Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

Sunday, 12 July 2020

इयत्ता-सातवी,1-जय जय महाराष्ट्र माझा

                   वाचा म्हणा
           1.जय जय महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा।।धृ।।
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
 एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

वरील ओळीचा अर्थ-

माझ्या महाराष्ट्राचा विजय असो
या माझ्या महाराष्ट्राचा जय जयघोष करा।।धृ।।

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी या नद्यांमध्ये पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. महाराष्ट्रातील जनता एकोप्याने नांदते. भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना (मर्द मराठा मावळ्यां)ना उत्तरखंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोप्याने वागते.

भीती न आम्हा तुझी मुळीही
गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला,
जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो ,शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।2।

वरील ओळीचा अर्थ-

आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही .हे अस्मानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट येऊ आम्ही या संकटांना तोडीस तोड जवाब देऊन सामना करू. सह्याद्रीची सिंह असले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जयजयकाराचा चा नाद दरीदरीतून निनादत आहे.


काळया छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी 
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
 निधड्याच्या घामाने भिजला
 देशगौरवासाठी झिजला
 दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा।।3।।


 वरील ओळीचा अर्थ-

मराठी माणसाच्या काळ्याकभिन्न कातळा सारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहे. मराठी मनाची पोलादी मनगटे पोलादी कर्तुत्व कधीही जीवघेणी संकटे लीलया झेलायला तयार आहेत. मराठी माणसे कष्ट करून घामाने थबथबली आहेत .दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत तसली तरी भारताच्या थोरवी साठी सतत झटायला तयार आहेत. .दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या
 महाराष्ट्राचा जयजयकार असो.

9 comments: