
(१) मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो.
 (२) 'दीनबंधू' हे वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी होते
(३) आगरकर व लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली
(४) एकविसाव्या शतकात वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
(५) मराठी भाषेतील 'दिग्दर्शन' हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.

--------------------------------------------
(१) स्वातंत्र्यपूर्व काळात १९२४ मध्ये भारतात प्रथम.......येथे खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
(अ) मुंबई ब)कोलकत्ता(क) मद्रास (चेन्नई)ड) दिल्ली

 (२) भारतात २३ जुलै १९२७ रोजो (ब) कोलकाता ...   रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन प्रसारित केले गेले
(अ) मद्रास (ब) दिल्ली (क) बंगळुरू (ड) मुंबई

(३) १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले.
(अ) दिल्ली (ब) कोलकाता (क) मद्रास (ड) मुंबई

(४) अँडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिश्या...
. या साप्ताहिकाने छापल्या परंतु त्या रोजनिश्या खोट्या निघाल्या .
(अ) टाईम मॅगझिन (क) स्टर्न  (ब) स्टेटस्मन (ड) रॉयटर

उत्तरे :
(१) स्वातंत्र्यपूर्व काळात १९२४ मध्ये भारतात प्रथम मद्रास (चेन्नई) येथे खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले
(२) भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन प्रसारित केले गेले.
(३) १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले
(४) अॅडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिश्या स्टर्न या साप्ताहिकाने छापल्या; परंतु त्या रोजनिश्या खोट्या निघाल्या.

 पुढील संकल्पना स्पष्ट करा :
 (प्रत्येकी २ गुण)
• वेब पत्रकारिता
उत्तर : (१) आधुनिक काळात मुद्रण तंत्रज्ञानात संगणक आणि महाजाल (इंटरनेट) यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रा तही बदल झाले आहेत. (२) संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस 'वेब पत्रकारिता' असे म्हणतात,
(३) सोशल मीडिया, वेब न्यूज पोर्टल्स, वेब चॅनल्स, ट्विटर, फेसबुक, मायस्पेस, यू ट्यूब यांसारख्या वेब माध्यमांद्वारे वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जाते.
(४) ही माहिती इंग्रजी व सर्व भारतीय भाषांमधून दिली जाते. वेब पत्रकारिता व सोशल मीडिया आज प्रभावीरित्या कार्य करीत असले; तरी त्यावरील बातम्या व माहिती तपासून, खात्री करून घेणे आवश्यक असते.

टिपा लिहा : (प्रत्येकी २ गुण)
 (१) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य. 
उत्तर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले (१) लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.
 (२) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी घोरणांना विरोध केला
(३) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले (४) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

(२) प्रसारमाध्यमाची आवश्यकता.
उत्तर : प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते
(१) प्रसारमाध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारणत्यामुळे माहिती आणात जगाच्या एका टोकापासून दुस या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवास समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचा गरज असते,
 (२) प्रसाराय कांना धटा प्रत पाहायला मिळशास. ) भाहिलीघी देवाणपेवाण होते) )वात आनापा प्रसार होतो
(३) प्रशारमाध्यवारे न होते तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती प्रामीण व दुर्गम भाग्य पोहोचवली जाते.
 (४) प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुद्ढ होण्यास मदत होते म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत

(३) प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र,
 उत्तर - इलेक्ट्रॉनिक  माध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेया असतात
(१) गृतापत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात (२) तसेच बातम्या जमा करणारे वाताहर तंत्रज्ञ या सर्वाची गरज असते
(३) इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदन इत्यादींची गरज असते.
 (४) या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.

 (४) बेंगॉल गॅझेट 
उत्तर : (१) बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वृत्तपत्र होय जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केले (२) २९ जानेवारी १७८० रोजी हे वृत्तपत्र कोलकाता येथे मुरू करण्यात आले. हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते.
 (३) 'कलकत्ता जनरल अॅडव्हायझर' या नावानेही ते ओळखले जात असे.
 (४) 'बेंगॉल गॅझेट' ने भारतातील वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.


(५) 'दर्पण' या वृत्तपत्राचे विषय 
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या 'दर्पण' या वृत्तपत्रातून पुढील सर्व प्रकारचे लिखाण प्रसिद्ध होत असे.
(१) कंपनी सरकारच्या तीन इलाण्यांची जमाखर्चाची यादी
(२) या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय,
 (३) शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक
 (४) हिंदू विधवांचा पुनर्विवाह
 (५) राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामे
(६) कोलकाता येथे चिएटरची सुरुवात. अशा प्रकारचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजनपर आणि सांस्कृतिक विषयांवरील लेखन 'दर्पण' मध्ये छापले जात असे. म्हणून 'दर्पण' या वृत्तपत्राचे अंक म्हणजे सामाजिक सांस्कृतिक इतिहासच होय.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)
(१) प्रसारमाध्यमांद्यारे मिळणाच्या माहितीचे चिकित्सक आकलन करून यावे लागते 
उत्तर : (१) प्रसारमाध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते.
 (२) ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतु, सरकारी थोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
(३) प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात
 (४) जर्मनीतील 'स्टनं साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते

 • (२) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 
उत्तर : (१) एखादया बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.
 (२) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, आधारलेलो असतात सामाजिक, राजकीय घटना समाजात.
 (३) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो.
(४) दिनविशेषसारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते

(३) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे 
उत्तर (१) दूरदर्शन हे दुकू-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्र प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय,
 (२) जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
(३) सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहायला मिळतात,
(४) खेळाडू, नेते, किल्ले. युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.

 (४) वृत्तपत्रे ही माहितीच्या व ज्ञानाच्या प्रसाराची साधने आहेत.
उत्तर : (१) वृत्तपत्रांतून चालू घडामोडी प्रसिद्ध केल्या जातात. त्याबरोबरच अनेक माहितीपर लेख प्रसिद्ध होत असतात.
(२) सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बार्बीवर वृत्तपत्रांमधून चर्चा होत असते. (३) ज्ञान-विज्ञानविषयक तसेच वैचारिक लिखाण प्रसिद्ध होत असते. (४) वृत्तपत्रे शैक्षणिक, पर्यावरणीय, ऐतिहासिक आणि अन्य ज्ञान शाखांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात म्हणून वृत्तपत्रे ही केवळ दैनंदिन घटनांची वृत्ते प्रसिद्ध करतात, असे नव्हे तर ती माहितीच्या व ज्ञानाच्या प्रसाराचीही साधने आहेत.

 (५) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन' माणून साजरा केला जातो. उत्तर : (१) बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबईत 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरु केले (२) मराठी भाषेतून सुरु केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. (३) या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक होत. (४) जांभेकरांनी 'दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला '६ जानेवारी' हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

 (६) दूरदर्शन आणि इतिहास यांचे जवळचे नाते आहे. 
उत्तर : (१) इतिहासाची आवड निर्माण करण्यात दूरदर्शन महत्त्वपूर्ण कार्य करते. ऐतिहासिक व पौराणिक विषयांवरील मालिका सादर करताना इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो, (२) भारत एक खोज, राजा शिवछत्रपती, रामायण, महाभारत अशा ऐतिहासिक व पौराणिक मालिका लोकप्रिय झाल्या होत्या. या मालिका तयार करताना तत्कालीन परिस्थिती, पोशाख, वागण्याच्या पद्घती, भाषा यांची माहिती असणाऱ्या इतिहास तज्ज्ञाचीच गरज असते. (३) खेळाडू, साहित्यिक, युद्ध, ऐतिहासिक प्रसंग, किल्ले, प्राणिजगत यांची माहिती सादर करतानाही त्यांचा इतिहास सांगा लागतो. (४) सामाजिक प्रश्नांची मांडणी असो वा शिक्षण, अर्थकारण, आरोग्य इत्यादी विषयांवरील चर्चा असोत, प्रत्येक ठिकाणी त्यासंबंधी भूतकाळातील घटनांचे दाखले द्यावेत लागतात. इतिहासाच्या या आवश्यकतेमुळेच दूरदर्शन व इतिहास यांचे नाते जवळचे आहे, हे सिद्ध होते.

 (৩) भारत : एक खोज' ही दूरदर्शनवरील मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. उत्तर : पंडित नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित भारत : एक खोज' ही हिंदीमधून सादर झालेली मालिका भारतभर वाखाणली गेली, कारण
(१) या मालिकेत प्राचीन काळ ते अर्वाचीन काळ या दरम्यानचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहास मांडला गेला आहे. (२) भारताच्या कानाकोपऱ्यातील समाजजीवन, संस्कृती, कला, साहित्य यांवर प्रकाश टाकला गेल्याने लोकांना ते पाहताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. (३) सखोल संशोधन आणि प्रभावी सादरीकरणामुळे ही मालिका लोकप्रिय टरली. (४) पंडित नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन, या मालिकेतील नाट्य, लोककला आणि प्रबोधनपर माहिती यांचाही लोकांवर खूप प्रभाव पडला

पुढील प्रश्नांची २५ से ३० शब्दांत उत्तरे लिहा: (प्रत्येकी ३ गुण) * (१) वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा उत्तर : वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात - (१) स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणे. (२) देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. (३) लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे (४) समाजातील अयोग्य पटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे.

 (२) आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करा 
उत्तर : आकाशवाणी स्वातंत्र्यदिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. (१) भारताचा स्वातंत्र्यलढा, प्रधानमंत्री-राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथी जयंती असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. (२) ऐतिहासिक घटना. चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी तो इतिहास तज्ज्ञांकडून पासून पिणे आवश्यक असते. (३) ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. (४) राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो, या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

 (३) पूर्वीच्या काळात एखादी बातमी लोकांपर्यंत कशी पोहोचत असे?
उत्तर : (१) पूर्वीच्या काळात आजच्यासारखी प्रसारमाध्यमे नव्हती.
(२) राजाला एखादी बातमी किंवा आदेश लोकांपर्यत पोहोवाच असेल: तर राजाचे लोक गावोगावी दवंडी पिटवत असत. (३) एखादी बातमी एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा प्रवास करीत तो बातमी सर्वत्र पसरत असे (४) राजाचा कायमस्वरूपी आदेश असेल तर ठो सर्वना कळावा म्हणून दगडावर कोरला जात असे व तो शिलालेख गावाच्या मध्यभागी ठेवला जात असे. (४) वर्तमानपत्र' म्हणजे काप? उत्तर : (१) दररोजच्या घडनोडींची नोंद प्रसिद्ध करणारे ते वृत्तपत्र' होय. (२) बातम्या, अग्रलेख, जाहिराती, लोकांचीो मते इत्यादो बायों नियमित छापून प्रसिद्घ करणारे प्रकाशन म्हणजे 'कृत्तपत्र' हेय, (३) वृत्तपत्र हे जगाचा एक दिवसाचा इलिहास असते. (४) वृत्तपत्रे ही स्थानिक, देशांतगत व जागदिक चालू घडामोडींच्या नोंदोंचा एक ऐजिहासिक दल्वऐवज असते. एक खोज' मालिकेत कोणकोणत्या पाना (५) 'भारत मांडल्या गेल्या? : या उत्तर : 'भारत : एक खोज' या मालिकेत प्राचीन भारत से अर्वाचीन भारत या दोघ कालखंडातील समाजजीवनातील पूर्व (१) हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण-हमारे घटनांची मांडणी केलेली आहे. अन्वयार्थ, जैन-बौद्ध धर्माचा विकास इत्यादो धारिक काकों डल्या गेल्या. (२) मौर्य-सातवाहन इत्यादो राज्व्टी त्वआधी असलेली महाजनपदे व गणराज्ये यांची माहिती दिलो गेलो. (३) भारतावरील तुर्क-अरूगाण आणि मुभल आकरमषे मुघल कालखंड व त्याचे भारतावर झालेले परिगान है दिषय आहेत. (४) भारतातील भक्तिचळवळी, छत्रपने सिवजों महावाचे कार्य आणि भारताचा स्वातंत्र्य संग्राम खेरोज सर्व राजक्टर भारतातील समाजस्थितो, कला, सांस्कृतिक जोष, समारिक राजकीय चळवळी इत्यादी सर्व या माहलिकेमपून प्रभावोपणे मांडली गेली.


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गृण
 (१) वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत? 
उत्तर : वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत - (१) इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत (२) प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्त्वाच्या घटना, सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत, ज्युलियस सीझरच्या काळी 'अॅक्टा डायर्ना' (रोजच्या घटना) नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. (३) चीनमध्ये सातव्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत (४) इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. (५) अनेक राज्यांत राजांचे राज्यभरातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्त्वाच्या बातम्या राजांपर्यंत पोहोचवत असत

 (२) नियतकालिकांची व्याख्या, प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा.
उत्तर : (अ) व्याख्या : (१) ठरावीक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य, म्हणजे 'नियतकालिक' होय. (२) एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर सामान्यतः नियमितपणे प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे 'नियतकालिक' होय. (ब) प्रकार : (१) प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वैमानिक, त्रैमासिक, षण्मासिक व वार्षिक असे प्रकार पडतात.
(२) याखेरीज काही प्रासंगिक कारणासाठीही नियतकालिके काढली जातात. त्यांना 'नियतकालिके असे म्हणतात
, (क) नियतकालिकांचे स्वरूप : (१) काही नियतकालिके संशोधनाला किंवा विशिष्ट विचारसरणीला बांधलेली असतात. (२) काही नियतकालिके अर्थ. आरोग्य, कृषी, शिक्षण, ठदयोग, धर्म अशा विशिष्ट विषयाला वाहिलेली असतात (३) सिनेसृष्टी, खेळ, साहित्य आणि मनोरंजन यांना प्राधान्य देणारीही नियतकालिके असतात. (४) भारतीय इतिहास व संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका अशी इतिहासाशी संबंधित नियतकालिके प्रकाशित झाली आहेत. (५) नियतकालिके ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वपूर्ण साधने आहेत.

(३) वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा
 उत्तर : स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी जी वृत्तपत्रे सुरू झाली. त्यात 'केसरी व ' मराठा या वृत्तपत्रांचा समावेश होतो. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे १८८१ साली सुरू केली. या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान आहे. (१) या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांत जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. (२) तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर विचारमंथन केले बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयांवर मते मांडली. (३) देशभाषेतील ग्रंथ, पाश्चात्त्य ग्रंथ, विद्या यांवर चर्चा केली व त्यांतील विचार लोकांपर्यंत पोहोचवले. (४) एतद्देशीय आणि विलायतेतील राजकारण यांसंबंधी लेखन केले. (५) ज्ञानप्रसाराबरोबरच नीतिमूल्यांची जोपासना केली, वाईट रूढी परंपरा यांच्यावर प्रखर टीका करून समाज प्रबोधन केले.

 (४) भारतातील आकाशवाणीच्या प्रगतीच्या वाटचालीचा आढावा घ्या?
उत्तर : (१) भारतात १९२३ साली मद्रास (चेन्नई) येथे पहिला रेडिओ क्लब स्थापन होऊन जुलै १९२४ मध्ये या रेडिओ क्लबने प्रसारण सेवा सुरू केली. २३ जुलै १९२७ रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने (IBC) मुंबई येथे नभोवाणी केंद्र सुरू केले. याच दिवशी पहिले 'न्यूज बुलेटीन' प्रसृत करण्यात आले नभोवाणीलाच पुढे ऑल इंडिया रेडिओ (AIR) हे नाव दिले गेले.
(२) भारत स्वतंत्र ल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती य प्रसारण खायाच्या निंत्रणााती आले १९५७ साली पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले (३) सुर्यातीस सरकारी उपक्रम य कार्यक्रम यांची जनतेला माहिती देणारे अधिकृत केंद्र असे आकाशवाणीचे स्वरूप होते नंतरच्या काळात आकाशवाणीत विविध मनोरंजनाचे, प्रयोधनपर य साहित्यिक मूल्य असलेले कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. (४) ३ ऑक्टोबर १९५७ पासून आकाशवाणीने विविध भारती हा कार्यक्रम सुरू केला. आकाशवाणीयरून लहान मुले, युवा, वृद्घ, शेतकरी, कामगार अशा सर्व धरांतील व वयोगटांतील लोकांसाठी कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात, (4) विविध भारती सेवेद्वारे २४ भाषा य १४६ बोलीभाषांमधून कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात अलीकडच्या काळात आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रेडिओ मिरची सारख्या असंख्य खासगी एफ. एम. सेवा सुरू झाल्या आहेत.

 (५) भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा.
उत्तर : (१) १९५९ साली भारतात दूरदर्शनची सुख्वात झाली. १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले (२) सुरुवातीचे दूरचित्रवाणी' हे नाव बदलून 'दूरदर्शन' असे म्हटले जाऊ लागले प्रत्येक घटक राज्यातील दूरदर्शन केंद्रे सुरू झाली. महाराष्ट्रात १ मे १९७२ रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले (३) १५ ऑगस्ट १९८२ रोजी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. १९८३ मध्ये राष्ट्रीय प्रक्षेपणाला सुरुवात होऊन दूरदर्शनच्या डी. डी, मेट्रो, स्पोर्टस्, न्यूज इत्यादी वाहिन्या व दहा प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या. (४) आतापर्यंत केंद्र सरकारचीच मालकी असलेल्या या क्षेत्रात खासगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. १९९१ मध्ये परदेशी व भारतीय खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ लागले (4) सध्या भारतात राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा १००० हून अधिक वाहिन्या कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात. खेळ, बातम्या, गाणी व चित्रपट, धार्मिक व मनोरंजनपर कार्यक्रम अशा विषयांना झालेल्या स्वतंत्र व विविध भाषांतून चालणाऱ्या वाहिन्या चोवीस तास कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात.

1 टिप्पणी:

  1. २) वर्तमानपत्र हे शिक्षण आणि माहितीचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.
    Please give me answer this question

    उत्तर द्याहटवा