Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १२ जुलै, २०२०

इयत्ता-सातवी,3 तोडणी

                   3 तोडणी


*प्रश्न १. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा : 
(१) मीराने वसंताला 'तमसो मा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ, 
उत्तर : 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंताला सांझि या अर्थाचा उलगडा व्हावा, म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!' 

(२) वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ. 
उत्तर : वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पटट सापडले. तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला ई मला कधी शाळेत पाठवणार? त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंताच्या मनातील प्रश्न शिक्षणाची ओढ दिसून येते. 

(३) 'अगं'! पण शंकरनं (दादान) शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हान समजलेला अर्थ. उत्तर : दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनी म्हणून हवा होता. म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे.

पाठ वाचा व त्यावर आधारित खालील चाचणी सोडवा.

गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्याच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठल होत. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन् शकला उमगलंच नाही. सगळ्या तोडणी वाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैलं आणि पोरांनी बादल्या, कळश्या घेतल्या व नदीवर गेली. दामले आपली बैलं नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंत झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. 'आवं पाचूंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचूंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपआपल्या परीनं बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं-भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली.
 तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. होळी या विशेषणाचे कुठलाही शाळेत स्तिक त्याला इतका मध्ये कवचनात तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. 'हं घ्या, च्या घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. 'शंकर ! अरे ये शंकर...आरं मामू चिठ्ठी देऊन गेलाय,


Class-7th, Mathematics,Multiplication and Devision of Integers | https://www.godavaritambekar.com/2020/07/class-7th-mathematicsmultiplication-and.html
.......................................................


थळात जायचंय, निघाया पायजे,' दामूचा आवाज कानावर या पडतात हा आलू,... आलू', असं बनवून गायक की धटाधटा चहा पोटात ढकलला, सगळ्यानी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं अन् थळाचा. या रस्ता धरला, शंकर-तारामती आपला कोयता सोबतीला या घेऊन मीरा अन् वसंतला बरोबर घेतलं, आज  'ऊसतोडणी'चा पहिला दिवस असला, तरी उघड़यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं, म्हणून दुपारीच  थळातून लवकर परतायचं, असं सगळ्यांनी ठरवलं  होतं, थळात पाय ठेवताच शंकरने उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोळ्या बांधल्या, नी चारा मिळाल्यानं बैलं मस्त जोगली होती. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही, हिरवा चारा मिळाल्यांन बैल मस्त जोगली होती.

     सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या  कोप्या बांधून सामान लावलं, तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. 'वश्या तुपलं पुस्तक...वश्या तुपलं पुस्तक.' देत मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण  झाली अन् वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. त्यानं शंकरच्या खांदयावर हात .' ठेवून विचारलं, 'दादा, मले साळांत कवा धाडणार?'  थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंत शंकर डात पाह्यलं असल्यानं 'साळा बिळा काय बी नाय, बस

झाली आता तुपली शाळा, खाऊन घे...आन् झोप, तांबड्यात तोडीला जायचं हाय. जा, झोप जा, असे म्हणून गप्प केल, शंकरच्या मागे उभं राहून खांदयावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यान वसंत उपाशीच झोपला, तर मीराला फार वाईट वाटल.

 कोपीबाहेर अंधूक उजेडात तारानं चूल शिलगावली तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शरण नदीवर जाऊन गुंडवर, तर मीरान कळशीभर पाणी आणल. शकरन थळात जायची तयारी चालवली होती. मीरान पाट्यावर मिरचीच वाटण वाटून आईकडे दिल, 'मिरे अग आवर लवकर, त्या वश्याला उटीव. आर आवरा लवकर, गाड्या निघाल्या.' शकरच्या आवाजानं तारान कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनं आपली गाडी जुंपली. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडक अन् कालवण घेऊन गाडीत बसली, तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोळी मागे खेटून बसला होता. तारा वसंत पाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवल अन् गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली.

शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा अन् वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसेच वसंत कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमध्ये शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंत आईला वाचायला लावताच, 'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झालीय', असं आई म्हणाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं आठवीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, "ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर
काय लिव्हलंय बग, काईच कळत नाईये."

पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. “पोराचं शिक्षण तोडलं तुमी, कामाला हातभार लागतो... पण त्याच्या आयुष्याचं काय?" "अगं व्हईल समदं, आता कुटं गाडी जरासी रुळावर आलीय." घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलले.

मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत

उत्कंठतेनं मीराकडे बघत होता. "ही वळ व्हय? हे तर संस्कृत मधील वाक्य हाय. 'तमसो मा ज्योतिर्गमय' असं लिव्हलंय," मीरा म्हणाली. "म्हणजे काय गं ताई?" ,, वसंत विचारलं. "तमसो मा ज्योतिर्गमय, म्हंजी अंधारातून उजेडाकडं," मीरानं सांगून टाकलं. "म्हंजे ग ताई?" पुन्हा वसंतनं विचारलं. "आता तुला कसं सांगू? हे बघ वश्या, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं न्हाई म्हंजी अंधार, अन् पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर ..." मीराचं बोलणं पोरं व्हायच्या आतच 11 “तर काय व्हईल?" वसंत विचारलं. "तर वाचता येईल म्हणून उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे,"  असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंत मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, "अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच." त्यांचं हे बोलणं ऐकून
तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंत शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली.

बाजार असल्यानं आज 'तोडणी' बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठमिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंत कडे पाहिलं. "वश्या, तू आज साळंला न्हाई गेलास व्हय रं?" वसंतनं हातातला खडा खाली फेकत 'कसा जाणार?' म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. "आवं ओ वसंताची माय," असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साद घातली. “आले ओ माय... ११ आले...आले," म्हणत खाली वाटत कोणी बाहेर आलेल्या ताराला पाहून "आवं समदी लेकरं शाळंला गेली, आन् तुपलं?"

वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू अन् शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, “हे बघा, यास्नी इचारा की, का शाळेला गेला नाही म्हणून,' लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीनं शंकरकडे नजर लावून, "कावं भावजी, आपल्या समद्यांची पोरं साळंला जात्यात, मग याला कशापाई घरी ठिवलं?
त्याचं शिकायच वय हाय तर शिकू द्या की, मोटा झाला की कामच करणार हाय,

"व्हय व्हय, म्या बी त्येच म्हती. हिच बी शिकणे अर्धच न्हायल" मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारा लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली, तारा स्वत:च्या शिक्षणाची आबाळ झाल्याचे म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली अन् शंकरला म्हणाली, "आव ही लक्ष्मी माय काय म्हतीया ते तर बघा, वश्याला साळला घाला म्हतीया. थोडस पैक कमी मिळल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर न्हाई ना न्हाणार. जाऊ या त्यास्नी साळला." शंकर म्हणाला, "लक्ष्मी वैणी समदं खरंय, पण..." हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. "आता पनबीन काय बी सांगू नगर, उद्यापासून त्येला साळला दाड. सगळ बोलण ऐकल्यानं दामून तोंड उघडल. कोपीबाहेर चालले सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपीबाहेर येऊन उभा राहिला. “आता समदीच म्हणत्यात तर जाऊ दया, नाई म्हणू नका. पुढला विचार करा." तारा म्हणाली. वसंतकडे पाहत 'ये, पोरा ये' म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरवाळल.

'आता तुमी समदीच म्हत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू? वसंता, ये इकडे पोरा. आता तू उद्यापासून साळला जायच बर का! हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. तिचेही डोळे पाण्यानं भरले. वसंत लगेच मित्रांना गाठलं. 'आता म्या साळा येणार,' असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला.

४ टिप्पण्या: