Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दुसरी, मराठी,१. आमचे घर

                 आमचे घर

आमचे घर


चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर,लिही आणि वाच


१) हे आमचे घर आहे.घरात आईबाबा, दादा, आजी-आजोबा व मी राहते.

2)आई घरी संगणकावर काम करते.

3) मी सायकल चालवते.अजोबासाठी औषध आणते.

4) हे झेंडुचे फूल आहे.बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.

5)दादा दारा समोर रांगोळी काढतो. मी मदत करते.

6) ही माझी बॅग आहे.बॅगेत वही, पेन आहे.7) दादाने ताटे मांडली. दोघे इथे जेवायला बसलो.

8)दादाने पाहिले, आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.

9)ऊसापासून साखर तयार होते.ज्ञानेशला साखरेसारखा गोड फणस आवडतो.

10) आई भाकरी करते.शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते.

11) शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते.अनिता कागदाची होडी तयार करते.

12)सायंकाळी आकाशात पाखरे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.


वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांगा
 घर
संगणक
सायकल
औषध
झेंडु
तोरण
दार
बॅग
ताट
जेवण
ढग
मोर
ऊस
फणस
भाजी
पणती
होडी
पाखरे

ऐका म्हणा व लिहा

1)हाताचे बोट- करंगळी
2)पुरण घालून करतात ती-पूरणपोळी
3) फुलाचा भाग -पाकळी
4)न उमललेले फूल -कळी
5)एका हाताने वाजत नाही ती -टाळी
6)लाकडे एकत्र बांधून केलेली -मोळी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा