Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सहावी, इतिहास,४.वैदिक संस्कृती

               ४.वैदिक संस्कृती
प्रश्न १-. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : 
(१) प्रारंभीच्या काळात वेदांचे जतन कसे केले गेले?
 उत्तर : प्रारंभीच्या काळात वेदांचे मौखिक पठणाच्या आधारे जतन केले गेले. 
(२) अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? 
उत्तर : अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे.
 (३) 'ब्राह्मणग्रंथ' कोणाला म्हणतात?
 उत्तर : यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे सांगणाऱ्या ग्रंथांना 'ब्राह्मणग्रंथ' म्हणतात.
 (४) वेदकाळात राजाची प्रमुख कर्तव्ये कोणती होती? 
उत्तर : प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे, ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती.


कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

(१) वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते.

(२) ऋग्वेद हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो.

(३) वेदांना ' श्रुती' असेही म्हणतात.

(४) भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे.

(५) चार वेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके व उपनिषदे रचण्यास सुमारे १५०० वर्षांचा कालावधी लागला.

(६) वेदकालीन कुटुंबव्यवस्था पितृप्रधान होती.

(७) वेदकालीन समाजात निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता.

(८) वैदिक काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता.

(९) वैदिक काळात वर्ण व्यवसायावरून ठरत असत.

प्रश्न ८. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा: *

(१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर : (१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. (२) उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. (३) दूध, दही तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते. 

(२) वेदकाळात गाईंची विशेष काळजी का घेतली जाई?

उत्तर : (१) वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. (२) त्या काळात गाईंचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई; त्यामुळे गाईंना विशेष किंमत असे (३) अशा किमती आणि उपयुक्त गाई कोणी चोरून नेऊ नयेत, म्हणून वेदकाळात गाईंची विशेष काळजी घेतली जाई.

(३) संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे, अशी अपेक्षा होती?

उत्तर : (१) संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा, (२) मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. (३) फार काळ एके ठिकाणी राहू नये. अशा पद्धतीने मनुष्याने वागावे, अशी अपेक्षा होती.

(४) वैदिक काळातील शेतीविषयी माहिती लिहा.

उत्तर : (१) वैदिक काळातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. (२) अनेक बैल जुंपलेल्या नांगराने ते शेती नांगरत असत. नांगराला लोखंडी फाळही जोडत असत. (३) शेणाचा खत म्हणून उपयोग करीत असत. (४) पिकांवरील कीड, पिकांची नासाडी करणारे प्राणी व त्यांवरील उपाय यांची त्यांना माहिती होती.
(५) वेदकालीन समाजातील आश्रम व्यवस्थेविषयी माहिती लिहा.

उत्तर : आदर्श आयुष्य कसे जगावे आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांत माणसाने काय करावे याविषयी वेदकाळात पुढील विचार रूढ होते - ( १) गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा काळ म्हणजे ब्रह्मचर्याश्रम होय. (२) पुढच्या टप्प्यात पुरुषाने पत्नीच्या साहाय्याने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडावीत. (३) तिसऱ्या टप्यात त्याने घरादाराचा त्याग करून निर्मनुष्य ठिकाणी साधेपणाने राहावे. (४) अखेरच्या टप्प्यात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजून घेण्यात व ईश्वरचिंतनात जगावे.
(६) वेदकालीन लोकांच्या 'ऋत' या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा.

उत्तर : सृष्टीचे चक्र आणि त्यानुसार फिरणारे आपले जीवनचक्र यालाच वेदकालीन लोकांनी 'ऋत' असे नाव दिले. उन्हाळ्यानंतर पावसाळा व नंतर हिवाळा हे सृष्टिचक्र नियमित आहे. त्याच्याशी संबंधित प्राणिमात्रांचे जीवन हाही त्या सृष्टिचक्राचाच एक भाग आहे. या सृष्टिचक्रात बिघाड झाला की संकटे येतात; म्हणून सृष्टीचे नियम कोणी तोडू नयेत, असा विचार 'ऋरत' या संकल्पनेत मांडला आहे.
प्रश्न ९. थोडक्यात कारणे लिहा

(१) वेदकालीन रथ खूप वेगवान होते. उत्तर : (१) वेदकाळातील लोक वेगाने पळणाऱ्या घोड्यांना माणसाळवून रथाला जोडण्यात निष्णात होते. (२) त्या काळात रथाची चाके आऱ्यांची असत. भरीव चाकांपेक्षा आन्यांचे चाक वजनाने हलके असते. अशा त्हेने वेगवान घोडे आणि आच्यांची चाके असल्यामुळे वेदकालीन रथ खूप वेगवान होते.
(२) वैदिक काळानंतर समाजात विषमता निर्माण झाली.

उत्तर : (१) वैदिक काळातील समाज वर्णव्यवस्थेवर आधारलेला होता. वर्ण व्यवसायांवरून ठरत असत. (२) परंतु नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यातूनच जातिव्यवस्थेचा उदय झाला. जन्माधारित जातिव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली.

(३) वैदिक काळानंतर पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले. उत्तर : (१) वैदिक काळात लोक देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ म्हणजे 'हवी' अर्पण करीत असत. अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधीला 'यज्ञ' असे म्हणत. (२) सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. (३) परंतु कालांतराने यज्ञ विधींचे नियम आधिकारिक कठीण होत गेले. (४) पुरोहितांच्या मदतीशिवाय यज्ञ करणे अशक्य झाल्यामुळे वैदिक काळानंतर पुरोहितांचे महत्त्व वाढत गेले.
प्रश्न १०. थोडक्यात टिपा लिहा :
(१) वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर : वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यांसारख्या निसर्गशक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. प्र

(२) वेदकालीन घरे. उत्तर : वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे, वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने शाकारलेली उतरत्या छपरांचीही घरे होती.
• (३) वेदकालीन शासनव्यवस्था. उत्तर : वेदकाळात राज्याची रचना - ग्रामवसाहती, ग्रामवसाहती समूह, जन व जनपद - अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदथ व जन - अशा चार संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचाही सहभाग असे.
(४) वैदिक काळातील कुटुंबपद्धती. उत्तर : वैदिक काळात एकत्र कुटुंबपद्धती होती. घराचा प्रमुख म्हणजे 'गृहपती' होय. त्याच्या परिवारातील त्याचे माता-पिता, पत्नी व मुले, लहान भाऊ, त्यांच्या बायका व मुले असा मोठा परिवार मिळून 'कुटुंब' होत असे. ही कुटुंबव्यवस्था पितृप्रधान होती. सुरुवातीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार होते; परंतु नंतरच्या काळात कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम होऊन त्यांच्यावरील बंधने वाढत गेली.
(५) वेदकालीन समाजव्यवस्था.

उत्तर : वेदकालीन समाज चार वर्णात विभागलेला होता ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र- असे चार वर्ण त्यांच्या व्यवसायांवरून ठरत असत. शेती व पशुपालन या व्यवसायांखेरीज अन्य समाजोपयोगी व्यवसाय करणारे व्यावसायिक व कारागीर समाजात होते. या व्यावसायिकांच्या श्रेणी असत. कालांतराने या व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला.
(६) अथर्ववेद.

उत्तर : अथर्व ऋषींचे नाव अथर्ववेदाच्या संहितेला दिलेले आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय अथर्ववेदाच्या या संहितेत सांगितले आहेत. तसेच औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. पिकांवर पडणारी कीड व पिकांची नासाडी करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय दिलेले आहेत. राजाने राज्य कसे करावे; याचेही मार्गदर्शन या संहितेत केलेले आढळते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा