Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी 6 प्राण्यांचे वर्गीकरण

 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी

6 प्राण्यांचे वर्गीकरण


योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

■रंध्रीय प्राण्यांच्या (स्पॉजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?

 (a) कॉलर पेशी

(c) अंतःस्तर पेशी

(b) निडोब्लास्ट

(d) बाह्यस्तर पेशी

उत्तर-कॉलर पेशी

स्पष्टीकरण- रंध्रीय प्राणी आधात्रीशी संलग्न असतात आणि त्यांच्यात प्रचलन होत नाही. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना पाणी प्रवाहित करावे लागते. त्यासाठी त्यांच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशींचा वापर केला जातो. निडोब्लास्ट या निडारिया संघाचे वैशिष्ट्य आहे. अंतःस्तर पेशी व बाह्यस्तर पेशी या सर्वच प्राण्यांत असतात.

--------------------------------

(2) पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते ?

 (a) तारामासा (b) जेलीफिश (c) गांडूळ (d) स्पाँज

उत्तर-गांडूळ

स्पष्टीकरण : द्विसममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की, फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. अशी सममिती केवळ गांडूळच दाखवतो.. तारामासा आणि जेलीफिश हे अरिय सममिती दाखवतात. स्पॉजचे शरीर असममित असते.

--------------------------------

(3) पुढीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो ?

(a) झुरळ (b) बेडूक (c) चिमणी (d) तारामासा

उत्तर-तारामासा

स्पष्टीकरण : झुरळ, बेडूक व चिमणी हे तिन्ही प्राणी पुनर्निर्मिती, म्हणजेच पुनर्जनन करू शकत नाहीत. केवळ कंटकचर्मी संघात पुनर्निर्मिती (पुनर्जनन) क्षमता खूप चांगली असते. त्यामुळे तुटलेल्या भागाचे पुनर्जनन केवळ तारामासा हा कंटकचर्मी प्राणी करू शकतो.

--------------------------------

 (4) वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?

(a) उभयचर

(b) सरीसृप

(c) पक्षी (d) सस्तन

उत्तर-सस्तन

स्पष्टीकरण : वटवाघळाचा समावेश सस्तन वर्गात केला जातो: कारण त्यांना दुग्धग्रंथी असतात. त्याचप्रमाणे ते पिल्लांना जन्म देतात. उभयचर, सरीसृप आणि पक्षी या तिन्ही वर्गांत ही वैशिष्ट्ये दिसत नाहीत.

--------------------------------

■मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे ?

उत्तर :- सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणीसंघातील प्राणी.

--------------------------------

ओळखा पाहू मी कोण?

■ (2) माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय?

 उत्तर : तारामासा. कंटकचर्मी प्राणी.

--------------------------------

■(3) मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल ?

उत्तर : जंत. गोल कृमी.

--------------------------------

■ (4) मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा.

उत्तर : स्पाँज, रंध्रीय.

--------------------------------

■(5) मला चूषक आहेत. मी रक्त पिणारी बाह्यपरजीवी आहे. माझे शरीर खंडीभूत आहे. मी कोण ? माझा संघ कोणता ?

उत्तर : जळू. संघ वलयी.

--------------------------------

■(6) माझ्याभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. मला चार जोड्या पाय आहेत. मी डंख मारतो. कोण मी? माझा संघ कोणता ?

उत्तर : विंचू. संघ संधिपाद.

--------------------------------

एका वाक्यात उत्तरे लिहा

■वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कशावर आधारित होती ?

उत्तर : वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे गुणसूत्र, जैवरासायनिक  शरीररचनेविषयीचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणधर्म अशा मुद्द्यांवर आधारित होती. 

--------------------------------

■ रॉबर्ट व्हिटाकरच्या वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण करताना कोणत्या मुद्द्यांचा आधार घेतला आहे?

उत्तर : शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन यांसारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतला आहे.

--------------------------------

■समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या शरीरातील तार कसा असतो ? उत्तर: समपृष्ठरज्जू प्राम्यांच्या शरीरातील चेतारज्यू एकप पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो.

--------------------------------

■अरिय सममिती म्हणजे काय? 

उत्तर : शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास ज्या वेळी दोन समान भाग पडतात त्याला अरिय सममिती असे म्हणतात.

--------------------------------

■ रंध्रीय प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीरातील कॅटिका कशापासून बनलेल्या असतात ? 

उत्तर: रंध्रीय प्राणीसंपातील प्राण्यांच्या शरीरातील कॅटिका कॅल्शिअम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात.

--------------------------------

■  निडारिया प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीरातील दोन निरनिराळे आकार कोणते ? त्यांना काय म्हणतात?

 उत्तर: निहारिया प्राण्यांचे शरीर दंडाकृती असेल तर त्यांना बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्याला छत्रिक असे म्हणतात.

--------------------------------

■ रंध्रीय प्राण्याच्या शरीरातील ऑस्टिया आणि ऑस्क्युला यांचे कार्य कोणते ?

उत्तर: ऑस्टिया या छिद्राद्वारे पाणी रंध्रीय प्रायाच्या शरीरात घेतले जाते आणि ऑक्युला या छिद्रावाटे ते बाहेर सोडले जाते.

--------------------------------

■ प्रवाळ खडक म्हणजे काय असते ?

उत्तर: समुद्रामध्ये असणारे प्रवाळ खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते.

--------------------------------

■प्रवाळाचा काय उपयोग केला जातो?

उत्तर प्रवाळापासून 'पोवळे' हे रत्न आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ भस्म तयार केले जाते. 

--------------------------------

■ मृदुकाय प्राण्यांचे शरीर किती भागांत विभागलेले असते ?

उत्तर: डोके, पाय आणि अंतरंग संहती अशा तीन भागांत मृदुकाय प्राण्यांचे शरीर विभागलेले असते.

--------------------------------

■ मृदुकाय प्राण्यांचे संरक्षक कवच कशापासून बनते आणि कोणती ऊती ते बनवते ?

उत्तर : मृदुकाय प्राण्यांचे संरक्षक कवच कॅल्शिअम कार्बोनेट- पासून बनते आणि 'अंतरांग संहती प्रावार' या पटली-संरचनेच्या ऊतीने ते बनवले जाते.

--------------------------------

■अर्थसमपृष्ठर प्राण्यांच्या शरीराचे तीन प्रमुख भाग कोणते ?

उत्तर: गुंड गळपट्टी आणि प्रकांड हे अर्धष्ठा प्राण्यांच्या शरीराचे तीन प्रमुख भाग आहेत.

--------------------------------

■समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा

उत्तर : समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये :

(1) शरीरामध्ये पृष्ठ बाजूला पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो.

(2) कल्लाविदरे किंवा फुप्फुसांच्या साहाय्याने श्वसन होते. 

(3) एकच पोकळ चेतारज्जू शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो.

(4) शरीराच्या अधर बाजूस हृदय असते. 

--------------------------------

■(8) पृष्ठवंशीय प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : पृष्ठवंशीय प्राण्यांची वैशिष्ट्ये : (1) पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होतो आणि त्या

ठिकाणी कशेरुस्तंभ किंवा पाठीचा कणा तयार होतो.

(2) शिराचा पूर्ण विकास झालेला असतो.

(3) मेंदू विकसित असतो आणि तो कवटीत संरक्षित असतो.

(4) अंतः कंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते. (5) काही पृष्ठवंशीय प्राण्यांना जवडे नसतात; तर काहींना जबडे असतात.

--------------------------------

■(9) पुढे प्राणीसंघातील प्राण्यांचे गुणधर्म दिले आहेत, ते अभ्यासा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

(सराव कृतिपत्रिका -1)

(अ) या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात.

(ब) हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.

(क) हे प्राणी नालिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात. 

(ड) ह्यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे

--------------------------------

■माझ्यात दूध स्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. बाह्यकंकाल केसांच्या स्वरूपात आहे.

उत्तर : सस्तन वर्ग; उदा., मांजर, कुत्रा, मानव.

--------------------------------

(ii) पृथ्वीवर माझ्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. द्विपाश्र्व सममिती असून बाह्यकंकाल कायटीनचे आहे.

उत्तर : संधिपाद संघ; उदा., खेकडा, कोळंबी.

------------------------------

 (iii) मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. धाग्यासारखे शरीर असून आभासी देहगुहा आहे.

उत्तर : गोलकृमी संघ; उदा., जंत (अॅस्कॅरिस).

-----------------------------

(11) ओळखा पाहू मला ! माझा संघ / वर्ग कोणता ?

(i) माझ्या शरीराचे शुंड, गळपट्टि आणि प्रकांड असे भाग असून मी सागरनिवासी आहे.

उत्तर : बॅलॅनोग्लॉसस, प्राणीसंघ अर्धसमपृष्ठरज्जू.

--------------------------------

(ii) मी दोन कवचाच्या आत राहतो आणि डोके, पाय आणि आंतरांग संहती असे माझे तीन भागात विभागलेले शरीर !

उत्तर : शिंपले किंवा कालवं, प्राणी संघ मृदुकाय.

--------------------------------

 (iii) मीच नर, मीच मादी. देहगुहाहीन पण द्विपार्श्वसममित

चपट्या शरीराचा मी, अंतः परजीवी !

उत्तर : लिव्हरफ्ल्यूक किंवा पट्टकृमी, प्राणी संघ : चपट्याकृमी.

--------------------------------

(iv) असंख्य छिद्रातून पाणी घेणारा स्थानबद्ध प्राणी.

उत्तर : स्पॉज प्राणीसंघ रंध्रीय.

--------------------------------

(v) आठ पायांचा मी डंख मारतो विषारी, कायटिनयुक्त बाह्यकंकाल; उपांगे माझी भारी !

उत्तर : विंचू प्राणीसंघ संधिपाद.

--------------------------------

(vi) कुंचक पांघरून समुद्रात राहतो, लहानपणी अळी पण मोठेपणी अडकतो.

उत्तर : डोलीओलम किंवा हर्डमानिया; उपसंघः पृच्छसमपृष्ठरज्जू संघ : समपृष्ठरज्जू.

--------------------------------

■1)वलयी संघात कोणते प्रचलनाचे अवयव असतात ?

उत्तर : दृढरोम व परापाद हे प्रचलनाचे अवयव वलयी संघात असतात.

--------------------------------

■(2) कोणत्या संघाचे वैशिष्ट्ये उपांगाच्या जोड्या हे आहे?

उत्तर : संधीपाद संघामध्ये उपांगाच्या जोड्या हे वैशिष्ट्य आहे.

-------------------------------

(3) मृदुकाय संघातील प्राण्यांचा प्रचलनाचा अवयव कोणता?

 उत्तर : जाड, स्नायूयुक्त पाय हा मृदुकाय संघातील प्राण्यांचा प्रचलनाचा अवयव असतो.

--------------------------------

(4) कोणत्या वर्गात कमकुवत पाय आढळतात ? 

उत्तर : सरीसृप प्राण्यांत कमकुवत पाय आढळतात..

--------------------------------

(5) कोणत्या प्राणीवर्गात अग्रबाहूंचे रूपांतर झालेले असते?

 उत्तर : पृष्ठवंशीय उपसंघातील पक्षी वर्गात अग्रबाहूंचे रूपांतर पंखात झालेले असते.

--------------------------------

प्रत्येक प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा :

(1) जेलीफिश. 

उत्तर: वर्गीकरण 

सृष्टी प्राणी 

विभाग असमपृष्ठरज्जू 

संघ : सिलेंटराटा / निडारिया

 लक्षणे • छत्रीच्या बहुपेशीय प्राणी आकाराचा  पेशीभित्तीका नसलेला • ऊती स्तर शरीर संघटन • अरिय सममित शरीर • द्विस्तरीय, देहगुहाटीन शरीर जेलीफिश हा समुद्रात राहणारा छत्रीच्या आकाराचा निडारिया संघातील प्राणी तरंगू शकतो. या शरीरस्वरूपाला 'छत्रिक' असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारे हा जीव, जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते. याच्या मुखाभोवती दशपेशीयुक्त शुंडके असतात. शुडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात. 

-------------------- -

(2) हूक वर्म.. 

उत्तर: वर्गीकरण 

सृष्टी प्राणी 

विभाग असमपृष्ठरज्जू संघ : गोल कृमी लक्षणे : • पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन • द्विपाश्वंसममित शरीर • त्रिस्तरीय व आभासी देहगुहा असलेले शरीर हूकवर्मचे शरीर लांबट, लांबट बारीक धाग्यासारखे असते. 5-10 mm इतक्या लांबीचा हा गोलकृमी असतो. मानवाच्या शरीरात हा अंतः परजीवी म्हणून राहतो. शरीर अखंडित असून, त्याभोवती उपचर्म असते. हूकसारख्या मुख अवयवाने हा कृमी पोशिट्याच्या शरीरात अडकून राहतो.

-----------------------

(3) नाकतोडा. 

उत्तर: वर्गीकरण 

सृष्टी प्राणी

 विभाग असमपृष्ठरज्जू

 संघ संधिपाद 

वर्ग: कीटक

 लक्षणे • पेशीभिल्लीका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन • द्विपार्श्वसममित शरीर त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर नाकतोडा हा कीटक असून त्याचा समावेश संधिपाद प्राण केलेला आहे हा भूचर कीटक परिसराशी योग्य प्रकारे अनुकृति झालेला असतो. याच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य असते या कीटकात छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली रे म्हणजेच तीन पायांच्या जोड्या आणि दोन पंखांच्या जोड 

--------------------......

(4) गोम

 उत्तर: वर्गीकरण

 सृष्टी प्राणी 

विभाग असमपृष्ठरज्जू

 संघ संधिपाद 

लक्षणे पेशीभित्तोका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन • दुद्विपार्श्वसममित शरीर त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अनेक उपांगे गोमया प्राण्यात दिसतात. शरीराभोवती काटिनयुक्त बायकाल असते गोम हा किडा संधिपाद संघात वर्गीकृत केला जातो. त्याला अनेक पाय असतात त्यामुळे त्याला शतपाद असेही म्हणतात.

---------------  --------------

 (5) रोहू मासा 

उत्तर: वर्गीकरण

 सृष्टी प्राणी

 विभाग: समपृष्ठरज्जू

 संघ समपृष्ठरज्जू

 उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी

 वर्ग मत्स्य 

उपवर्ग अस्थिमत्स्य 

लक्षणे:• अवयवसंस्था स्तर शरीर संघटन द्विपाश्र्वंसममित शरीर • त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर पृष्ठवंशीय उपसंघाची सर्व लक्षणे मत्स्य वर्गात म्हणजेच माशांच्या सर्व प्रजातीत दिसून येतात. यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो. त्यांचे शरीर जलीय जीवनासाठी अनुकूलित झालेले असते. रो मासा गोडया पाण्यात राहतो. तो कल्ल्याद्वारे श्वसन करतो याचा अंतः कंकाल अस्थिमय असतो याच्या शरीराशी युग्मित पर जोडलेले असतात, पुच्छ पराचा उपयोग करून हा मासा पोहताना दिशा बदलू शकतो.

---------------------------

 (6) टोड

 उत्तर: वर्गीकरण 

सृष्टी प्राणी

 विभाग समपृष्ठरज्जू

 संघ समपृष्ठरज्ज् 

वर्ग उभयचर •

उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी 

लक्षणे पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी  ●अवयवसंस्था स्तर शरीर संघटन ●द्विपार्श्वसममित शरीर 

● त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर उभयचर वर्गात असणारा पृष्ठवंशीय टोड हा प्राणी जास्त प्रमाणात भूचर असतो बाह्यकंकाल नसते पण त्वचा खडबडीत असते. हा शुष्क प्रदेशात राहत असल्यामुळे त्वचेत हा बदल दिसून येतो. टोडच्या काही जातीत विषग्रंथी देखील दिसून येतात याला बाचकर्ण नसतो; परंतु कर्णपटल असते शरीराचे भाग डोके आणि घड असे असतात. याला मान नसली तरी बटबटीत डोळे चहूकडे फिरवून त्याला परिसराचे आकलन होते. 

------- -----------------

(7) उडणारा सरडा. 

उत्तर: वर्गीकरण

 सृष्टी प्राणी 

विभाग समपृष्ठरज्ज्

संघ समपृष्ठरज्जू 

उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी 

वर्ग: सरीसृप 

लक्षणे पेशीभित्तोका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन विश्वसममित शरीर • त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर सरडा हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सरडा शीतरक्ती आणि कमकुवत पायांचा असतो. त्यामुळे तो सरपटत प्रचलन करतो त्याची त्वचा खवलेयुक्त असते. शीर मान आणि घड हे शरीराचे भाग असतात त्याला उड्डाणासाठी त्वचेचेच पापुद्र्यासारखे पडदे असतात. पक्ष्यासारखे पंख नसतात. 

------------------------------

(8) मुसर 

उत्तर: वर्गीकरण 

संघसमपृष्ठरज्जू 

सृष्टी प्राणी 

विभाग समपृष्ठरज्जू

 उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी 

लक्षणे पेशीभित्तोका नसलेले बहुपेशीय प्राणी वर्ग सरीसृप

 • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन 

• द्विपार्श्वसममित शरीर

 • त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर सुसर हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सुसर पाण्याच्या सान्निध्यात असते परंतु पाण्यात श्वसन करू शकत नाही. शीतरक्ती आणि शरीराच्या वजनाच्या तुलनेत कमकुवत पायांची असते पाण्यात पायांच्या साहाय्याने पोहू शकते सुसरीची त्वचा खडबडीत असते. त्यावर मोठी शल्के असतात. मुखाचा भाग थोडा पुढेपर्यंत लाव झालेला असतो त्यात अतिशय अणकुचीदार दात असतात. शरीराचे भाग शीर मान आणि घड हे असतात 

------------------------

(9) पेंग्वीन,

 उत्तर: वर्गीकरण

 सृष्टी प्राणी 

विभाग समपृष्ठरज्जू

 संघ समपृष्ठरज्जू 

उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी 

वर्ग पक्षी 

लक्षणे पेशीभित्तोका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन 

• दुद्विपार्श्वसममित शरीर त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर पक्षी वर्गातील लक्षणे दाखवणारा पेंग्विन हा अतिथंड प्रदेशात राहणारा न उडू शकणारा असा पक्षी आहे त्याचे शरीर पिसांच्या बाह्य कंकालाने आच्छादलेले असते त्याचे अनुकूलन बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी झालेले असते. पेंग्विन उष्णरक्ती आणि कशेरुस्तंभयुक्त (पाठीचा कणा असलेला) आहे अग्रउपांगे लांब पंचामध्ये परिवर्तित झालेली असतात. या पंखांच्या साहाय्याने तो आपले थंड हवेपासून रक्षण करू शकतो.

--------------------------------

(10) हत्ती. 

उत्तर: वर्गीकरण 

सृष्टी प्राणी 

विभाग : समपृष्ठरज्ज्

 संघ : समपृष्ठरज्जू 

उपसंघ: पृष्ठवंशीय प्राणी

 वर्ग : सस्तन 

लक्षणे : पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी • अवयवसंस्था स्तर शरीर संघटन • द्विपाश्वंसममित शरीर • त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर हत्तीचा समावेश पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सस्तन वर्गात केला आहे. हत्ती हा जरायुज आहे, म्हणजेच तो पिल्लांना जन्म देतो. त्याच्या शरीरावर दूध खवणान्या ग्रंथी असतात. हत्तीची मादी पिल्लांचे दूध पाजून पोषण करते. हत्ती उष्णरक्ती असतो. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असणारा हत्ती अवाढव्य आकाराचा शाकाहारी प्राणी आहे.  

-----------------------------

 शास्त्रीय कारणे लिहा : 

■ जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. 

उत्तर : जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.

------------------------------

 ■ बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.

 उत्तर : बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात, म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा असे म्हणतात.

–----------------------------

 ■ सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्यू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत. 

उत्तर : ज्या प्राण्यामध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरुस्तंभात होते या प्राण्याला पृष्ठवंशीय म्हणतात. त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात. मात्र जे समपृष्ठरज्जू, पृच्छसमपृष्ठरज्जू व शीर्षसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणूनच राहतात त्यांच्या पृष्तर रूपांतर कशेस्स्तंभात होत नाही. त्यामुळे ते पृष्ठवंशीय डाले जा नाहीत.

------------------------------

 ■कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.

 उत्तर: कासव सरीसृप असते ते जमिनीवर राहते त्या वेळी फुप्फुसाने श्वसन करते. ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेच श्वसन करता येते. उभयचर प्राण्याचे असे नसते. दोन जमिनीवर फुप्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. तसेच कासवाच्या अंगावर बाह्यककालही असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही. 

-------------------------------

■ सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

उत्तर: सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान बसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वरखाली होते.. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

------------------

 प्रश्न  पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा ■(1) प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत? (सराव कृतिपत्रिका - 1)

 उत्तर : (1) सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी केले होते. या वर्गीकरण पद्धतीनुसार शरीराचे आकारमान, सवयी, अधिवास असे मुद्दे लक्षात घेतले जातात. या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हणतात (2) थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे लिनियस या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धती वापरली (3) विज्ञानातील प्रगतीमुळे पुढे संदर्भ बदलले आणि वर्गीकरणाचे मुद्दे देखील वेगळे झाले (4) वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा त्यानंतर अवलंब करण्यात आला. या पद्धतीत सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी गुणसूत्र जैवरासायनिक गुणधर्म असे आधुनिक मुद्दे लक्षात घेण्यात येतात. (5) त्यानंतर डॉब्झस्की आणि मेयर यांनी उत्क्रांतिवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत शोधली (6) 1977 च्या सुमारास काल वुज यांनी तीन डोमेन वर्गीकरण पद्धती शोधली. त्यानुसार आदिकेंद्रकी जीवाचे दोन वर्ग करण्यात आले आहेत. अशा रितीने प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. 

--------   ---------------------

■कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.

 उत्तर : (1) कंटकचर्मी प्राणी केवळ सागरनिवासीच असतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि सत्य देहगुहायुक्त असते. (2) यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपाश्र्व सममिती असते; मात्र प्रौढावस्थेत ते पंचअरिय सममिती मिळवतात. (3) प्रचलनासाठी यांना नलिकापाद असतात. या नलिकापादांनी ते अन्न देखील पकडू शकतात. (4) जे प्रचलन करीत नाहीत ते स्थानबद्ध असतात. (5) यांचे कंकाल कॅल्शिअमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. (6) कंटकचर्मी प्राण्यांमध्ये पुनर्जनन क्षमता खूप चांगली असते. (7) हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात.

--------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा