Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १८ मार्च, २०२४

19 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 १९ मार्च


प्रार्थना 

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.... 


→ श्लोक 

(अंभग)- जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।। - संत तुकाराम

 जे रंजल्या गांजल्यांची सेवा करून त्यांना आपलं समजतात, समाजातील अपंग, दीन, दलित शोषित यांना आपले समजून तनमनाने सेवा करतात ते खरे साधूं. 

 

→ चिंतन-

 संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला समोर जायचं असतं ! कुणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं, आपलं काम चांगलच करायचं असतं ! अपमानानं कधी खचायचं नसतं, चैतन्य सदा फुलावायचं असतं! पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढेच जायचे असतं! लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं! जीवनात खूप करण्याजोगं असतं, पण आपलं तिकडे लक्षच नसतं! रामाने कुणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं! प्रेमात लहान थोर पहायचं नसतं एकमेकांना आधार देऊन मार्गदर्शन करायचं असत!→ कथाकथन

कवीच कैवारी : दिल्लीतील एका श्रीमंताने एका नामवंत पण परिस्थितीने गरीब असलेल्या कवीच्या काव्यगायनाचा | कार्यक्रम आपल्या घरी ठेवला. कार्यक्रम अत्यंत बहारदार झाला, पण तो कंजूष धनिक त्या कवीला म्हणाला, 'तुम्ही उद्या माझ्याकडे या. मी उद्या तुम्हाला चांगली बिदागी देईन." बिदागी मिळण्याच्या आशेने दुसऱ्या दिवशी तो कवी त्या धनिकाकडे गेला असता तो धनिक त्याला म्हणाला, 'कविराज 

दणदणीत तुमच्या काव्यगायनाने जरी काही काळ आम्हाला आनंद दिलात तरी प्रत्यक्षात तुम्ही मला काहीच दिलेले नाही ना?' त्याचप्रमाणे मीसुध्दा मोठी बिदागी देण्याचे आश्वासन देऊन काही काळ आनंद दिला असल्याने आता प्रत्यक्ष बिदागी देण्याची काही गरज नाही. धनिकाचे हे बोलणे ऐकून निराश झालेल्या कवीने ती गोष्ट आपल्या मिरच्या कानी घातली. त्या मित्राचे व बिरबलाचे स्नेहसंबंध असल्याने त्याने तुम्हाला तुम्ही तो प्रकार बिरबलाच्या कानी घातला. त्यावर बिरबल त्याला म्हणाला. 'एक आठवड्याचे एकाच दिवशी व एकाच वेळी तू मला व या कवीराजांना तुझ्या घरी जेवावयाला बोलव आणि आम्हा दोघांना जेवायला बोलावल्याचे न सांगता तू त्या धनिकालाही त्याच वेळी जेवायला येण्याचे आमंत्रण कर. माकडे आल्यावर तू फक्त मला व या कवीराजांना जेवायला वाढ. त्या श्रीमतांना वाटू नकोस. पुढे काय करायचं, ते मी पाहून घेईन. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे त्या मित्राने त्या तिघांनाही एकाच दिवशी व एकाच निमंत्रण दिले. बिरबल व कवी थोडेसे लवकर गेले. त्यांच्या मित्राने त्या दोघांना उत्तमपैकी जेवण वाढले. ते दोघे जेवत असतानाच तो श्रीमंत मनुष्यही त्या घरी गेला, पण यजमानाने मुद्दाम त्याला जेवण तर वाढले नाहीच, पण त्याचे साधे स्वागतही केले नाही. बिरबल व कवी यांचे जेवण आटोपले तरी यजमान आपल्याला जेवण वाढण्याची। काहीच हालचाल करीत नाहीसे पाहून तो श्रीमंत माणूस त्याला रागाने म्हणाला. 'तुम्ही मला जेवणाचे निमंत्रण करूनही जेवायला वाढत नाही ही गोष्ट सभ्यतेला धरून आहे काय?' बिरबलाने विचारले, मग या कवीराजांना तुम्ही उद्या माझ्या घरी या, म्हणजे तुम्हाला चांगली बिदागी देतो असे सांगून, ते तुमच्याकडे आले असता तुम्ही त्यांना तसेच परत पाठवलेत, ही गोष्ट तरी सभ्यतेला धरून होती काय?' बिरबलाच्या या प्रश्नाने तो श्रीमंत मनुष्य पुरता शरमला. त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्या कवीची क्षमा मागितली व तिथल्या तिथे त्याला पुरेशी बिदागी दिली. मग यजमानाने त्या श्रीमंताची क्षमा मागून त्याला पोटभर जेवू घातले. 


सुविचार

 • आपल्याला जीवनात सर्वोच्च सामर्थ्य मिळवायचे असेल तर आत्मसन्मान, आत्मज्ञान आणि आत्मनिंयत्रणया तीन गोष्टींची जरुरी असते. 

 

→ दिनविशेष - 

• राजा केळकर संग्रहालय राष्ट्राला अर्पण (१९६२) : राजा केळकर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय हे केवळ पुण्याचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. पुण्याचे एक नागरिक दिनकर गंगाधर केळकर यांच्या छादिष्ट वृत्तीतून, अथक परिश्रमातून आणि भगीरथ प्रयत्नातून ते साकारले आहे. इतिहासाची विलक्षण ओढ, रसिकता, संचयवृत्ती यामुळे त्यांना हा आगळा वेगळा छंद जडला. जुन्या काळचे अडकित्ते, गंजिफा, लामणदिवे, वेगवेगळ्या घाटाची कलाकुसरीची, जुन्या वळणाची भांडी, वस्तू या साऱ्यांचा संग्रह करण्याचा नाद त्यांना जडला. संग्रह करण्यातला, जुन्या दुर्मिळ चीजवस्तू गोळा करण्यातला आनंद त्यांना कळला. या छंदाचे इतरांकडून कौतुक व्हायला लागल्यावर कामाचा झपाटा वाढला. नंदादीप, समया, पणत्या, टांगते दिवे, पानदानाचे डबे, विविध वाद्ये, चित्रे आदि वस्तूंची भर पडत गेली. वस्तुसंग्रहाला घर अपुरे पडू लागले. जिद्द, उत्साह दुणावल्याने केळकरांनी वस्तुसंग्रहालयाचे स्वप्न साकारण्यासाठी इतरांची मदत घ्यायला सुरूवात केली. १९ मार्च १९६२ | पासून राजा दिनकर केळकर या नावाने वस्तुसंग्रहालय लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. व्यवस्थापन केळकरांचे व देखभाल खर्च महाराष्ट्र सरकारचा | अशी व्यवस्था ठरली. १२ एप्रिल १९७५ पासून महाराष्ट्र शासनाकडे मालकी आली.

 

 → मूल्ये - 

 • श्रमनिष्ठा, आदरभाव 

 

→ अन्य घटना

 • अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर कुंभेरीच्या वेढ्यामध्ये निधन पावले - १७५४ 

 • लोकहितवादींच्या शतपत्रांचा प्रारंभ - १८४८

  • मोहंजोदडो व तक्षशिला यांचा शोध लावणारे सर मार्शल जॉन ह्युबर्ट यांचा जन्म - १८७६

   • केरूनाना छत्रे - गणितज्ज्ञ स्मृतिदिन - १८८४ 

   • भारत- बांग्लादेश मैत्री करार - १९७२.

 

 → उपक्रम - 

 • जुनी नाणी, तिकिटे, चित्रे यांचा संग्रह करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणे. 

 • मुलांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडणे.

 

 → समूहगान -

  • चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे. 

 

→ सामान्यज्ञान - 

• पक्षी निरीक्षण करताना सूर्याकडे पाठ असावी. त्यामुळे पक्ष्यांचे सारे चित्रविचित्र रंग स्पष्ट दिसतात. संगीताला जशी बैठक लागते, तशीच पक्षी निरीक्षणालाही बैठक आवश्यक आहे. वाऱ्यावर चालणाऱ्या पवनचक्क्या चांगल्या चालण्यासाठी आणि त्यांच्या | उपयोगासाठी ताशी बारा ते पंधरा किलोमीटर एवढा वाऱ्याचा वेग अपेक्षित असतो.🛑  *संपूर्ण अभ्यास*

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1*

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

*https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1*


📕📗📘📙📕📗📘


*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1*

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1*

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1*

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1*

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1*

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1*

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1*

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1*

*✳️इयत्ता  दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1*

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

*https://youtube.com/@Godavaritambekar?si=c_miXMVuL2CfcMfL*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा