Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

मराठी व्याकरण क्रियापद

         मराठी व्याकरण ६. क्रियापद-  सराव प्रश्न०१) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात.

अ) विशेषण

ब) क्रियापद

क) सर्वनाम

ड) नाम

उत्तर- ब) क्रियापद


०२) क्रियापदाचे एकूण मुख्य प्रकार किती ?

अ) दोन

ब) चार

क) तीन

ड) पाच

उत्तर-अ) दोन


०३) ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरत असते त्यास म्हणतात.

अ) अकर्मक क्रियापद

ब) द्विकर्मक क्रियापद

क) सकर्मक क्रियापद

ड) संयुक्त क्रियापद

उत्तर-क) सकर्मक क्रियापद


०४) रामराव नातवाला कविता शिकवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा

अ) अकर्तृक क्रियापद

ब) उभयविध क्रियापद

क) द्विकर्मक क्रियापद

उत्तर-क) सकर्मक क्रियापद


०५) राधाचे नविन खेळणे मोडले.

अ) सकर्मक क्रियापद

ब) अकर्मक क्रियापद

क) द्विकर्मक क्रियापद

ड) संयुक्त क्रियापद

उत्तर-ब) अकर्मक क्रियापद


०६) अंजलीने रामायण वाचले.

अ) सकर्मक क्रियापद

ब) अकर्मक क्रियापद

क) उभयविध क्रियापद

ड) यापैकी नाही.

उत्तर-अ) सकर्मक क्रियापद


०७) माईनी वैष्णवीकडून स्तोत्र पाठ करविले.

अ) सकर्मक

ब) अकर्मक क्रियापद

क) प्रयोजक क्रियापद

क) शक्य क्रियापद

उत्तर-क) प्रयोजक क्रियापद


०८) तुम्हाला ऐवढे जलद गतीने चालवते तरी कसे?

अ) संयुक्त क्रियापद

ब) प्रयोजक क्रियापद

क)शक्य क्रियापद

ड) अशक्य क्रियापद

उत्तर-क) शक्य क्रियापद


०९) आम्हाला अंधांसाठी मदत पाहिजे.

अ) शक्य क्रियापद

ब) अनियमित क्रियापद

क) द्विकर्मीक क्रियापद

ड) शक्य क्रियापद

उत्तर-ब) अनियमित क्रियापद


१०) रामूने सोसायटीचे कर्ज फेडून टाकले.

अ) अर्थपूर्ण सहायक क्रियापद

ब) शक्य क्रियापद 

क) अनयिमित क्रियापद

ड) साधीत क्रियापद

उत्तर-अ) अर्थपूर्ण सहायक क्रियापद


११) मी गावाला जात आहे.

अ) सकर्मक क्रियापद 

ब) शक्य क्रियापद 

क) संयुक्त क्रियापद 

ड)प्रयोजक क्रियापद

उत्तर-क) संयुक्त क्रियापद 


१२) भिमाने औत चोरले.

अ) सकर्मक क्रियापद

ब) प्रयोजक क्रियापद

क) सहाय्यक क्रियापद

ड) अकर्मक

उत्तर-अ) सकर्मक क्रियापद


१३) खालील पैकी सकर्मक क्रियापदांचे वाक्य कोणते नाही?

अ) मला पेरु आवडतो

ब) राधा पळापळी खेळली

क) त्याने पेन मोडला

ड) मला तिप्पट नफा मिळाला

उत्तर-ड) मला तिप्पट नफा मिळाला


१४) खालील पैकी संयुक्त क्रियापदाचे वाक्य कोणते?

अ) सुरेंद्र समुद्र पोहू शकतो

ब) केंद्र सरकार सीमा प्रश्न हाताळत आहे.

क) राणीला आता चालवते.

ड) राधाकाकूंनी सर्व स्वयंपाक करून टाकला.

उत्तर-ड) राधाकाकूंनी सर्व स्वयंपाक करून टाकला.


१५) खालील पैकी शक्य क्रियापदाचे वाक्य कोणते ?

अ) दुधवाला हल्ली उशीरा येऊ लागला.

ब) विदुषक प्रेक्षकांना हसवितो.

क) माझ्याकडून यापुढं बोलवत नाही.

ड) साहेबांनी फाईली मागविल्या.

उत्तर-क) माझ्याकडून यापुढं बोलवत नाही.


१६) खालील पैकी सहाय्यक क्रियापद नसलेले उदाहरण कोणते ?

अ) मारुन टाक

ब) घेऊन टाक

क) उठून जा

ड) बसू नक

उत्तर-क) उठून जा


१७) धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते.

अ) संयुक्त क्रियापद

ब) सकर्मक क्रियापद

क) अकर्मक क्रियापद

ड) सहाय्यक क्रियापद

उत्तर-अ) संयुक्त क्रियापद


१८) 'झोपला' या शब्दाची खालील पर्यायातून जात शोधा. (जाने-९६)

१) सर्वनाम

२) क्रियापद

३) क्रियाविशेषण 

४) विशेषण

उत्तर-२) क्रियापद


१९) 'वाघाला पाहून हरिण सैरावैरा पळत होते.' क्रियापद ओळखा.

१) सकर्मक क्रियापद 

२) द्विकर्मक

३) संयुक्त क्रियापद 

४) अनियमित क्रियापद

उत्तर-३) संयुक्त क्रियापद 


२०) पुढीलपैकी अनियमित क्रियापद ओळखा

१) असतो

२) खेळत आहे

३) नको

४) बसा

उत्तर-३) नको


२१) संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ? (जाने.-९६)

१) मी ग्रंथ वाचतो

२) रामा खोटे बोलतो

३) ती हसली, मी फसली

४) मी गावाला जात आहे.

उत्तर-४) मी गावाला जात आहे.


२२) आई सरोवराच्या काठी बसत आहे. क्रियापद ओळखा.

१ ) सकर्मक क्रियापद 

२) द्विकर्मक

३) संयुक्त क्रियापद 

४) अनियमित क्रियापद

उत्तर-३) संयुक्त क्रियापद 


२३) 'मधूने शंकरावर अभिषेक केला' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा? (फेब्रु-९७) 

१) सकर्मक

२) अकर्मक

३) द्विकर्मक

४) उभयविध

उत्तर-३) द्विकर्मक


२४) पुढीलपैकी उभयविध क्रियापद ओळखा.

१) त्याने नवीन खेळणे मोडले.

२) तो सफरचंद कापतो.

३) ती लिहिते.

४) मला पाहवत नाही.

उत्तर-१) त्याने नवीन खेळणे मोडले.


२५) 'सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला' या वाक्यातील कर्ता सांगा. (फेब्रु-९७)

१) सुधा

२) विमल

३) परकर

४) काळा

उत्तर-२) विमल


२६) धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? (फेब्रु-९७)

१) सहायक क्रियापद 

२) साधित क्रियापद 

३) संयुक्त क्रियापद 

४) सकर्मक क्रियापद

उत्तर-३) संयुक्त क्रियापद 


२७) मी रामाला भेटवस्तू आणली. यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा.

१) राम

२) मी

३) आणली

४) भेटवस्तू

उत्तर-४) भेटवस्तू


२८) 'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? (डिसें. - ९८)

१) प्रायोगिक

२) प्रयोजक

३) संयुक्त

४) सहायक

उत्तर-२) प्रयोजक


२९) 'नाचत नाचत मोर आला' या वाक्यातील क्रियापद कोणत्या धातूपासून बनले आहे.

१) जा

२) ये

३) आला

४) येतो.

उत्तर-२) ये


३०) 'लिहित आहे' हा क्रियापदाचा कोणता प्रकार सांगता येईल. (डिसें.-९८)

१) सकर्मक क्रियापद 

२) क्रियावाचक 

३) संयुक्त क्रियापद 

४) वर्तमानकाळी क्रियापद

उत्तर-३) संयुक्त क्रियापद 


३१) 'गात राहील' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

१) संयुक्त क्रियापद 

२) सकर्मक

३) अकर्मक

४) द्विकर्मक

उत्तर-१) संयुक्त क्रियापद 


३२) 'त्याच्यासारखा विद्वान तो' या वाक्यातील योग्य असलेले क्रियापद कोणते ? (डिसें.-९८) 

१) असतो

२) असेल

३) होय

४) असावा

उत्तर-३) होय


३३) ताजमहालसारखा अद्वितीय तोच या वाक्यात लपलेले क्रियापद शोधा.

१) होय

२) असतो

३) असे

४) आहे

उत्तर-४) आहे


३४) सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात

येते ?

१) संयुक्त क्रियापद

२) प्रयोजक क्रियापद

३) भावकर्तृक क्रियापद

४) अनियमित क्रियापद

उत्तर-४) अनियमित क्रियापद


३५) पुढीलपैकी उभयविध क्रियापद ओळखा

१) झोपले

२) उघडले

३) उघडत आहे

४) झोपत असे

उत्तर-२) उघडले


३६) खालील वाक्यातील कर्म ओळखा. (डिसें. - ०४)

'शेजारच्या विद्याकाकूंच्या मुलाने मला पुस्तक दिले. '

१) मला

२) मुलाने

३) पुस्तक

४) विद्याकाकू

उत्तर-३) पुस्तक


३७) 'या घटनेने हळहळते' या वाक्यातील क्रियापद प्रकार सांगा.

१) अनियमित क्रियापद 

२) सकर्मक

३) भावकर्तृक

४) संयुक्त क्रियापद

उत्तर-३) भावकर्तृक


३८) 'लेखकासाठी निर्मितीचा आनंदच मोठा असतो.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

१) निर्मिती

२) लेखक

३) मोठा

४) आनंद

उत्तर-४) आनंद


३९) 'पटकथा लेखकाला त्याची कथा अपत्यासारखी असते.' कर्ता ओळखा.

१) कथा

२) लेखक

३) अपत्य

४) पटकथा लेखक

उत्तर-१) कथा


४०) 'दररोज सकाळी फिरून फिरून तो शेवटी आपल्याच जागेवर येतो.' क्रियापद ओळखा. 

१) सकर्मक

२) अकर्मक

३) संयुक्त

४) द्विकर्मक

उत्तर-२) अकर्मक


४१) 'गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा.

१) विशेषण

२) शब्दयोगी

३) उभयान्वयी अव्यय 

४) क्रियापद

उत्तर-४) क्रियापद


४२) 'सर्व पक्षी जलक्रिडा करु लागले' यातील करु लागले क्रियापदाचा प्रकार सांगा.

१) उभयविध

२) धातूसाधित 

३) शक्य

४) संयुक्त

उत्तर-४) संयुक्त


४३) खालील शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा. (ऑगस्ट-१०)

१) तू

२) एकाच

३) भज

४) कोणत्यातरी

उत्तर-३) भज


४४) धातूला ता, ला, ईल, असे प्रत्यय लावल्याने काय तयार होते?

१) कृदन्ते

२) क्रियापदे

३) अपूर्णकाळ

४) विशेषण

उत्तर-२) क्रियापदे


४५) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ? (ऑगस्ट - १०)

१) पुस्तक

२) सुंदर

३) पोसणे

४) लवकर

उत्तर-३) पोसणे


४६) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद असेल.

१) काढतो

२) धार

३) गवळी

४) दूध

उत्तर-१) काढतो


४७) वाक्यातील क्रियापदाला ओळखा? 'वैभव पुस्तक वाचत आहे'. (ऑक्टो.-१०)

१) अकर्तृक क्रियापद 

२) संयुक्त क्रियापद 

३) अकर्मक क्रियापद 

४) सकर्मक क्रियापद

उत्तर-२) संयुक्त क्रियापद 


४८) 'महाराष्ट्र सरकारने दुष्काळ प्रश्न व्यवस्थित हाताळावा.'

१) अनियमित क्रियापद 

२) संयुक्त क्रियापद 

३) उभयविध क्रियापद 

४) साधित क्रियापद

उत्तर-२) संयुक्त क्रियापद 


४९) क्रियापद म्हणजे काय? (ऑक्टो.- १०)

१) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द

२) क्रिया करणारा

३) क्रिया वस्तूवर घडते

४) ज्याच्यात कर्म असते.

उत्तर-१) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द


५०) 'छान छान कपडे घालून बागडत बागडत लहान मुले वरातीत सामील झाली. कर्ता ओळखा. '

१) छान छान कपडे

२) लहान मुले

३) वरांत

४) बागडणे

उत्तर-२) लहान मुले


५१) 'अवती भोवती शोध घेऊन तो लवकर परतला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

१) शोध

२) लवकर

३) तो

४) परतला

उत्तर-३) तो


५२) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. (सप्टेंबर- ११)

१) पेरणे

२) उपरणे

३) वेचणे

४) उपणने

उत्तर-२) उपरणे


५३) खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही.

१) शांत

२) खणणे

३) भाजणे

४) शांतता राखा

उत्तर-१) शांत


५४) 'श्रीशांत क्रिकेट खेळतो' क्रियापद प्रकार ओळखा. (सप्टें-११)

१) सकर्मक

२) अकर्मक

३) साधिक

४) संयुक्त

उत्तर-१) सकर्मक


५५) पुढीलपैकी धातूसाधित ओळखा.

१) खणतो

२) खणतांना

३) खणले

४) खणतील

उत्तर-२) खणतांना


५६) खालील शब्दरुपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारची आहेत ? बोलतांना, लिहीतांना

१) कृदन्ते

२) नाम

३) विशेषण

४) वचन

उत्तर-१) कृदन्ते


५७) 'शाब्बास! तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळविली.' या वाक्यातील कम‍

ओळखा. (नोव्हे-११)

१) शाब्बास

२) सामना व ढाल 

३) संघाने

४) अंतिम सामना

उत्तर-२) सामना व ढाल 


५८) थरथर, चूरचूर, खळखळ, सळसळ, ओरड- हे शब्द कोणते धतू आहे? (डिसें-११)

१) कृतिवाचक धातू

२) अकर्मक धातू

३) उभयविध क्रियापदे

४) सकर्मक क्रियापद

उत्तर-१) अत्र्यांनी श्रोत्यांना खो खो हसविले


५९) खालीलपैकी 'अनियमित' क्रियापदाचे वाक्य कोणते ?

१) अत्र्यांनी श्रोत्यांना खो खो हसविले

२) राम आंबा खातो

३) देवळाचे दार उघडले

४) कोणाचेही वाईट करू नये

उत्तर-४) कोणाचेही वाईट करू नये


६०) खालीलपैकी 'अर्कृतक' क्रियापदाचे वाक्य कोणते ?

१) आज लवकर उजाडले

३) तात्यांनी मामाला पैसे दिले

२) बाळाने आपली कार मोडली

४) शिरीष उद्या पुण्याला जाईल

उत्तर-१) आज लवकर उजाडले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा