Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

इयत्ता तिसरी, मराठी, रानवेडी

                   रानवेडी


गाण्याचा अर्थ :
ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली. त्याच्या नादी लागून सगळ्या रानात आनंदाने हुंदडली. ।। धृ ।। रानगवताची फुलं तिच्या कानांमध्ये डोलू लागली. चाईच्या फुलांच्या मोहराची माळ तिने गळ्यात सरीसारखी घातली. टंटणीची फुलं तिने नाकात चमकीसारखी घातली आणि बुरांडीची पिवळी फुलं तिने केसात माळली. ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली.।।१।। ती लहानगी मुलगी हिरवळीवर खेळली आणि वाऱ्याशी बोलली. वडाच्या पारंबीचा तिने झोका केला. तिचा झोका उंच आभाळात गेला. तिने पानसाबरीचे बोंड खाल्ल्यामुळे तिचे तोंड लाल झाले. मग ती हसत हसत मऊ गवतावर लोळू लागली. ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली. ।। २ ।। डोंगरातून वाहत खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटेने गाई डोंगरावर जोमाने चढत चालल्या होत्या. ढगांचा गडगडाट झाला. जणू ढगांचा ढोल वाजला. मुलीने रानात मोराचा नाच पाहिला. पावसाची मोठी सर येताच ती डोंगराच्या कपारीत आडोशाला लपली. पुन्हा फिरून ऊन पडले, तेव्हा मघाशी पावसात जरी ती भिजली होती, तरी ती उन्हात सुकली. (पोर डोंगरावर भाळली होती. सगळ्या रानात ती आनंदात बागडत होती.)।।३।।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा