Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सातवी, सामान्य विज्ञान,१.सजीव सृष्टी:अनुकूलन व वर्गीकरण

१.सजीव सृष्टी:अनुकूलन व वर्गीकरणस्वाध्याय- सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

प्रश्न- परिच्छेद वाचा व पूढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :
मी पेंग्विन , बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडची बाजू ही रंगाने पांढरी आहे. माझी त्वचा ही जाड आहे व त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते झालेले आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे ही पातळ त्वचेने एकमेकांना जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे?
उत्तर : पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो. तेथे सतत हिमाचे आवरण असते. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही. त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळवतो.

आम्ही नेहमी थव्याने आणि एकमेकांना चिकटून का राहतो ?
उत्तर :
नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सहज व सोपे जाते . एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी-वाऱ्यापासून ऊब मिळते.

ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलता हवी आणि का?
उत्तर : ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे.त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे.

खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे.

पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात ?
उत्तर : निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींत कमी पाण्याच्या प्रदेशात राहण्यासाठी अनुकूलन

झालेली असतात. ही अनुकूलने पूढीलप्रमाणे आहेत :
(1) त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात.पानांचे रूपांतर काट्यांत झालेले असते.
(2) यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही.
(3) खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो.
(4) प्रकाश-संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते.
(5) मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात.

हिमप्रदेशामधील वनस्पतींमध्ये कोणकोणती अनुकूलने दिसून येतात ?
उत्तर : (1) हिमप्रदेशात सूचिपणी वृक्ष असतात.
(2) या वृक्षांचा आकार शंकूसारखा असतो.
(3) त्यांच्या फांदघांची रचना उतरती असते. त्यामुळे हिम घसरून जाते.
 (4) या वृक्षांच्या साली जाड असतात.

नायट्रोजनची कमतरता असलेल्या जमिनीत कोणत्या वनस्पती आढळून येतात ? का?
उत्तर : (1) नायट्रोजनची कमतरता असलेल्या जमिनीत कीटकभक्षी वनस्पती आढळून येतात.

 (2) वनस्पतींच्या वाढीसाठी काही घटकांची आवश्यकता असते. उदा., नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम.

(3) याकरिता घटपणीं,व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करुन आपली नायट्रोजनची गरज भागवतात. बेडकात अनुकूलन कशा प्रकारे झालेले आहे ? त्याला उभयचर का म्हणतात ?
उत्तर : (1) बेडूक पाण्यात, तसेच जमिनीवर राहू शकतो.

(2) पाण्यात असताना पोहण्यासाठी पायांच्या बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा आणि त्रिकोणी डोके ही अनुकूलने उपयोगी पडतात.

(3) त्याच्या पाठीवरील रंगामुळे त्याला गवतात लपता येते.

(4) जमिनीवर तो शक्तिशाली मागच्या पायांनी लांबवर उड्या मारू शकतो.तसेच लांब जिभेने कीटक पकडतो.

(5) बेडूक पाण्यात असताना त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. जमिनीवर असताना नाकाद्वारे आणि फुप्फुसांच्या साहाय्याने श्वसन करतो. त्यामुळे त्याला उभयचर असे म्हणतात.

 उंटाला वाळवंटातील जहाज' का म्हणतात?
उत्तर : (1) उंटाची त्वचा जाड असते.
(2) त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात.
(3) नाकावर त्वचेची घडी असते, त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते.
(4) लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
(5) त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो.
 या सर्व अनुकूलनांमुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला 'वाळवंटातील जहाज' असे म्हणतात

सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ?
उत्तर :
वेगवेगळ्या गुणघर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते.

यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो.

सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात.

सजीवांतील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. यालाच 'वर्गीकरणाचा पदानुक्रम' म्हणतात. अशा रितीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते.प्रश्न . पुढील विधाने वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा :

वाळवंटात खूप उष्णता आहे.
उत्तर : खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीरक्रियेत आणि
शरीररचनेत त्याप्रमाणे अनुकूलन झालेले असते. येथे उंटासारखा प्राणी राहू शकतो. उंदीर, साप. कोळी, सरडे
असे प्राणी बिळे करून त्यात राहतात. त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात. येथे
निवडुंगासारख्या वनस्पती आहेत. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात. रेताड आणि
रखरखीत प्रदेशांतही नेमक्याच वनस्पती आणि प्राणी वास्तव्य करून आहेत.

गवताळ प्रदेश हिरवागार असतो.
उत्तर : गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविप प्रकार आढळून येतात. गवताच्या तंतुभय मुळांमुळे जमिनोची पूप होत नाही. पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते. थंड प्रदेशात उंचीने खुजे गवत दिसते. डोंगरउतारावर, पठारी व मेदानी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार असतो.

कीटक जास्त प्रमाणात आढळतात.
उत्तर : कीटक वर्गातौल प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात. काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत. उदा., हलके शरीर, पंखांच्या दोन जोड्या इत्यादी. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात. आपल्या रंगसाधम्यने ते परिसरात मिसळून जातात. त्यांची प्रजननक्षमता देखोल जास्त असते. कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात.

आम्ही लपून बसतो.
उत्तर : लपून राहणाऱ्या प्राण्यांपैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत, म्हणून भक्षकापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळतेजुळते असते. तर दूसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा, कॅमेलियॉन वगैरे परिसराशी साधम्म्य बाळगून स्वतः दिसेनासे होतात. पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठीं झेप घालतात.

आमचे कान लांब असतात.
उत्तर :  आम्ही शाकाहारी प्राणी आहोत. कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हांला ठार करू शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी कानोसा घेत असतो. आम्ही आमचे लांब कान इकडे-तिकडे वळवून आम्ही दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो. कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो.


1 टिप्पणी: