Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

14 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

               14 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना

 ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो... 

 

→ श्लोक 

- शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्य सुखदुःखयोः । दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृदगुणाः ।। मनाची शुद्धता, त्यागी वृत्ती, शौर्य, सुख व दुःख या दोन्ही वेळी सारखेच वागणे, नम्रता, प्रेम व सच्चेपणा हे खऱ्या मित्राच्या ठिकाणी असलेले गुण आहेत.

 

 → चिंतन -

 प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाने जग जिंकावे इतरांना आपलेसे करून घेण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने वागणे, तुम्ही इतरांना प्रेम दिलेत की इतरही तुम्हाला प्रेम देतील. प्रेमाने हृदयापर्यंत पोहोचता येते. त्याच्या सामर्थ्याने सारे जग जिंकता येते. संतांच्या जीवनातून आपल्याला या गोष्टींचा अनुभव येतो.



कथाकथन

 'मकरसंकात' मकरसंक्रात हा पौष महिन्यातील सर्वात मोठा सण आहे. संक्रांतीच्या सणाला धार्मिक, सामाजिक आणि आरोग्य फारच महत्व आहे. मकरसंक्रांतीचे परिणाम सारया जगावर घडतात. अशी संक्रांत होणारा हा पौष महिना अनेक दृष्टींनी विशेष आणि म्हणून त्याला महत्त्वही विशेष आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तावर सूर्याचे किरण लंबरुपाने पडतात असे आपण म्हणतो, पण विषुववृत्ताच्या  साडेतेवीस अक्षांशावरील कर्कवृत्तापासून तो दक्षिणेस साडेतेवीस अक्षांशावरील मकरवृत्तापर्यंत एकंदर सत्तेचाळीस अक्षांशाचा पट्टा कृष्ण करि या पट्ट्यात सूयाची उष्णता क्रमाक्रमाने प्रखर भासत असते. विषुववृत्त प्रदेशात ती जास्त तीव्र असते, एवढेच. आषाढ महिन्यात सूर्य गोलार्धातील कर्कवृत्तावर असतो.तेथून तो दक्षिणेकडे भ्रमण करतो, त्या वेळी दक्षिणायन सुरु झाले असे आपण म्हणतो त्यावेळी आपणाकडे असून रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो. नंतर सहा महिने हळूहळू दक्षिणेकडे सूर्य जातो आणि पौष महिन्यात तो दक्षिण गोलार्धामधील मकरवृत्ताक त्या मकरवृत्तावरुन मकरसंक्रातीला सूर्य पुन्हा उत्तरेकडे सरकू लागतो. त्यावेळी उत्तरायण सुरु झाले असे आपण म्हणतो. यावेळी आपल्याकडे हि असून दिवसापेक्षा रात्र मोठी असते. पौष महिन्यातली ही मकरसंक्रांत म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात असते, मकरसंक्रांतीच्या वेळी आप गोलार्धातील लोकांना हिवाळा चांगलाच जाणवतो. अशा वेळी अंगात उष्णता टिकवून धरणारे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. गुळाची पोळी, लोग खूप, तीळ, बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, गाजरे, वांगी वगैरे पदार्थ भोगीच्या दिवशी आणि संक्रातीच्या सणाला मुद्दाम खातात. अगदी जेवण करून धनुर्मासाची समाप्ती करतात. शरीर पोषणासाठी हा आहार या वेळी फारच उपयुक्त ठरतो. मकरसंक्रातीच्या दिवशी लोक एकमेकाना तिळगुळ देतात आणि प्रेम वाढविण्यास विनंती करतात. तीळ हे स्नेहाचे प्रतीक आणि गूळ हे गोडीचे प्रतीक! झाले गेले सोडून देऊन या दिवसाप नवे प्रेम धरावे आणि जीवन निर्मळ करुन सुखी व्हावे हाच या सर्व देवघेवीचा हेतू असतो. खिया एकमेकींना सुघट देतात, त्या घटात ऊस, गाजरे, बा भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ वगैरे पदार्थ घालून हळदी-कुंकवाचा सार्वजनिक समारंभ मोठ्या निष्ठेने करतात. फळफळावळ, विविध समाजोपयोगी पदार्थाचे आवे लुटून श्रेष्ठ वानदान करतात. संक्रांतीचे हे विशेष समारंभ संस्कृती संवर्धनाला उपयुक्त आहेत.

→ सुविचार

 • प्रेमाला नको जात, नको प्रेमाला धर्म । द्यावे प्रेम घ्यावे प्रेम, प्रेम हाच मानवी धर्म ।। ऊर्मिला ठाकरे

  • तिळासारखी हृदयी शुभता । अंतर्यामी शरीरी शुचिता ।। गुळासारखी मुखी मधुरता । वाणीमध्ये येवो मृदुता ।।

   • प्रेम द्यावे. प्रेम घ्यावे, प्रेमाने जग जिंकावे. 

   • हळदी कुंकु म्हणजे एकमेकींना कुंकु लावणे प्रेम द्या असं सांगणं. मग त्यात कशाला भेद? ही विधवा, नि ही टाकलेली परित्यक्ता, ही प्रौढ कुमारिका, तर ही पती नसलेली. असा भेद होता कामा नये.

    • समाजाने नव्या जाणाऱ्या, एकट्याने जगणाऱ्या महिलांना कमी लेखू नये.

     • कुंकू, मंगळसूत्र, डोक्यातली फुले, प्रसन्न राहणे आपल्या भारतीय जीवन प्रतिके आहेत. ती कोणतीही महिला परिधान करू शकते.

      • डोक्याला कुंकू लावणे ही पुरुषाची मक्तेदारी नाही, तर हा बालपणीच वडिलांनी पाचवी पूजनाच्या दिवशी केलेला संस्कार आहे.

   

 → दिनविशेष 

 • 'भूगोल' दिन आणि मकरसंक्रांत १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या भारतीय स साजरे होणारे सण-उत्सव हे आपण मराठी महिन्यांप्रमाणे (चैत्र, वैशाख इ.) साजरे करतो, परंतु संक्रांत हा सण मात्र असा आहे की, जो महिन्याप्रमाणे १४ जानेवारीला साजरा केला जातो. याला भौगोलिक कारण आहे. २१ डिसेंबरला सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेला २३ ।। असा मकरवृत्तावर असतो. त्या दिवसापासून तो हळूहळू इत्तरेकडे (विषुववृत्ताकडे) सरकायला लागतो. याला उत्तरायण सुरु झाले असे महा भारत उत्तर गोलार्धात असल्यामुळे तिळातिळाने मोठा होणारा हा दिवस आपल्याला १४ जानेवारीपासून जाणवू लागतो. या दिवशी सूर्य मकर प्रवेश करतो. मकर राशीतून सूर्याच्या संक्रमणास सुरुवात होते. म्हणून या दिवशी आपण 'मकर संक्रांत' साजरी करतो. सर्वांना भूगोल या वि आवड निर्माण व्हावी, दैनंदिन जीवनातील भूगोलाचे स्थान समजावे यासाठी चौदा जानेवारी हा 'भूगोल दिन' म्हणूनही साजरा केला जातो.


मूल्ये 

• विज्ञाननिष्ठा, बंधुता 


→ अन्य घटना 

• जिवाजी महाला स्मृतीदिन १६६० 

• सेनापती चिमाजीआप्पा पेशवे यांचे निधन - १७४१ 

• हॅलेच्या धूमकेतु संशोधक, खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले याचा स्मृतिदिन - १७४२ 

 • पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम - १७६१

  • तिसरे पानिपत युद्ध पश - १७६१ 

  • सुप्रसिद्ध स्त्री कलावंत दुर्गाबाई खोटे यांचा जन्म - १९०५ शंकरराव मोहित पाटील जयंती बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामकरण - १९९४. - १९१८ • मराठवाडा विद्यापीठा 

  

→ उपक्रम 

• पानिपतच्या संग्रामाबद्दल कथाकथन करणे 

• भौगोलिक नकाशे, तक्ते यांचे प्रदर्शन आयोजित करणे. → समूहगान 

• देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल.... → 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

सामान्यज्ञान 

• महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने : पेंच (नागपूर) २५७ चौ.कि.मी. क्षेत्र 

• नवेगावबांध (भंडारा) १३४ चौ.कि.मी. 

• ताडोबा (चंद्रपूर) ११७ चौ.कि.मी. क्षेत्र. 

• इजिप्मतधील पिरॅमिड

 • बॅबिलान (इराक) तरंगता बगीचा

 • अलेक्झांड्रिया (इजिम) बंदराबद

 • व्होडस् बेटावरील बेटावरील पुतळा इफेसस (तुर्कस्तानात) 

• हेलिकार्नासस (तुर्कस्तान किनारा)

 •झ्यूस (रोमन जूपिटर) 

• तांबी २४१५, इंची २२ फूट, जाडी - २० फूट)

 • स्टोन हेंज - (इंग्लंड) 

• कलोसियम (रोम) स्फिंक्स (इजिप्त) 

• नानकिग मनोरा 

 • पिसाचा झुकता मनोरा (इटली)

 • अकोरवात (कंबोडिया)

 • ताजमहल (भारत)

•  श्वे डेगॉन पॅगोडा (म्यानमार) 

• भूमिगत कबरस्तान ( हंगिया सोफिया चर्च (तुर्कस्तान)

•  अल्हाम्ब्रा राजवाडा (स्पेन)

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा