Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी, राज्यशास्त्र, २.निवडणूक प्रक्रिया

        निवडणूक प्रक्रिया

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: (प्रत्येकी १ गुण)
(१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात.  (अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री (क) लोकसभेचे सभापती (ड) उपराष्ट्रपती

२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची नेमणूक झाली होती.
 (अ) डॉ. राजेंद्रप्रसाद (ब) टी. एन. शेषन (क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण

(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची समिती करते.
 (अ) निवड (ब) परिसीमन क)मतदान (ड) वेळापत्रक

(४) भारतीय संविधानाच्या व्या कलमान्वये 'निवडणूक आयोग' या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली.
(अ) ३५१ (ब) ३७० (क) ३२४ (ड) ३०१

(५) वयाची वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क मिळतो. (अ) १५ (ब) १८ (क) २१ (ड) २५

उत्तरे : (१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली होती.
३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
(४) भारतीय संविधानाच्या ३२४ व्या कलमान्वये 'निवडणूक आयोग' या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली.
(५) वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क मिळतो.

 (१) भारतात पद्धती अस्तित्वात आहे. (अ) एकपक्ष (ब) द्विपक्ष (क) बहुपक्ष (ड) पक्षविहीन
 (२) राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार
(अ) राष्ट्रपतींना असतो. (ब) उपराष्ट्रपतींना (क) संसदेला (ड) निवडणूक आयोगाला

(३) सध्या लोकसभेचे मतदारसंघ आहेत.  (अ) २८८ (ब) २५० (क) ५०० (ड) ५४३

 (४) सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील हे भारताचे पहिले मतदार ठरले.
(अ) सुकुमार सेन (ब) श्याम शरण नेगी (क) प्रेम कुमार धूमल (ड) पी. एन. चड्डा

 (५) स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक मध्ये पार पडली.
(अ) १९४८-४९ (क) १९५०-५१ (ब) १९४९-५० (ड) १९५१-५२

उत्तरे : (१) भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे.
(२) राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो.
(३) सध्या लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत,
 (४) सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी है भारताचे पहिले मतदार ठरले.
(५) स्वतंत्र भारतातील लोकसभेची पहिली निवडणूक १९५१-५२ मध्ये पार पडली.

 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण) (१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण (१) त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. (२) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो, (३) धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो

(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
 उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण
(१) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.
(२) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.
 (३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशावेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.


(३) एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण
(१) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते
(२) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबले..
(३) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

(४) निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण
 (१) निवडणुका न्याय्य मागनि व्हाव्यात आणि त्या विश्वासार्ह असाव्यात.
(२) खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या नाहीत; तर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होतील, भ्रष्टाचार वाढेल. (३) प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल; म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असू नये.

 (५) निवडणूक आयोगाला मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखावी लागते.
उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण
(१) मतदार यादी अद्ययावत करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते (२) नव्याने पात्र मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी मतदारांना जागृत करावे लागते. (३) भारतीय नागरिक निवडणुकीविषयी शक्य तेवढा जागृत नसतो; म्हणून मतदार जागृती मोहीम आखावी लागते.

(६) निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या सर्वांना निवडणूक लढवता येते
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण (१) निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या व अपक्ष उमेदवाराला निवडणूक अर्ज भरून, आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत स्वतः हजर राहून तो सादर करावा लागतो.
(२) निवडणूक आयोगाने निश्चित केलेली सर्व माहिती त्याने अर्जात भरणे आवश्यक असते.
(३) निवडणूक आयोग या अर्जांची काटेकोर छाननी करते. या छाननीत अर्जातील तपशिलात त्रुटी, चुकीची माहिती लिहिणे, माहिती दडवणे इत्यादी बाबी आढळल्यास असा अर्ज बाद केला जातो. म्हणून अर्ज भरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवता येईलच असे नसते.

 (७) काही वेळा निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात. उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण
 (१) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.
 (२) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.
 (३) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा व विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.

पुढील संकल्पना स्पष्ट करा
(२) निवडणूक आयोग
उत्तर : (१) लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधित निवडणुंकाची गरज असते. या निवडणुका लय वातावरणात प्रेमासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी
(२) या विचाराने संविधानाने कलम ३२४ अन्य भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. या यंत्रणेत एक गुख्य आयुक्त अन्य दोन निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतींकडून नेमणूक होते. (3) या तीनही आयुक्तांचा दर्जा य अधिकार समान असतात, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून निवडणुकीचे निकाल आहीर करण्यापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणेखाली चालते
(४) निवडणूक आयोगाकडे स्वत:चा स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते

(२) प्रतिनिधित्व (माहीत आहे का तुम्हाला? पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७५) उत्तर : (१) प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष म्हणजेच प्रातिनिधिक लोकशाही असे लोकशाहीचे दोन प्रकार असतात,
(२) आधुनिक काळात सर्वच देशांत लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे सर्व जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य नसते.
(३) म्हणून राज्यकारभार करण्यासाठी जनतेकडून प्रतिनिधींना निवडून देण्याची पद्धत सुरू झाली. (४) या प्रतिनिधींनी जनतेच्या वतीने त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन राज्यकारभार करणे अपेक्षित असते.

टिपा लिहा:
(१) मतदारसंघांची पुनर्रचना. (प्रत्येकी २ गुण)
 उत्तर : (१) विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.
 (२) निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओपो उद्योग-व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.
(३) खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखादया मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी तो प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते.
(४) हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

(२) मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास.
उत्तर : (१) १९५१-५२ च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या वीस लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. मतदार मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत.
(२) १९९८ साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील ५, राजस्थानातील ५ व दिल्लीतील ६ अशा १६ विधानसभा मतदारसंघांत इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा (EVM) वापर केला गेला.
(३) २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला. (४) ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाचे अनेक फायदे झाले. आता, ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची पडताळणी पावती ही सुविधा निर्माण झाली आहे.

 (३) राजकीय पक्षांची मान्यता.
उत्तर : (१) भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. या राजकीय पक्षांना राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहेत. (२) लोकसभा व विधानसभेतील मतदानाची टक्केवारी वा निवडून आलेल्या पक्षाच्या प्रतिनिधींची संख्या यांवर पक्षमान्यता अवलंबून असते.
 (३) या अर्टीमध्ये न बसलेल्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो.
(४) आयोग मान्यताप्राप्त पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह देतो. सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता घेणे आवश्यक असते.


 पुढीलपेकी कोणत्या दोन बाबी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत, असे तुम्हाला वाटते ? (पाठ्यपुस्तक पान क्र. ७७)
 (१) उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूंचे वाटप
(२) पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणे. (३) घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे व निवडून देण्याची विनंती करणे.
(४) जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे.
उत्तर : पुढील बाबींमुळे आचारसंहितेचा भंग होईल, असे मला वाटते-
(१) उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूंचे वाटप.
(२) जातीचे वा धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे.

 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : (प्रत्येकी २ गुण)
 (१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
 उत्तर : निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो
(१) मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.
(२) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
(३) उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.
(४) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे,
(५) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे. (६) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

२) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा
उत्तर : (१) भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. विधांनाही समान अधिकार असतात.
(२) या आयुक्तांची निवड राष्ट्रपत्तीकडून होते प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते
 (३) संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.
(४) निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही.


(३) 'निवडणूक आचारसंहिता' म्हणजे काय हे स्पष्ट करा.
 उत्तर : (१) निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस निवडणूक आचारसंहिता' असे म्हणतात.
(२) निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते.

(४) लोकशाही पद्धतीत निवडणुका घेणे का आवश्यक असते?
उत्तर : पुढील गोष्टींमुळे लोकशाही निवडणुका घेणे आवश्यक असते पद्धतीत नियमितपणे (१) निवडणुकांवर लोकशाहीचे अस्तित्व अवलंबून असते.
 (२) राजकीय पक्षांना राज्यकारभाराची संधी निवडणुकांमुळे मिळते.
 (३) निवडणुकांमुळे सत्तेत शांततामय मार्गाने बदल घडवून आणता येतो.
 (४) निवणुकांमुळे शासनाच्या धोरणांत चांगले बदल होतात आणि एकंदर समाजजीवनातही बदल घडून येतात.

 (५) मतदानासाठीच्या कोणत्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत?
 उत्तर : मतदानासाठी पुढील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत- (१) मतदान करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी. (२) तिचे वय १८ वर्षे पूर्ण असावे. (३) मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव असले पाहिजे. (४) मतदान करताना त्या व्यक्तीकडे निवडणूक आयोगाने दिलेले पत्र या अन्य मान्यताप्राप्त ओळखपत्र असले पाहिजे.


(4)  निवडणुकीसंबंधात वाद निर्माण झाल्यास निवडणूक आयोग काय करतो? उत्तर : (१) निवडणुकीसंबंधात निर्माण झालेल्या वादाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो (२) निर्माण झालेल्या वादाबाबत आयोग संपूर्ण चौकशी करतो
(३) निवडणूक प्रक्रियेबाबत एखादया मतदारसंघात गैरप्रकार पडलेला असेल, तर आयोग येथील निवडणूक अवैध घोषित करून पुन्हा निवडणूक घेतो
(४) एखादया उमेदवाराने आचारसंहितेचा भंग करून निवडणूक लढवली आहे, असे सिद्ध झाल्यास आयोग त्या उमेदवाराला विशिष्ट वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित करू शकतो.

 (७) मुक्त वातावरणात आणि न्याय्य पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला कोणत्या आव्हानांना तोंड दयावे लागत आहे?
उत्तर : मुक्त वातावरणात आणि न्याय्य पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड दयावे लागत आहे
 (१) देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकीचे नियोजन करणे.
(२) निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे.
(३) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे
 (४) निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसांमुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे


(८) ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले?
उत्तर : मतपत्रिकांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाला पुढील फायदे झाले (१) प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदाची बचत झाली.
 (२) कागद तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची बचत झाल्याने तेवती वृक्षतोड थांबली, त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले.
 (३) मशीनवर उपलब्ध असलेल्या NOTA च्या सोईमुळे कोणत्याही उमेदवाराला मत दयायचे नसेल, तर हा पर्याय उपलब्ध झाला.
 (४) दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोईचे झाले.
 (५) निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागल्याने कर्मचमी पोलीस व एकूण व्यवस्थेचा ताण कमी झाला.

प्र.७ तुमचे मत मांडा: (प्रत्येकी २ गुण) (१) असे का करावे लागते
निवडणुकीसंबंधात (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७६)
(अ) उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे? उत्तर : (१) उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना वयाबरोबरच त्याच्या मालमत्लेवाबतचे विवरण आणि काही गुन्हेगारी पाश्श्वभूमी आहे का याचेही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला द्यावे लागते.
 (२) गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास दहशत निर्माण करून मतदारांवर प्रभाव टाकू शकतो किंवा त्याच्या अशा प्रवृत्ती वाढू शकतात.
३) त्यामुळे याबाबत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचे सदस्यत्व रद्द करता येऊ शकते, म्हणून उमेदवारांना अर्जात माहितीचा संपूर्ण तपशील दयावा लागतो.

 (ब) उमेदवारांना त्यांच्या कडील माल्मत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते?
उत्तर : (१) उमेदवार निवडून आल्यावर तो आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करू शकतो.
 (२) आपल्या कार्यकाळात असे प्रतिनिधी गडगंज पैसा मिळवतात, जमिनी खरेदी करतात.
(३) जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा गैर मार्गानी मिळवलेल्या संपत्तीचा तपशील देता आला नाही, तर अशा प्रतिनिधींना शिक्षा करता येते त्याला पदभ्रष्टही करता येते
(४) लोकप्रतिनिधींवर या अटीमुळे निबंध लादले जाऊन सरकारी व खाजगी मालमत्तेचा व्यय होणे थांबते. म्हणून उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला दहावी लागते.


 (२) असे का? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७६) (अ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात.
उत्तर : (१) प्रत्येक मतदारसंघात अनुसूचित जाती व जमातींची संख्या विखुरलेली असते. त्यामुळे या लोकसमूहांना प्रतिनिधित्व मिळणे अवघड असते.
(२) प्रतिनिधित्वाशिवाय त्यांच्या समस्यांना सभागृहात वाचा फोडणे अशक्य होईल (३) प्रतिनिधित्व न मिळाल्यास या लोकसमूहांना सामाजिक न्याय व समानता मिळणार नाही.
(४) त्यांची प्रगती धांबेल, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाीच्या हक्कांच्या रक्षणासाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात.

(ब) सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात.
 उत्तर : (१) स्वातंत्र्योत्तर भारतात निरक्षरतेचे प्रमाण फार मोठे होते. त्यामुळे मतदारांना मतपत्रिकेवरील नावे वाचून मतदान का शक्य नव्हते.
 (२) प्रचाराच्या वेळीही बॅनरवर केवळ नाव लिहिल्यास ती नाते त्यांना वाचन शक्य नव्हते.
(३) यासाठी राजकीय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांनाही निवडणूक आयोग सुरुवातीपासूनच चिन्हांचे वाटप करीत आला आहे.
(४) त्यामुळे कोणत्या उमेदवाराला मत दयायचे. हे चिन्हांबरू ओळखणे निरक्षर लोकांना शक्य झाले.

 (क) मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात
उत्तर : (१) निवडणुकीत अनेकदा बोगस म्हणजे दुसऱ्याच्या नावावर मतदान केले जाते.
(२) मतपेट्या पळवल्या जातात किंवा मतदान केंद्र ताब्यात घेऊन खोटे मतदान केले जाते.
(३) असे गैरप्रकार वेळीच उघडकीस आणण्यासाठी मतदानाच्या वेळी सर्व पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रांवर उपस्थित असतात,
 (४) मतमोजणीच्या वेळी एखादी मतपेटी सीलबंद नसेल किंवा शिक्का अयोग्य जागी मारलेला असेल, अशा वेळी हे प्रतिनिधी हरकत घेऊ शकतात. म्हणून गैरप्रकार टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी मतदान केंद्रांवर हजर असतात.

 (ड) दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसारमाध्यमांवर आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी असते.
 उत्तर : (१) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांना समान न्याय मिळाला पाहिजे, असा आग्रह असतो. (२) त्यामुळे आपली विचारसरणी लोकांपर्यंत नेण्याचा प्रत्येक (३) दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी मालकीच्या असल्याने त्यावर सर्व जनतेचा हक्क असतो. त्यामुळे अशा दोन्ही पक्षाला अधिकार असतो माध्यमांतून आपली बाजू मांडण्याची सर्व मान्यताप्राप्त पक्षांना समान संधी दिली जाते.


(३) विचार करा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.७१) (अ) घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल?
उत्तर : (१) घराणेशाहीमुळे एकाच घराण्याचे पक्षावर वर्ध् राहते. पक्षातील अन्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी नाकारली जाते (२) घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असे नाह अकार्यक्षम वारस पक्षाचे नुकसान करतो.
३) अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या बारशाचे दोष पक्षात येऊन पक्षही कमकुवत होतो.
४ ) घराणेशाहीमुळे पक्षात हुकूमशाही येते. विरोधी मते दडपली जातात वा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते.
(५) घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचे नसतील तर पक्षही प्रतिगामी विचारांचा बनतो व मागास विचारसरणीचा होतो राजकीय पक्षाची विचारसरणी प्रवाही व काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे.

 (ब) 'एक मत, एक मूल्य' यातून तुम्हाला काय समजते ?
उत्तर : (१) लोकशाही पद्धतीत राजकीय आणि सामाजिक समतेला महत्त्वाचे स्थान आहे. या विचारसरणीप्रमाणे 'एक मत, एक मूल्य' हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो.
(२) लोकशाही पद्धतीत प्रत्येक मताचे मूल्य सारखेच असते प्रधानमंत्री आणि सामान्य माणूस यांच्या मतांचे मूल्य एकच असते. (३) हुकूमशाहीत किंवा लष्करशाहीत, पूर्वीच्या राजेशाहीत विशिष्ट वर्गांच्या मतांचे मूल्य अधिक असे. सामान्य लोकांच्या मतांना महत्त्व नव्हते
 (४) 'एक मत, एक मूल्य' हा विचार देशातील सर्व नागरिकांचा दर्जा समान असल्याचे दर्शवतो. हीच लोकशाहीची मोठी देणगी आहे.

 (४) तुम्ही काय कराल? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७७) मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारीही
उत्तर : (१) संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांत मतदान करणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य मानले आहे. कर्तव्याबरोबरच ती आपली जबाबदारीही आहे.
(२) निवडणुकांमुळे लोकशाही टिकून राहते. नागरिकांनी मतदानाद्वारे प्रामाणिक व कार्यक्षम प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत.
(३) मतदार मतदानाच्या बाबतीत उदासीन असतील, तर शासन लोकहिताकडे दुर्लक्षच करील. म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य तर आहेच, परंतु ती त्यांची जबाबदारीही आहे, असे मला वाटते.
 (४) ही माझी भूमिका मी माझ्या परिसरातील लोकांना पटवून देऊन त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करेन.


(५) निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा कराव्यात, असे तुम्हांला वाटते ? उत्तर : निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी पुढील निवडणूक सुधारणा कराव्यात, असे मला वाटते - (१) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये व त्यांना निवडणुकीला उभेच राहता येणार नाही, असा नियम करावा.
 (२) निवडणुकीत पैशांचा गैरवापर थांववण्यासाठी निवडणुकीचा खर्च सरकारने करावा.
 (३) निवडणुकीत गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांची ताबडतोब चौकशी होऊन, त्यांना न्यायालयांनी कठोर शिक्षा कराव्यात .
(४) प्रत्येक पक्षाने महिलांना ५०% उमेदवारी दयावी.
 (५) वरील सर्व बाबतींत सहकार्य न करणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता ताबडतोब रद्द करावी .

 ६-मतदारांसाठीच्या आचारसंहितेत तुम्ही कोणत्या नियमाचा समावेश कराल? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७७) उत्तर : निवडणूक काळात निवडणूक आयोग उमेदवारांप्रमाणेच मतदारांसाठीही आचारसंहिता लागू करीत असतो. मतदारांसाठीच्या आचारसंहितेत पुढील नियमांचा समावेश असावा असे मला वाटते (१) मतदान न करणाऱ्या मतदारांच्या सर्व सोयी-सवलती सरकारने रद्द कराव्यात किंवा त्याला जबर दंड करावा (२) मतदाराने उमेदवाराकडून भेटवस्तू वा पैसे स्वीकारल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जबर दंड करावा
 (३) निवडणुकीच्या काळात मतदारांनी लोकांना भडकवणारी कृत्ये करू नयेत. (४) खोटे मतदान करू नये तसे केल्यास शिक्षा करावी
(५) कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य मतदाराने करू नये.

1 टिप्पणी: