Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १० जुलै, २०२०

इयत्ता- चौथी बोलणारी नदी चाचणी

बोलणारी नदी पाठावर              आधारित टेस्ट सोडवा.

लीला नदिशी बोलतांना


 
बोलणारी नदी 

एक स्वाध्याय १ एका वाक्यात उत्तरे लिहा. 
(अ) लीलाला कसली हौस होती ? विभाग 
उत्तर लीलाला खोड्या काढण्याची भारी हौस होती. 

(आ) लीलाला काय खायचे होते ? 
उत्तर लीलालागोळा बर्फाचा खायाचा होता. 

(इ) नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती ?
उत्तर नदीबाई ताई, आई आणि माईपेक्षा मोठी होती.

 (ई) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता?
 उत्तर आईने पेढ्यांचा डबा कपाटात ठेवला होता.

 (उ) पेढा घेऊन लीला कोठे गेली? 
उत्तर-पेढे घेऊन लीला गोठयाकडे गेली.

प्रश्न २ खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. 
(अ) तुम्हाला काय खावेसे वाटते ?
 उत्तर आम्हाला पेप्सी, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम हे पदार्थ खावेसे वाटतात. 

(आ) घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत, असे सांगतात ? 
उत्तर- घरातील मोठी माणसे उन्हाळ्याचे पेप्सी, बर्फाचा गोळा, कुल्फी, आईस्क्रिम, हे पदार्थ परीक्षा होईपर्यंत खाऊ देत नाहीत. कारण दारावरची कुल्फी, वा पेप्सीत कुठलेही घाण पाणी वापरण्याची शक्यता असते. हे खाल्ल्याने परीक्षेच्या वेळी आपली प्रकृती खराब होऊ नये असे, मोठ्या माणसांना वाटते.

(इ) तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते ? 
उत्तर आम्हाला कंटाळा आल्यावर घराबाहेर मित्र मैत्रीणींसोबत खेळावेसे वाटते. उन्हाळ्यात नदीत डुबावेसे वाटते, पोहावेसे वाटते आणि झाडांवर उंच चढावेसे वाटते. 

प्रश्न ३ - दोन अक्षरी शब्द - गळा, तीन अक्षरी शब्द - घोटाळा, चार अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी 'ळा' हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा.
उत्तर (१) लळा बावळा लडिवाळा 
(२) बाळा - मावळा सळासळा 
(३) पळा कावळा भळाभळा 
(४) सोळा - सोवळा - खुळखुळा

प्रश्न ४ कोण, कोणाला म्हणाले? 
(अ) "नको बुडवू शाळा. " 
उत्तर - ताई लीलाला म्हणाली.
 आ)"काय खाऊ आणलास ?
 उत्तर,- लीला मामांना म्हणाली. उत्तर 
(इ) "तू बादामी पेढे नदीत फेकलेस?' 
उत्तर आई लीलाला म्हणाली. 


प्रश्न ५ खालील शब्दांचे अनेकवचन करा. 
 डबा डबे
नदी-नदया
दिवस-दिवस
बैल-बैलं
डोळा-डोळे
पेढा-पेढ़े

प्रश्न६- लीलाप्रमाणे तुम्हांला नदीशी बोलायचे असेल, तर तुम्ही नदीशी काय बोलाल ?  उत्तर नदी माई, तू सर्वांपेक्षा मोठी आहे. किती मोठी ? जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झाली. तू तेव्हापासून आहेस. मग नदीमाई, तू देवबाप्पाला बघितलेच असशील ना ? कसा होता देवबाप्पा ? तो कसा दिसायचा ? कसा बोलायचा ? कसा लावायचा? मी देखील त्याच्यासारखा बनू शकतो का ? सांग ना मग मी काय करू!


तोंडी प्रश्न
 (१) लीला कोणत्या वर्गात शिकत होती ? 
(२) मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती काय शोधायची ? 
(३) घरामागे वावराच्या बाजूने काय होते ? 
(४) बर्फाचा गोळा खाल्ल्याने काय खराब होऊ शकते ? (५) मुले शिकून सवरून कसे होतात ? 
उत्तर (१) चौथीत (२) युक्त्या (३) नदी (४) गळा (५) सुखी

प्रश्न १(अ) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.
 (१) लोकांना..... दयावा असे तिला नाही वाटायचे.
 (२) तिचे घर होते....एका टकाला.
 (३) नदी गं नदी.....खयचाय बर्फाचा गोळा.
 (४) आलाय जर......,तर बुडव बिनधास्त शाळा (५) तिची ताई तिच्याच शाळेत.......शिकत होती. (६) 'सोळा पेढे !' ते पण....... !
 उत्तर - (१) त्रास, (२) गावाच्या, (३) लीलाला, (४) कंटाळा, (५) सातवीत, (६) बदामी.

प्रश्न ३ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा 
(१) लीलाला कोण आवडले? 
उत्तर - लीलाला बोलणारी नदी आवडली.
 (२) शाळा बुडवण्यासाठी लीलाला कोणी परवानगी दिली उत्तर शाळा बुडवण्यासाठी लीलाला नदीचे परवानगी दिली. (३) लीलाची गंमत कोणी केली? 
उत्तर - माई, आई आणि निलाने लीलाची गंमत केली. (४) लीलाच्या मामांचे नाव काय ? 
उत्तर लीलाच्या मुलाचे नाव भोला होते. 
(५) मामांनी किती पेढे आणले होते ?
 उत्तर मामांनी सोळा पेढे आणले होते. 
(६) लीलाला किती पेढे मिळाले ? 
उत्तर लीलाला एक पेढा मिळाला.


प्रश्न ४ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी २ गुण) 
(१) लीलाचे घर कुठे होते ? तिचा स्वभाव कसा होता? उत्तर - लीलाचे घर गावाच्या एका टोकाला होते. लीला चौथीत होती, पण ती खूप खोडकर होती. तिला खोड्या काढण्याची भारी हौस होती. स्वतःच्या मनात येईल ते ती करायची. तिला ज्या ज्या इच्छा असायच्या, त्या पूर्ण करण्यासाठी ती मजेशीर युक्त्या शोधायची. 
(२) बर्फाचा गोळा खाऊ का ? असे लीलाने विचारताच तिला कोण कोण काय म्हणाले? 
उत्तर बर्फाचा गोळा खाऊ का ? असे लीलाने विचारताच बर्फाचा गोळा खाऊ नकोस असे ताई व आई म्हणाली. आजी म्हणाली की, जर बर्फाचा गोळा खाशील तर तुझा गळा खराब होईल. नाकात सारं पाणी गोळा होईल.
 (३) शाळा बुडवली तर काय होईल असे माईंना वाटते ? उत्तर लीलाला जरी कंटाळा आला तरी तिने शाळा बुडवू नये असे माईंना वाटते, कारण शाळेत गेली की मुले शिकून सवरून सुखी होतात.

(४) लीलाची गंमत तिघींनी कशी केली?
उत्तर - एकदा लीलाचा भोला मामा आला. त्याने मुलांसाठी सोळा बदामी पेढे आणले होते, मात्र लीला शाळेत निघाल्यामुळे ती घरी आल्यावर पेढे खाणार होती. घरी आल्यावर, तिला नीलाने सांगितले की नदीने आठ व मी आठ पेढे खाल्ले. कारण आईने पेढे खाऊ नकोस म्हटले तरी नदीने तिला पेढे खाण्याची परवानगी दिली. हे ऐकताच लीलाला आपली चूक कळली. नदीशी पुन्हा न बोलण्याचे तिने ठरविले. अशाप्रकारे तिघींनी लीलाची गंमत केली.
एक होती मुलगी. तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन् होती भारी खोडकर. लोकांना त्राम दयावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती.

एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली "नको खाऊ." ताई म्हणाली, "नको खाऊ. " माई म्हणजे तिची आजी म्हणाली,
 “लीला गं लीला,
 नको खाऊ गोळा,
 दुखेल तुझा गळा.
 सगळ पाणी होईल, 
नाकात गोळा ।" 
आता काय करावे बरे ? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, "नदी गं नदी ।" पण नदी बोलणार कशी ? मग ती स्वतःच म्हणाली, "बोल गं लीला." मग लीला म्हणाली, “नदी गं नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा; पण माई म्हणाली, दुखेल गळा. खाऊ का नको?" पण नदी कशी बोलणार ? परत लीलाच म्हणाली, "मग खा की. पळत जा अन् पटकन खा." लीला म्हणाली, "अगं, पण तुझे कसं ऐकू ? ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ, पण नदी कशी बोलणार ? परत लीलाच म्हणाली, 'अगं, ताईपेक्षा मोठी आई. आईपेक्षा मोठी माई.पण माईपेक्षा मोठी मी-नादिबाई माझं ऐक." "बरोब्बर ।"
लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली, की आपण हवे ते करू शकतो, असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, “नको बुडवू शाळा." आई म्हणाली, “नको बुडवू.' माई म्हणाली, 
"लीला गं लीला, 
आला जरी कंटाळा, 
बुडवू नकोस शाळा. 
शिकूनसवरून होशील 
सुखी माझ्या बाळा."
लीला चिडली. कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही ? 'शाळेला जाते', असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, "नदी गं नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटतेय शाळा. काय करू?” पण नदी कशी बोलणार ? मग लीलाच बोलली, "आलाय जर कंटाळा, तर बुडव बिनधास्त शाळा." ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी, वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई अन् माईलापण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची 'बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही.

काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोलामामा नेहमी खाऊ घेऊन दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. "काय खाऊ आणलास ? तिने विचारले. भोलामामा म्हणाला, 
लीला गं लीला, 
माझ्या लाडक्या बाळा, 
खाऊ म्हणून आणलेत 
बदामी पेढे सोळा । 
'सोळा पेढे ! ते पण बदामी ।' लीला एकदम खूश झाली; पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. "संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार ।" लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत ?" लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, "शिंकाळ्यावरच्या बुटूटीत डबा ठेवलाय बघ !" लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. “आईऽऽ, यात तर एकपण पेढा नाही !" लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, "अगं, असं कस होईल ?" तिने ताईला हाक मारली, "नीला, ए नीला." "काय गं आई?" नीला परसातून पळत आली. "अगं, पेढे कुठे गेले ?" आईने विचारले. "कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले आठ अन् नदीला दिले आठ." नीला म्हणाली. "ती बादाम पेढे नदीत टाकलेस ! मूर्ख कुठली." आई नीलावर ओरडली. "अगं हो. तू म्हणालीस,

पेढे नको खाऊ माई म्हणाली, पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं नदी म्हणाली, 
"नीला ग नीला, 
पेढे आहेत सोळा
 तू घे आठ, मला दे आठ. 
"अग, पण नदी कशी बोलेल ?" माई अन् आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे ? लीलाशी बोलते तशी ।" नीला म्हणाली. "काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते ?" माईने विचारले. "अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सागते. शाळा बुडवायला लीला ?" नीला मध्येच बोलली. सांगते. हो की नाही ग लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे ? तिने थोडा विचार केला अन् म्हणाली,
 ताई, आई, माई, 
समजल ग बाई, 
नदीशी बोलायला 
आता जाणार नाही!" 
माई हसत कपाटाकडे गेली अन् डबा घेऊन आली. 
"लीला अन् नीला, 
घ्या एकेक पेढा अन् खेळायला पळा !" "पेढा मिळालाऽऽ", असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. "आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय !" माई हसून म्हणाली,५ टिप्पण्या: