Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २९ जुलै, २०२०

इयत्ता दुसरी, मराठी,९.हळूच या हो हळूच या !

         ९.हळूच या हो हळूच या !


वर्गकार्य 
१. काय ते लिहा :
 (१) दवबिंदूंचे पडतात-सडे
 (२) फुले आनंदाने उधळतात-सुगंध

२. कसे ते लिहा : 
(१) फुलांकडे जावे-हळूच
(२) फुलांचे हृदय -इवलेसे

३.कोठे ते लिहा
१)फुले लपून बसतात ते ठिकाण- पानांच्या आड - 
२) तऱ्हेतऱ्हेचे रंग- फुलांच्या अंगांवर
 
४.तर काय झाले असते?
वारा सुटला नसता तर....
 उत्तर-फुले डोलली नसती व गंध वातावरणात पसरला नसता. 

*५. एका वाक्यात उत्तरे लिहा : 
(१) इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्याजवळ आहे ?
 नमुना उत्तर : इतरांना देण्यासाठी माझ्याकडे प्रेम आहे.

 (२) फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो ? 
उत्तर : फुलाप्रमाणे अगरबत्ती, धूप, अत्तर यांचा सुगंध सगळीकडे पसरतो. 

(३) फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ व सुंदर असते?
 उत्तर : फुलाप्रमाणे आईचे, संतांचे व लहान बालकांचे मन निर्मळ व सुंदर असते. 

(४) तुम्हांला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो? 
नमुना उत्तर : मला चाफा, गुलाब व मोगरा या फुलांचा रंग व वास आवडतो.

*६. का ते सांगा व लिहा :
 (कारणे द्या :)
(१) फुले त्यांच्याजवळ बोलावतात; कारण फुलांचा गंध लोकांनी घ्यावा, असे फुलांना वाटते
 (२) 'आम्हांला भेटायला हळूच या' असे फुले म्हणाली; कारण फुले खूप नाजूक व सुंदर आहेत
 (३) फुले गमतीने डोलतात; कारण वाऱ्याचा झोत येतो.

*७. शोधा आणि लिहा :
 शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या लिहा : 
जसे - उत्तरे : वरती – जगती 
पडे - सडे 
झोताने - गमतीने
दडू - रडू 
डोलुन – उधळुन
सुंदर - अंतर 
इवलीशी – राशी 
किती - अंगावरती 
सेवाया - भेटाया - हळूच या

८. पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिहा : 
उत्तर : 
 (१) लहान =इवलीशी 
(२) खोटे खोटे लटके 
(३) सुवास = सुगंध सुगंध
(४) मन = अंतर 
(५) प्रभात = सकाळ
(६) वात वारा 
(७) सुरेख सुंदर 
(८) शरीर अंग 

 ९. पुढील शब्द असेच लिहा : दवबिंदू  सुगंध  आम्हांला निर्मळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा