आम्ही संवाद करतो
१)मासोळी आणि तिचे पिल्लू
चित्र क्र. १ - मासोळी आणि तिचे पिल्लू आई गं, ती मसोळीचे पिल्लू- नदीकाठची मुलं आपल्याला ओंजळीत का पकडतात ? त्यांना आपल्यासोबत खेळायचे असते का
मसोळी - नाही रे बाळा, काही खेळायचं वगैरे नसते. ते फक्त मस्ती करतात आणि आपण मात्र जीवनाशी जातो. आता ओंजळीत पकडतात मग मोठेपणी जाळ्यात पकडतात.
पिल्लू. मग काय करतात ?
मसोळी -आपल्याला मारतात म्हणून त्यांच्या दूरच राहायचे. लक्षात ठेव.
२)चिमणी आणि तिची पिल्ले:
चिमणी-पिलांनो चला या, हे दाणे मी तुम्हाला भरवते, या पटकन्.
पिल्लु- आई, तुला दाणे दुरून आणायला त्रास होतो का ? उद्यापासून चिमणी चिमणी आम्ही येऊ का तुझ्यासोबत ?
चिमणी- काही नको यायला, मी माझे काम करीन, तुम्ही अजून लहान आहात. नसत्या उठाठेवी करू नका.
चिमणी- अरे, बाळा घरट्याबाहेर वाकून पाहू नकोस, खाली पडलास ना, तर डोके फुटेल. मी येईपर्यंत गुपचूप बसून राहायचे घरट्यात. आले का लक्षात्.
पिल्ले- हो, हो.
३)डायनोसोर आणि पिल्लू
डायनासोर पिल्लू - आई, मी त्या टेकडीपलीकडे माणसांच्या मुलांसोबत खेळायला जाऊ का? नाही, कधीच नाही?
डायनासोर पिल्लू -पण का?
डायनासोर- बाळ तू अजून लहान आहेस, तू माझ्यासाठी लहान जेव्हा तू माणसांत जाशील तेव्हा तू त्यांच्यापेक्षा दहा पटीने मोठा आहेस, पण होशील ते तुला पाहून घाबरतील आणि पळून जातील.
पिल्लू - मी त्यांना प्रेमाने समजावून सांगील ना ? एखाद्या वेळी स्वत:च्या जीवाला वाचवण्याकरीता ते तुला काही
डायनासोर - हो, बाळ. तू शहाणा आहेस, पण तुझ्या प्रचंड शरीराला ते घाबरतील. करतील, तू शहाणा आहेस ना ? इथे जंगलातच खेळायचं.
हो ठीक आहे. मी जंगलातच खेळेल आणि जर जंगलात माणसं आली तर मीच पहिले पळून जाईल म्हणजे त्यांना माझी भीती वाटणार नाही
डायनासोर आता कस शहाण्यासारखं बोलतोय?
चित्र क्र. ४ - कांगारू आणि पिल्लू
कांगरू चे पिल्लु- आई गं, मला या पिशवीबाहेर निघायचं आहे. मैदानात हिरवं गवत खायच आहे. दुडूदुडू उड्या मारायच्या येऊ का बाहेर ?
कांगारु- नाही थोडा वेळ थांब,
पिल्लु- आई तू फारच दृष्ट आहेस. बाळा तू अजून लहान आहेस. तुला काही गोष्टी कळत नाही. जर एखादा वाघ किंवा सिंह तुला पाहिल तर खाऊन टाकतील. तू लहानसा आहेस पळू देखील शकणार नाहीस. बापरे, आई मला तर ऐकूनच भिती वाटत आहे.
कांगारू - बरोबर, भ्यायलाच पाहिजेस तू । अरे, आई सागते ते ऐकायचे तू माझ्या पोटाच्या या पिशवीत आहेस म्हणून सुरक्षित आहे. धोका वाटला तर मी भरधाव वेगाने, टुणटून उड्या मारत पळून जाईल आपले दोघांचेही प्राण वाचतील,
पिल्लु- आई, तू जगातील सर्वात हुशार आई आहेस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा