Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

19 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 19 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ


 → प्रार्थना

  - तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.

श्लोक 

- सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥ सर्वांना सुख लाभावे, तशीच आरोग्यसंपदा । व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये ।। 


 चिंतन -

  प्रेम म्हणजे फक्त शरीरावर केलेले कामुक प्रेम नव्हे. प्रेमाची कसोटी त्याग होय. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण आवश्यकता असेल् वार: व्हा आपली धनदौलत, सत्तापद, सुखी जीवन, आपले प्राण देण्याची तयारी, त्यांचा त्याग करण्याची कृती केली पाहिजे. राष्ट्रप्रेमापोटी हजारो भक्तानी प्राण अर्पण केले आहेत. असं प्रेम करावं. ते जगाला द्यांवें तोच खरा धर्म । खरा तो एकचिधर्म जगाला प्रेम अपवि साने गुरुजी.


→ कथाकथन

 प्रेमाची • पतीपत्नी प्रेम - कैकयीच्या हट्टापायी श्रीरामचंद्राना १४ वर्षे वनवासात जाण्याची आज्ञा राजा दशरथाला द्यावी लागली. श्रीरामांनी ती आज्ञा पाळण्याचं ठरवलं. पण रामपत्नी सीता म्हणाली, "स्वामी, मीही तुमच्याबरोबर वनवासात येणार आहे. "श्रीरामांनी सांगितलं "सीते, वनवासाची आज्ञा मला झाली आहे, तुला नव्हे, तुझ्यासारख्या राजकन्येला वनवासाचं दुःख सोसवणार नाही. तू मुळीच येऊ नकोस माझ्याबरोबर बनात" सीता - नाथ, तुम्ही जेथे असाल तेथे तुमची साथ मला करायलाच हवी. ते माझं कर्तव्य आहे. ते माझ्या पतिप्रेमाचं मोल आहे. मी येणारच तुमच्याबरोबर. श्रीरामचंद्राना सीतेला वनवासात स्वतःबरोबर न्यावंच लागलं. • बंधु प्रेम - वरील प्रसंगात लक्ष्मणही श्रीरामाबरोबर वनवासात गेला. बंधु प्रेमाखातर श्रीराम व सीता यांच्या रक्षणासाठी तो वनवासात गेला. खरा १४वर्षे वनवास तर लक्ष्मणापासून दूर राहून ऊर्मिलेने भोगला. ऊर्मिलनेही पतीच्या बंधुप्रेमाखातर पत्तीप्रेमाचा त्याग केला. • मातृपितृ प्रेम - श्रावण बाळाची आणि भक्त पुंडलिकाची कथा आपणास माहित आहे. श्रावण बाळाने आपल्या वृध्द आई - वडिलांना तीर्थयात्रेला नेण्यासाठी त्यांना कावडीत बसवून ती कावड आपल्या खांद्यावर वाहत नेऊन त्यांची तीर्थयात्रेची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल. आणि मध्येच राजा दशरथाच्या बाणाने मृत्यूही त्याने पत्करला. भक्त पुंडलिकाने त्याच्या मातृपितृभक्तीवर प्रसन्न होऊन विठोबा प्रत्यक्ष भेटीला आल्यावरही आपली मातृपितृसेवा थांबवून विठ्ठलाच्या पायाशी लोळण नाही घेतली. सेवा पूर्ण होईपर्यंत विठ्ठलाला जवळची वीट भिरकावून देत त्याची वाट पाहण्यास विटेवर उभे राहण्याची विनंती केली. प्रत्यक्ष देवभेटीचाही त्याने त्याग केला. • स्वामीभक्ती - शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैद ठेवले होते. तेथून निसटून जाण्याचा शिवाजी राजांनी उपाय शोधून काढला. आपल्या ऐवजी आपल्या अंथरूणावर आपल्या सारखाच चेहरा असलेल्या हिरोजी फर्जदला निजायला सांगितलं. त्या स्वामीभक्त हिरोजीने ते करून त्याने औरंगजेबांच्या तावडीत सापडण्याचा धोका पत्करला व शिवाजीराजांना मिठाईच्या पेटाच्यातून पळून जाण्याची संधी दिली. त्या हिरोजीने स्वामींच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढविली हे ही स्वामीभक्ती साठी उदाहरण देता येईल. मित्रप्रेम गरीब सुदामा हा सोन्याच्या द्वारकाधीशाचा श्रीकृष्णाचा मित्र होता. त्याने श्रीकृष्णाच्या भेटीला काय आणलं होत बरोबर ? (मुले म्हणतात- पोहे,) गुरुजी- थोडसे पोहे ! ते श्रीकृष्णांनी मिटक्या मारीत खाल्ले कारण त्यात सुदाम्याच्या प्रेमाचं अमृत होतं; आणि सुदाम्याला कोणती भेट दिली ? (मुलं म्हणतात, त्याला उत्तम घर, तेही सर्वसुखसोईचं, धनधान्य संपत्तीयुक्त असं त्याला न कळत त्याच्या गावी उभारून दिलं.) गुरुजी म्हणतात अगदी बरोबर ! सुदाम्याने काहीही न मागता ते दिलं. सुदाम्याने त्याच्या कुवतीच्या - बळावर पोह्यांचा त्याग केला तर श्रीकृष्णाने आपल्या संपत्तीचा त्याग करून त्याल सुख संपदायुक्त घराची बक्षिसी दिली. "मुलांनो आता सांगा खऱ्या प्रेमाची कसाठी कोणती ? खऱ्या सोन्याची कसोटी कसोटीच्या दगडावर घासून पाहिली जाते. प्रेमाची कसोटी पाहण्याचा (कसोटीचा) दगड कोणता? मुले निरनिराळी उत्तरे देतात संकटकाळी मदत करणे, 'प्रियजनांच्या रक्षणासाठी धावून जाणे.' 'प्रेमासाठी जीवावर उदार होऊन त्याला साथ देणे. ' गुरुजी - तुमची उत्तरे बरोबरच आहेत. पण प्रेमाची कसोटी मोजक्या शब्दात कवि भा. रा. तांबे सांगतात - "प्रेम कोणीही करी ना का अशी फिर्याद खोटी ?" प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी ।।" प्रेमाची खरी कसोटी म्हणजे त्याग. सीतेने रामासाठी, राजवैभवाचा त्याग केला. लक्ष्मण व भरतानेही असाच राजमुख उपभोगण्याचा त्याग करून श्रीरामांचं रक्षण करून व त्याला पुनः राजपदावर बसवण्याचं कार्य या बंधूनी केलं. श्रावण बाळाने आईबापांची सेवा करता करता प्राणत्याग केला. तर पुंडलिकाने प्रत्यक्ष ईश्वर भेटीचाही त्याग केला. हिरोजी फर्जंदाने आपल्या प्राणांचा त्याग केला तर श्रीकृष्णाने आपल्या संपत्तीचा त्याग करून सुदाम्याला सालंकृत गृहदान दिलं.


→ सुविचार 

• प्रेमाला नको जात, प्रेमाला नको धर्म । प्रेम दयावे प्रेम घ्यावे, हाच मानवी धर्म ।। • तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. • जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने सर्वांचा दास व्हावे. • त्यागातच खरे शौर्य आह. • माणसांनी माणसावर प्रेम करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. म. गांधी.


 → दिनविशेष 

 • चंद्रशेखर सुब्रम्हण्यम् जन्मदिन १९१० : अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय खगोल, भौतिकी विद्वान, तारकीय उत्क्रांती, अतिदीप्त नवताऱ्यांची उत्पत्ती व ताऱ्याचे रासायनिक संघटन याविषयी त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे. मद्रासच्या रेसिडन्सी महाविद्यालयातून ते १९३० साली बी.ए. झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले व १९३३ साली त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली. १९५२ साली अॅस्ट्रोफिजिकल जर्मनचे ते कार्यकारी संपादक झाले. १९५३ साली अमेरिकेचे नागरिकत्व व १९५५ साली नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सभासदत्व त्यांना मिळाले. २१ ऑगस्ट १९९५ ला त्यांचे आयुष्य समाप्त झाले. त्यांच्या डाईंगस्टार या १९३५ सालच्या संशोधनाबद्दल शास्त्रज्ञांत अनेक मतभेद होते; परंतु चंद्रशेखरांचा सिध्दांत शास्त्रज्ञांना मान्य करावा लागला. १९८३ साली या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. 


→ मूल्ये -

 • विज्ञाननिष्ठा, दृढनिश्चय


 → अन्य घटना -

  • इंग्लिश पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ अर्नेस्ट रूदरफोर्ड यांचा स्मृतिदिन - १९७३.

   • पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्मदिन - १९२०


 → उपक्रम

  • खगोलशास्त्रातील शोध व संशोधक या विषयाची कात्रणे जमा करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करता येईल. ऊर्जासमस्या, अणुऊर्जेचा वापर, त्यातील धोके, अणुअस्त्राचा धोका यावर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करता येईल.. 

→ समूहगान 

• चला जाऊ या दर्शन करू या अपुल्या भारतमातेचे.

 → सामान्यज्ञान

  मुंग्याची वारुळे स्वतंत्र असतात. प्रत्येक वारूळातले रस्ते वेगवेगळे असतात. त्या त्या वारूळाचा स्वतंत्र वास असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा