Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

५ ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 ५ ऑक्टोबर


प्रार्थना 

- गुरुबह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:...


श्लोक 

- लोभमूलानि पापानि, व्याधयो रसमूलका: । इष्टमूलानि शोकानि, त्रिणि त्यक्त्वा सुखी भव ।। पापे लोभातून वाढतात. रोग जिभेच्या आहारी गेल्याने उत्पन्न होतात. स्वजनांच्या मोहातून शोक निर्माण होतो. तेव्हा या तिन्ही गोष्टी टाळून सुखी हो. 


-  चिंतन 

-  - संन्यासप्रवणतेतून निर्माण झालेली मुक्ती? नको, मी माझ्यासाठी नाही. आनंदाच्या असंख्य पाशांमधून मी स्वातंत्र्याचा, माधुर्याचा आस्वाद घेईन. याच मातीच्या भांड्यात पुन्हा पुन्हा तू तुझी विविध रंगाची व रुचीची मद्ये ओतत राहा. मी माझ्या इंद्रियांची द्वारे बंद करून घेणार नाही. कधीही नाही. रंग,गंध, गीते यांच्या सर्व पार्थिव आनंदाच्या आवर्तनातून परमेशा तुझा सतत वास करणारा आनंद मला सदासर्वदा स्पर्शत राहील. - रंवीद्रनाथ टागोर.


→ कथाकथन

 -करावे तसे भरावे - आपला देश भारत भगवान रामकृष्णाचा देश, वसिष्ठ, वाल्मिकी, व्यास, विश्वमित्र, सांदीपनी वासारखे र आचार्य देशात निर्माण झाले. योगी-तपस्वी जंगलात रहात. फळे, कंदमुळे खात, अन्याचे निर्मळ पाणी पीत विजनवासात, गिरीकंदरात गुहेत राहून करीत. असाच एक योगी एका गुफेत रहात असे. योगी शांत स्वभावाचा होता. लोकांशी मिळूनमिसळून राहत असे. त्याच्या सुख-दुखात सामील होत असे. प्रत्येकाच्या घरी जाऊन ख्यालीखुशाली विचारत असे. क्षेमकुशल विचारत असे. लोक आपापल्या परिस्थितीनुसार वृध्दापूर्वक स्थाला भिक्षा देत असत. कोणी काकडी देई, कोणी कलिंगड देई. कोणी आंबा देई, कोणी फणस देई, मक्याचे कणीस देई. योगी कुणाकडे भिक्षा मागत नसे. आपल्या राजीखुशीने देत असे. जो देईल त्याचे भले होवो, न देई त्याचेही भले होवो । सत्या समवेत सत्य, असत्या समवेत असत्य ।। असे वागा. पण काही ना काही कर्म करीत रहा असा तो नेहमी अपपेश करीत असे. त्या गावात एक म्हातारी रहात होती. ती स्वभावाने अतिशय कंजूष होती. योगी, अतिथी, पाहुणे-रावळे, याचक, भिकारी पाहिले की तिच्या पोटात गोळा उठत असे. कुणी येत असल्याची चाहूल लागली की ती लगेच दार बंद करून बसे. कुणी पाहिलं तर मुलाला सांगे, "जा, आई आजारी आहे म्हणून सांग. " योग्याला तिने कधीच भिक्षा घातली नाही. पण जेव्हा योगी भिक्षेकरता निघे तेव्हा आवर्जून तिच्या घरी जाई, पण कधी भीक मागत नसे. पण तिच्या मुलाचे, तिचे क्षेमकुशल विचारी आणि निघून जाई. निघतानाही तो तसाच उपदेश करी पण म्हातारी त्याच्या नावे खार खाई. एक दिवस त्या योग्याला चांगला धडा शिकविण्याचे तिने मनात योजले व त्श दृष्टीने विचार करू लागली. आणि तो दिवस उजाडला. तिने पाहिले, योगी गावात येत आहे. तिने भाकऱ्या भाजल्या आणि त्यात तीव्र विष घातले व त्या योग्याला देण्यासाठी ठेवून दिल्या. नेहमीप्रमाणे योगी गावात आला. त्या दिवशी तिचा मुलगा घरात नव्हता. पीठ दळून आणण्यासाठी गिरणीत गेला होता. म्हातारीने योग्याला भाकरी दिल्या. योगी म्हणाला, "टाक माझ्या झोळीत. भूक लागली की खाईन" तो आपल्या गुफेत परत आला. गुफेकडे जाण्याच्या वाटेवरच गिरणी होती. संध्याकाळ होताच म्हातारीचा मुलगा आणि सून दळलेल्या पिठाचे ओझे घेऊन घराकडे परतत होती. वाट चढणीची होती. दोघंही घामाघूम झाली होती. दोघांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ते योग्याच्या गुफेत शिरले व त्यांनी योग्याकडे पाणी मागितले. पाणी देताना योगी म्हणाला, "खूप उशीर झालाय. काही खाल्लेही नसेल ना! भूकही सपाटून लागली असेल! काहीतरी खाल्ल्याशिवाय नुसते पाणी पिऊ नका." असे म्हणून त्या मुलाच्या वृध्द आईने दिलेल्या भाकच्या काढल्या आणि त्यांना देत म्हणाला. “खा या भाकरी. तुमच्याच आईने दिल्या आहेत. मी माझ्यासाठी दुसऱ्या तयार करीन." मुलगा आणि सून त्या भाकरी खाऊ लागले काही तुकडे त्यांनी खाल्ले नि लगेच त्यांनी डोळे फिरविण्यास सुरुवात केली. तोंडातून लाळ पाझरू लागली. सारे शरीर काळेनिळे पडले. पाहता पाहता दोघेही आडवे झाले. योग्याने ते पाहिले, तो चक्रावून गेला. "अरे, हे काय झाले ? लोक जमा झाले. ते म्हणाले, "या भाकऱ्यांत विष होते." ते योग्यावर दात-ओठ खाऊन मारायला धावले. योगी म्हणाला, "या भाकल्या तर त्यांच्या वृध्द आईनेच दिल्या होत्या." लोकांनी म्हातारीला विचारले, मी म्हणाली, "योग्याला मारण्यासाठी मी त्या भाकल्या दिल्या होत्या. "लोकांनी तिची ही केली. म्हातारी ओक्साबोक्शी रडू लागली. पण आता काही इलाज नव्हता. लोक म्हणाले, "जो दुसऱ्याचे अहित चितितो त्याला देवयं शिक्षा करतो. " या दिवशी लोकांना समजले, खरेपणाला तोड नाही. सत्याला मरण नाही. नेहमी चांगले बोलावे, चांगले चिंतन करावे, चांगलेपणाने वागावे, जो दुसन्याचे वाईट करायला जातो त्याचे कधी भले होत नाही. करावे तसे भरावे हा ईश्वरा घरचा न्याय आहे.


सुविचार

 • दुष्ट लोक पूर्वी संपादन केलेला स्नेह स्वतःच नाहीसा करतात

 . • पाप कधी ना कधी उघडकीस येते.

 • कुविचारांनी मनाची शांती, सुख आणि जीवनातले यश नष्ट होतात

 . • दुष्ट लोक नेहमी दुसऱ्याचा मर्मावर घाव घालतात. 

 • अपवित्र, अशुध्द मनाने विचार व आचार करणाऱ्या माणसाला करावे तसे भरावे लागते. 

 • चारित्र्यात सूर्याची तेजस्विता व अंतःकरणात चंद्राची शीतलता असावी. 

 • • अविचाराने कोणतेही काम करू नये, कारण ते अनेक आपत्तींना जन्म देते. 


दिनविशेष -

 • आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग - १८७८ : दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगलीचे विष्णु मरिश्वर छत्रे यांनी स्वतः स्थापन केलेल्या भारतातीलच काय पण आशियातील पहिल्या सर्कशीचा पहिला जाहीर प्रयोग मुंबईला करून दाखविला. छत्रे यांचा जन्म सांगली जिल्हयातील तासगाव जवळच्या अंकलखोप या गावी १८४० मध्ये झाला. संस्थानिकांच्या पदरी असल्याने त्यांना घोडे हाताळण्याचे लहानपणापासून कसब होते. जर्मन सर्कशीचे मुंबई येथे प्रयोग पाहताना त्या सर्कसचे मालक. प्रो. हर्मिस्टन यांना 'भारतीयांना सर्कशीचे अवघड काम अशक्य असे डिवचल्याने छत्र्यांनी तेथल्या तेथे आव्हान स्वीकारून एक वर्षाच्या आत आपली स्वतः 'छत्रे ग्रँड सर्कस' स्थापन केली. हळूहळू तिला भव्य स्वरूप येऊन पूर्वेकडील सर्व देशांमध्ये सर्कशीचा दौरा केला. छत्रे यांच्या या आद्य सर्कशीपासून स्फूर्ती घेऊन पुढे अनेकांनी यशस्वी सर्कशी काढल्या.'

  

 → मूल्ये - 

 • श्रमनिष्ठा, जिद्द, साहस 

 

→ अन्य घटना - 

• सर्वोच्च न्यायायाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून श्रीमती मीरासाहेब फातिमा यांची नियुक्ति १९८१ 

• औद्योगिक सुरक्षा दिन. 


→ उपक्रम 

• आतापर्यंत झालेल्या भारतीय सर्कशींची माहिती मिळवा. 


• समूहगान 

• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.


 → सामान्यज्ञान

  • आवाजाच्या लहरी पसरविण्यास हवेसारख्या माध्यमाची गरज असते. या प्रकारचे माध्यम चंद्रावर नसल्याने तेथे ध्वनी ऐकू येत नाही.

   • ध्वनी हवेत एका सेकंदाला ३३० मीटर (ताशी ७४० मैल) वेगाने प्रवास करतो. पाण्यात आणि घनपदार्थात ध्वनीचा वेग हवेतील वेगापेक्षा जास्त असतो.

    • भात हे पूर्वापार खाद्य अन्नापैकी एक असून ते जगातील निम्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. अंटार्क्टिका खंड वगळता सर्व खंडांत त्याची लागवड होते. भारतातील जवळजवळ ७५ टक्के लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा