Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ३१ जुलै, २०२३

30 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना 

अता वंदिता भी गुरु माऊलीला, अति आदरे मी नमि या पदाला.... 

श्लोक 

- यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् । लोचनाम्यां चिह्निनस्य दर्पणः किं करिष्यति ॥ 

- ज्याला स्वतःची अंगची बुद्धी नाही, त्याला शास्त्र काय कामाचे? दृष्टी नसलेल्याला आरशाचा काय उपयोग?

 → चिंतन 

 -नव्या तंत्रज्ञानाने दिलेली ताकद वापरून या देशातील गरिबीचे संकट कायमचे दूर करता येईल. या देशातील गरिबांना आपण निव्वळ भिकारी बनवून टाकले आहे. त्यांचा सारा आत्मसन्मान खच्ची करणे हे सर्वांत मोठे पाप आपण आजवर केले. त्यांना मदतीचा हात देताना स्वयंपूर्ण, स्वाभिमानी बनविणे हेही महत्त्वाचे आहे. यापुढे साऱ्या धोरणांचा रोख दारिद्र्याच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या संस्कृतीच्या कोषातून बाहेर पडण्यावर असायला हवा. डॉ. वि. म. दांडेकर

 कथाकथन 

'शर्यत

 -वनराज सिंह भुकेने अगदी व्याकूळ झाला होता; परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही त्याला आज शिकार मिळत नव्हती. तेवढ्यात एका कासवाला तिथे येण्याची दुर्बुद्ध सुचली. कासवाला पाहून सिंहाला अतिशय आनंद झाला. आणि तो जिमल्या वाटीत त्या कासवाजवळ आला. 'आज छान मेजवानी मिळाली, 'तो मनाशी म्हणाला. सिंहाला पाहून कासवाच्या मनात धडकीच भरली. त्याचे शरीर भीतीने दर लागले. हा क्रूर सिंह आता आपल्याला पंज्याच्या एकाच फटकान्यात ठार मारणार.' याबद्दल त्याची खात्री होऊन गेली. पण जीव वाचविण्याचा एक अखेरचा प्रयत्न करावा म्हणून सिंहाला ते कळवळून म्हणाले, 'सिंह महाराज ! 'कृपा करून मला ठार मारू नका. या उपकाराबद्दल मी तुमचा ऋणी राहीन.' "छेडि. मी उपकार वगैरे काही जाणत नाही. मी या जंगलाचा राजा आहे. इथले सारे प्राणी माझी हुकूमत मानतात. मला पाहिजे त्या प्राण्याला भी ठार मारू शकतो. सिंहाच्या या रोखठोक बोलण्यावर कासव किंचित विचार करून म्हणाले, 'महाराज! मी काय सांगतो ते कृपा करून नीट ऐका.' बोल लवकर.' सिंह गुरगुरत म्हणाला. बासव म्हणाले, 'सिंह महाराज जरा विचार करा, जसे तुम्ही जंगलाचे राजे आहात तसा मी पाण्यात राजा आहे. एका राजाने दुसऱ्या राजाला खाणे बरे नव्हे!" 'काय म्हणतोस? तूही राजा आहेस?' 'सिंहाने आश्चयनि विचारले, 'हो. माझा मुकाबला पाण्यामध्ये कोणी करू शकत नाही. आपण दोघे पोहण्याची शर्यत लावू आहे कबूल? पाहा नीट विचार करून उत्तर द्या. सिंहाच्या पराक्रमात ते आव्हानच होते. तो म्हणाला, "मी शर्यतीला | कबूल आहे; परंतु जर का मी तुझा पराभव केला तर मात्र मी तुला ठार मारणार आहे?" "एक मात्र या शर्यती मी विजयी झालो तर?" "तू विजयी होणे कदापि शक्य नाही. 'सिंह मोठ्या रुबाबात म्हणाला. 'पण चुकून झालो तर! काय पाहिजे ते देईन. सिंह म्हणाला कासवाला जीवनदान देण्यास अशा प्रकारे त्याची शर्यत सुरू झाली. झाडावरच्या माकडाने पंच म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. सिंहाला खूप तहान लागली होती. म्हणून तो पाणी पिऊ लागला. तेववधात कासवाला पाण्यात दुसरे कासव भेटले. त्याने जिंकण्याची युक्ती विचारली. दुसरे कासव म्हणाले, | आपण दोघेही लाल फूल तोंडात धरू. मी आत्ताच पलीकडे जाऊन थांबतो. मध्यभागी आल्यावर तू पाण्यात बुडी मार आणि मी तिकडे डोके वर काढतो. पहिल्या कासवाला त्याची युक्ती आवडली. दुसरे कासव पाण्याखालून दुसऱ्या तीरावर गेले. सिंह शर्यतीला तयार झाला. पाच-दहा फूट अंतरावर जाताच | कासव खोल पाण्यात लपून बसले. सिंह मात्र सारी शक्ती एकवटून पलीकडे निघाला. परंतु तो तिथे पोहोचण्यापूर्वीच पलीकडच्या कासवाने डोके वर काढले. पहिल्या फेरीत कासवाचा विजय झाला. अशा प्रकारे तीनही फेऱ्यांमध्ये कासवच जिंकले. दोघांच्या तोंडात लाल फूल असल्याने सिंहाला थोडासुद्धा संशय | आला नाही. सिंहाचा चेहरा चांगलाच पडला. तो म्हणाला, 'आपण हरली बुवा. तुझ्यासारखा पट्टीचा पोहणारा तूच या पराजयानं स्वतःवरच चरफडत सिंह अरण्यात निघून गेला. त्याच्या मूर्खपणावर हसत दोन्ही कासवे आपल्या घरी गेली.

 → सुविचार

  • 'पायाने चालणार अंतर गाठतो तर डोक्याने चालणारा ध्येय गाठतो.' 

दिनविशेष

 • डॉ. वि. म. दांडेकर स्मृतिदिन १९९५ 

 • सातारा येथे ६ जुलै १९२० ला एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या वि. म. दांडेकरांनी - अतिशय कष्ट करून शिक्षण घेतले. अलौकिक प्रज्ञा लाभलेले दांडेकर संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ म्हणून गाजले. त्याशिवाय अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्पष्ट, तर्कशुद्ध विचार आणि परखड वक्तृत्व यामुळे त्या त्या क्षेत्रात त्यांचा विलक्षण दबदबा होता. पाणी, शेती, बेरोजगारी, उच्च शिक्षण या संबंधातील त्यांची मते व कार्य लक्षात घेण्याजोगे होते. 'पॉव्हटी इन इंडिया' हे डॉ. निळकंठ रथ यांच्याबरोबर लिहिलेले पुस्तक त्या विषयातील महत्त्वाचा व मोलाचा टप्पा ठरला आहे. त्यांचे निरीक्षण वास्तववादी असे. खेडोपाडीच्या भ्रमंतीवर आधारित असे, समाजहिताची व गरिबांची कळकळ त्यात असे. म्हणून त्यांना गरिबांचा अर्थशास्त्रज्ञ म्हणत. दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. जागतिक, राष्ट्रीय व इतर अशा किमान ३५ | समित्यांचे त्यांनी नेतृत्व केले होते. गोखले अर्थशास्त्र संस्थेशी त्यांचे प्रदीर्घ नाते होते. कितीही कठीण विषय सर्वसामान्यांना कळेल, अशा भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. 


अन्य घटना 

• महाकवी तुलसीदासांचा स्मृतिदिन १६२३ 

• मोटार वाहन युग निर्माण करणारे आद्य अमेरिकन संशोधक हेन्री फोर्ड यांचा जन्म १८६३ 

• साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त (बारोमासकार) प्रा. सदानंद देशमुख जन्मदिन-१९५९ 

मूल्ये 

 सत्यशोधन, सामाजिक बांधिलकी, परिश्रम

उपक्रम 

अर्थशास्त्राची संकल्पना मुलांना समजावून द्यावी. 

•मुलांनी गावाच्या आठवडी बाजाराचे निरीक्षण करून वस्तूंची उपलब्धता व चर्चा करावी.

समूहगान 

• हम भारत की नारी हैं, फूल नही चिनगारी हैं..... 

सामान्यज्ञान 

• लाकडी वस्तू पोखरून त्यांचा नायनाट करणारा वाळवी नावाचा एक उपद्रवी कीटक आहे; परंतु आफ्रिकेतील निग्रो लोक याचा जेवणात पक्वान्न म्हणून उपयोग करतात. वाळवी ही अत्यंत पौष्टिक समजली जाते. आफ्रिकेतील काही लोक वाळवी चिलमीत घालून तंबाखूप्रमाणे ओढतात. वाळवी फक्त उष्ण प्रदेशात राहते. वाळवीच्या जीवनात अळी अवस्था नसते. अंड्यामधून बाहेर पडणारा जीव प्रौढासारखा दिसतो. वाळवी फक्त वनस्पतिजन्य पदार्थच खाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा