Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

11 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

                11 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 प्रार्थना 

ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम

श्लोक 

- कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे। समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ।। वार : कुणालाही विनाकारण त्रास देऊ नये. कुणाचाही विनाकारण तिरस्कार करू नये. सर्वांशी आपल्या भावासारखेच वागावे. जगातील सर्व लोकांवर प्रेम करावे. साने गुरुजी 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 


→ चिंतन

 माणसे जन्माला येतात, पण माणुसकी निर्माण करावी लागते. - वि. स. खांडेकर रणमाला 'माणूस' बनविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सुसंस्कार करावे लागतात. संस्कारांशिवाय माणूस म्हणजे पशूच. खाणीतून निघालेल्य संन्याला शुद्ध करून घ्यावे लागते. हिऱ्यालाही पैलू पाडावे लागतात. ओल्या मातीलाही आकार द्यावा लागतो. त्याप्रमाणे संस्कारक्षम वयात साहित् क्रीडा, नीतिशिक्षण अशा विविध मार्गांनी माणुसकी निर्माण करुन माणसाची 'माणूस' म्हणून जडणघडण करावी लागते.


कथाकथन 

अंतरंग दर्शन

               कथा आहे सुफी संप्रदायातील संत स्त्री राबियाची.एका वेगळ्या प्रवृत्तीची अशा खुप कमी स्रिया झाल्या आहेत या जगात. ती आपल्या पर्णकुटीत राहात असे. प्रातः प्रार्थना करीत असे. तिच्या घरात झोपडीत एक मुसलमान फकीर राहत होता नाव होते  हसन. देवाचा लाडका व मोठा वैराग्यशील साधू, सकाळ झाली होती. अरुणोदयाची गुलाबी झालर पूर्व क्षितिजावर होती देत होते. पक्ष्यांची मधुर किलबिल सुरु झाली होती. मोठी सुंदर - गोड प्रभात होती. हवेत विलक्षण विलोभनीय सुखद गारवा पसरला होता. हसत बाहेर आला. त्याने ते प्रभातकालचे सौंदर्य पाहिले. त्याने राबियाला जोरात हाक मारली, "राबिया! अगीतका परमेश्वराने एक अतिसुंदर प्रभातला जन्म दिला आहे. पक्ष्यांचे मधुर संगीत आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांचा झिरमिरीत जाल पडदा पसरला आहे. बाहेर ये. पहा हे सौंदर्य! आत काय बसून राहिली आहेस?" राबिया खळखळून हसली. आणि म्हणाली, "हसन, अरे असा किती वेळ बाहेर राहणार आहे तूच आत ये. ज्या परमात्माने ही सौंदर्यशाली पहाट घडविली, तो परमात्माच इथं माझ्यापुढे उभा आहे. सकाळ सुंदर आहे ज्याने ती निर्माण केली तो पहा. प्रभातकालीन सूर्यबिंदू तर प्रेक्षणीय आहेतच. त्याचे किरणजालही आकर्षण आहे. पण, ज्याच्या आवरून तो सर्व प्रकाश देतो तो परमात्मा पहा किती सुंदर आहे. तू पक्ष्यांचे संगीत ऐकतो आहेस पण त्यांना मधुर कंठ देणारा परमेश्वर अल्लाह त्याचे गीत मी ऐकत आहे, तोच पक्ष्यांच्या कंठात जाऊन बसला आहे. पण इथे माझ्या समोर उभा ठाकला आहे." माणसाची ही दोन प्रतिके आहेत. एक बाह्य सौंदर्यावर मोहित होती तर दुसरा आंतरिक सौंदर्याचा भोक्ता असतो. चंद्राचे प्रतिबिंब निर्मल जलाशयात पडते ते पाहून एक प्रसन्न होतो. तर दुसरा शरद पौर्णिमा वा वैशाख पौर्णिमेचा प्रत्यक्ष चंद्र पाहून प्रसन्न होती. सुडौल, सडपातळ शरीर, कमलासारखे नेत्र, चाफेकळी नाक, आजानुबाहू, मलमली रेशमासारखे केस, ब शरीर आदि सौंदर्याची बत्तीस लक्षणे असणारा श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर, गौतमबुद्ध यासारखे थोर महात्म्ये त्यांच्या बाह्य व अंतरंग सौंदर्यामुळे जगात प्रसिद्ध होते व आहेत. पण मनुष्य जन्माला आल्यापासून डोळ्यांना दिसू लागल्यापासून बाहेरच पाहत असतो. तो अंतरंगात कधी डोकावतच नाही. सत्य कधी अनुभवतच नाही. जेव्हा ते सत्याचे दर्शन घडते तेव्हा माणूस परमात्म्याचे रुप ओळखतो. सुंदर नाक पण शेबड़ाने लडबडते. कमलनयनाडूही चिखल दिसतो. कानातील मळाने कान ठणकू लागतो. पंचपक्वानांचा फन्ना पाडल्यानंतर पोटातील रासायनिक क्रियांनी त्याचे काय बनते? सुंदर बासमती तांदळातील बिर्याणीत जेव्हा आपल्या प्रियतमेचाच केस सापडतो तेव्हा त्या बिर्याणीची सारी लज्जतच नाहीशी होते ना? बाह्य दर्शन मनोहारी दिसले, कल्पनारम्य वाटले तरी सत्य दर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. तो ब्रह्मानंद देत राहतो. अंगप्रत्यंगातून प्रत्येक क्षणाला एक संवेदना जाणवते. बाह्य दर्शनाचे तुकडे तुकडे होत जातात. आणि त्या सूक्ष्म संवेदनातून अंतरंगाचे सत्य स्वरूप दिसू लागते, मनातील विकार - वासना, राग, लोभ, अहंकार, द्वेष, सूडाची भावना इ. दुर्गुणांचा नाश होऊ लागतो, प्रेम, बंधुता, दया उदारता, मानवता, सत्यता, संयम इ. सद्गुणांचा विकास होऊ लागतो. कल्पना, स्वप्ने, आशा, अपेक्षा, निराशा इ. पूर्णविराम मिळतो. जीवनातील अंतर्दशे दिव्य अनुभूती येऊ लागते. तो रामकृष्ण परमहंस बनतो. 'दिव्याची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' पिकलेल्या फळाप्रमाणे अहंकार गळून पडतो..... तेव्हाच ब्रह्मानंदाची अनुभूती येते.


सुविचार → 

बाह्यरंग सजवून नुसते सुंदर होण्यापेक्षा अंतरंगाला सजवून सुंदर व सात्विक बना.


→ दिनविशेष 

वि स खांडेकर यांचा जन्मदिन:१८८९

              वि स खांडेकर यांनी मराठी साहित्यात कथा,कादंबरी,लघुनिबंध आणि चित्रपट कथा आणि टीकावाङ्मय या सर्वच क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली. त्यांनी सुमारे ११२ पुस्तके लिहिली. त्यांच्या ध्येयवादी मनावर गांधीजी होते. सावंतवाडीपासून पंधरा मैलांवर असलेल्या शिरोडे या गावी ते शिक्षक होते. तेथील सामाजिक परिस्थिती, उपेक्षित खेडूत, त्यां त्यांना अंतर्मुख बनविले. त्यांच्या व्यथांच्या कथाच त्यांनी आपल्या साहित्यात साकारल्या. १८ वर्षे ते शिरोड्याला होते. १९३८ साली चित्र निमित्ताने ते कोल्हापूरला आले. १९३०-१९४२ या तपात त्यांच्या लेखनाला भरती आली होती. त्यांच्या साहित्यात सामाजिक परिवर्तनाची पोटतिडीक आढळते. मानवी जीवनाविषयी वा मानवाविषयी अपार जिव्हाळा हे खांडेकरांच्या जीवनाचे सार होते. म्हा वाङ्मय शांत सौम्य असूनही तेजस्वी आहे. १९४१ साली ते सोलापूरच्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९६८ साली - कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' हा किताब मिळाला आणि त्यांच्या 'ययाति' या कादंबरीला १९७४ साली भारतीय साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या अश्रू, अमृतवेल, उल्का, क्रौंचवध, दोन ध्रुव, ययाति, पांढरे ढग या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 


मूल्ये

 • बंधुता, आदरभाव, निसर्गप्रेम. -

 → अन्य घटना

  • भारताचे माजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन यांचा जन्म - १८५९. 

  • नेल्सन मंडेला व इंदिरा गांधी यांना शांतता पुरस्कार - १९१६. काकासाहेब गाडगीळ यांचे निधन - १९६ • 

   

→ उपक्रम 

खांडेकरांची रूपक कथा सांगावी. • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या अन्य भाषिक साहित्यिकांची माहिती मिळवा. 

→ समूहगान

 • मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा... 

→ सामान्यज्ञान 

• भारतातील ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ या वर्षी सुरू झाला. त्यामध्ये दीड लाख रुपये रोख व प्रशस्ति ज्ञानपीठ मिळविण्याऱ्या मराठी व्यक्ती 

• १९७४ - वि.स. खांडेकर 

• १९८७ - वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*******************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा